होळीमध्ये गोड पदार्थांचे सेवन केल्यामुळे वाढलेली साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी ‘या’ खास पदार्थांचा आहारात समावेश करा!

होळीमध्ये फक्त रंगांचीच उधळण होत नाहीतर या दिवशी नाना प्रकारची मिठाई खाल्ली (Sweets on holi)  जाते. इतर सणांप्रमाणेच होळीलाही मिठाईचा गोडवा हा सण अधिक खास बनवतो. होळीमधील करंज्या, लाडू, चिक्की, बर्फी आणि गुलाबजाम सारखे अनेक गोड पदार्थ (Food) तयार केले जातात.

होळीमध्ये गोड पदार्थांचे सेवन केल्यामुळे वाढलेली साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी 'या' खास पदार्थांचा आहारात समावेश करा!
रक्तामधील साखरेची पातळी नियंत्रणामध्ये ठेवण्यासाठी हे फाॅलो करा.Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 19, 2022 | 9:14 AM

मुंबई : होळीमध्ये फक्त रंगांचीच उधळण होत नाहीतर या दिवशी नाना प्रकारची मिठाई खाल्ली (Sweets on holi)  जाते. इतर सणांप्रमाणेच होळीलाही मिठाईचा गोडवा हा सण अधिक खास बनवतो. होळीमधील करंज्या, लाडू, चिक्की, बर्फी आणि गुलाबजाम सारखे अनेक गोड पदार्थ (Food) तयार केले जातात. मात्र, बहुतेक लोक ज्यांना मिठाई खाण्यास मनाई आहे ते स्वतःला ते खाण्यापासून रोखू शकत नाहीत. काही लोक इतके गोड खातात की त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी वाढते. त्यामुळे मधुमेही रुग्णांना (Blood sugar level) त्रास होण्यास सुरूवात होते.

  1. -मधुमेहाच्या रुग्णांनी काहीही खाण्यापूर्वी थोडा विचार केला पाहिजे, परंतु डॉक्टरांच्या सल्ल्याने या दिवशी थोडे गोड पदार्थ कमी प्रमाणात खाऊ शकतात. असे असूनही, तुम्हाला रक्तातील साखरेची पातळी वाढण्याची चिंता वाटत असेल, तर त्यासाठी औषधांव्यतिरिक्त घरगुती उपायांचाही अवलंब केला जाऊ शकतो. आम्ही तुम्हाला अशाच काही घरगुती उपायांबद्दल सांगणार आहोत.
  2. -धणे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी खूप प्रभावी मानले जातात. त्यापासून बनवलेले पाणी प्यायल्याने शरीरातील साखरेची पातळी ठीक व्यवस्थित करता येते. असे म्हटले जाते की धण्यामध्ये आढळणारे इथेनॉल रक्तातील साखर कमी करते. यासोबतच यामध्ये असणारे अँटी-ऑक्सिडंट्सही शरीरासाठी फायदेशीर असतात.
  3. -तज्ज्ञांच्या मते, धन्याचे पाणी रोज प्यायल्यास वजन कमी होण्यासही मदत होते. केवळ मधुमेहच नाही तर इतर आजारांचा सामना करणारे लोकही हा घरगुती उपाय करून पाहू शकतात. ज्या लोकांची पचनक्रिया बरोबर नाही, ते धन्याचे पाणी पिऊनही निरोगी राहू शकतात.
  4. -कारल्याची चव खूप कडू असते, त्यामुळे अनेकांना कारले खायला आवडत नाहीत. पण हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. कारल्याचा रस मधुमेहाच्या रुग्णांसाठीही खूप फायदेशीर आहे. त्यात चारॅटिन आणि मोमोर्डिसिन असते. ते मधुमेहाच्या रुग्णांमध्ये रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करतात.
  5. -लसूण ही एक गोष्ट आहे जी आपल्या आरोग्यासाठी मोठ्या प्रमाणात फायदेशीर करते. जर एखाद्याला रक्तातील साखर किंवा कोलेस्टेरॉल कमी करायचा असेल तर, त्यांच्यासाठी हळदीचे सेवन खूप फायदेशीर ठरते. मधुमेह असलेल्या व्यक्तींनी त्यांच्या आहारात लसूणचा समावेश करणे आवश्यक आहे.

संबंधित बातम्या : 

Skin Care : होळी खेळल्यानंतर त्वचेवर अ‍ॅलर्जी होते? मग हे 5 उपाय नक्कीच कामी येतील!

Teeth | मजबूत अन्‌ चमकदार दातांसाठी फळांचा वापर ठरेल फायदेशीर! जाणून घ्या 5 फळांबद्दल

Non Stop LIVE Update
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.