Healthy Heart | हृदयाची निगा राखायचीय?, मग ‘या’ 5 औषधी वनस्पतींचा वापर कराच!
मुंबई : हृदय हा शरीरातील अत्यंत महत्त्वाचा अवयव. गेल्या काही वर्षांपासून तरुण पिढीमध्ये हृदयासंबंधीच्या आजारात वाढ (Tips prevent heart attack) झाली आहे. हृदयविकारच्या झटक्याने आतापर्यंत अनेकांचा मृत्यू झाला असून याचे प्रमुख कारण बदलती जीवनशैली आहे. सद्यस्थितीत तरुण पिढी व्यायाम, योगा या गोष्टी करण्यास टाळाटाळ करते आणि जंक फूडला (Tips prevent heart attack) जवळ करते. जर […]
मुंबई : हृदय हा शरीरातील अत्यंत महत्त्वाचा अवयव. गेल्या काही वर्षांपासून तरुण पिढीमध्ये हृदयासंबंधीच्या आजारात वाढ (Tips prevent heart attack) झाली आहे. हृदयविकारच्या झटक्याने आतापर्यंत अनेकांचा मृत्यू झाला असून याचे प्रमुख कारण बदलती जीवनशैली आहे. सद्यस्थितीत तरुण पिढी व्यायाम, योगा या गोष्टी करण्यास टाळाटाळ करते आणि जंक फूडला (Tips prevent heart attack) जवळ करते. जर तुम्ही हृदयाला निरोगी ठेवायचे असेल, तर या पाच औषधी वनस्पतींचा (Tips prevent heart attack) वापर करावा.
औषधी वनस्पती आपल्या आहारात औषधी वनस्पतींचा समावेश केल्यास त्याचा हृदयाच्या आरोग्याला फायदा होऊ शकतो. दालचिनी, लसूण, लाल मिरची, आले, हळद यासारख्या औषधी वनस्पती आणि मसाल्यांचा उपयोग अनेक औषधी गुणधर्मांसाठी हजारो वर्षांपासून केला जात आहे.
अर्जुन
अर्जुन एक सर्वात औषधी वनस्पती आहे. अर्जुन या वनस्पतीचा वापर केल्याने आपल्या हृदयाच्या आरोग्याला फायदा होऊ शकतो. अर्जुन या वनस्पतीच्या सालापासून अनेक फायदे होतात. अर्जुन या झाडाची साल आपल्या मासपेशींना मजबूत करते. सालीमध्ये असलेल्या गुणांमुळे ब्लड प्रेशर प्रमाणात राहण्यास मदत होते.
आमलकी
आमलकी म्हणजे आवळा. आयुर्वेदामध्ये आवळ्याला अनंन्यसाधारण महत्व आहे. आवळ्यामध्ये असणाऱ्या गुणर्धमामुळे इम्युनिटीवाढण्यास मदत होते. आवळ्यामुळे कॉलेस्ट्रॉल ही प्रमाणात राहते.
शेवग्याची पाने
शेवग्याची पाने या वनस्पतीच्या वापरामुळे हृदयाच्या आरोग्याला फायदा होऊ शकतो. कॉलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी या वनस्पतीचा वापर केला जातो. शेवग्याच्या पानांमध्ये व्हिटामिन बी 6, व्हिटॅमिन सी, व्हिटामिन ए, व्हिटामिन ई, लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम, झिंक यासारखे पोषक घटक असतात. भारतामध्ये शेवग्याचे झाड सर्रास अढळले जाते. तसेच आफ्रिकेमधिल काही भागात हे झाड अढळले जाते.
अळशी
अळशी आणि त्याच्या तेलामध्ये मोठ्या प्रमाणात अल्फा-लिनोलेनिक एसिड अढळते. आळशीच्या या गुणांमुळे रक्तदाब सुरळीत प्रमाणत राहण्यास मदत होते.
हळद
हळदीमध्ये असणाऱ्या एंटी-इंफ्लेमेटरी गुणामुळे हृदयाला त्याचा फायदा होतो. याव्यतिरिक्त ब्राह्मी, तुळस आणि अश्वगंधा या वनस्पतीमुळेसुद्धा हृदय निरोगी ठेवण्यासाठी उपयोग होतो
हृदयाची निगा राखण्यासाठी उपाय – (Tips prevent heart attack)
दररोज व्यायाम करा
हार्ट अटॅकपासून वाचण्यासाठी सर्वात चांगला उपाय म्हणजे व्यायाम. दररोज व्यायाम केल्याने हृदयासंबंधीच्या आजार कमी होतात. त्यामुळे दररोज किमान 15 मिनिटे व्यायाम करणे गरजेचे आहे. जर व्यायाम करणं शक्य नसेल, तर दररोज काही वेळ चाला. चालल्याने तुमचे हृदय निरोगी राहते.
तेलकट खाणे टाळा
जंक फूडमध्ये तेलाचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे हृदयाला धोका निर्माण होता. जर तुम्हाला हृदयाच्या आजारापासून दूर राहायचे असेल, तर तेलकट खाणे टाळा,
ताण-तणावापासून चार हात लांब राहा
तणाव हे हृदय विकाराचा झटका येण्याचे प्रमुख कारण आहे. स्वत:ला तणावापासून दूर ठेवण्यासाठी मेडिटेशन करावे. मेडिटेशन केल्याने मनाला शांती मिळते. त्यामुळे हृदय विकाराचा झटका येण्याचे धोका कमी होतो.
(टीप : कोणताही उपचार करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
इतर बातम्या :
Healthy Breakfast | वजन कमी करण्यासाठी नाश्त्यामध्ये करा ‘या’ गोष्टींचा समावेश
गुडघ्यातून येणाऱ्या कट- कट आवाजाकडे दुर्लक्ष करताय? होऊ शकतो ‘हा’ गंभीर आजार!
Weight Loss : वजन कमी करण्यासाठी आहारात समाविष्ट करा हे 7 उच्च प्रथिनेयुक्त पदार्थ