Weight loss | वाढलेले वजन कमी करण्यासाठी मखानाची ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा!
कढईत तूप टाकून त्यात मखाना चांगला भाजून घ्या. आता पुन्हा कढईमध्ये थोडे तूप घाला. आता त्यात शेंगदाणे भाजून घ्या. मखाना तळताना त्यात शेंगदाणे घाला. यामध्ये सर्व मसाले आणि मीठ टाकून थोडा वेळ परतून घ्या. त्यात चिंचेची चटणी आणि हिरवी चटणी घालून मिक्स करा. हे काही वेळ मिक्स करत राहा. वीस मिनिटे साधारण हे राहूद्या.
मुंबई : वाढलेले वजन (Weight loss) ही अनेकांची मोठी समस्या बनले आहे. लठ्ठपणामुळे मधुमेह आणि इतर आरोग्य समस्या सहज होतात. लोक निरोगी खाण्याचा प्रयत्न करतात. परंतु, आळशीपणामुळे नियमित डाएट आणि व्यायाम करू शकत नाहीत. मखाना वाढलेले वजन कमी करण्यासाठी खूप जास्त फायदेशीर (Beneficial) आहे. त्यात भरपूर फायबर असते आणि याच कारणामुळे ते पोटासाठी फायदेशीर मानले जाते. यामध्ये मॅंगनीज, पोटॅशियम, मॅग्नेशियम, थायामिन प्रोटीन आणि फॉस्फरस (Phosphorus) भरपूर प्रमाणात असते. यामुळे ज्यांना निरोगी राहिचे आहे आणि आपले वजनही कमी करायचे आहे, अशांनी आपल्या आहारात मखानाचा नक्की समावेश करावा. आज आम्ही तुम्हाला मखानाची स्पेशल रेसिपी सांगणार आहोत.
साहित्य
2 कप मखाना, 1 कप शेंगदाणे, 1 कप शेव, हिरवी मिरची चिरलेली, लाल मिरची, चाट मसाला, तूप, चिंचेची चटणी, टोमॅटो बारीक, कांदा बारीक, कोथिंबीर चिरलेली, हिरवी चटणी, मीठ हे घटक आपल्याला मखानाची स्पेशल रेसिपी तयार करण्यासाठी लागणार आहेत.
पध्दत
कढईत तूप टाकून त्यात मखाना चांगला भाजून घ्या. आता पुन्हा कढईमध्ये थोडे तूप घाला. आता त्यात शेंगदाणे भाजून घ्या. मखाना तळताना त्यात शेंगदाणे घाला. यामध्ये सर्व मसाले आणि मीठ टाकून थोडा वेळ परतून घ्या. त्यात चिंचेची चटणी आणि हिरवी चटणी घालून मिक्स करा. हे काही वेळ मिक्स करत राहा. वीस मिनिटे साधारण हे राहूद्या. त्यानंतर मस्त गरमा-गरम सर्व्ह करा. या खास मखाना रेसिपीमुळे आपले वजन झपाट्याने कमी होण्यास नक्कीच मदत होईल.
फायदे
मखानामध्ये कमी ग्लायसेमिक इंडेक्स आहे. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी राखली जाते. याशिवाय मॅग्नेशियमचे प्रमाण जास्त आणि सोडियमचे प्रमाण कमी असते. मखानाचे सेवन मधुमेही रुग्णांसाठी अधिक फायदेशीर ठरते. मखानामध्ये भरपूर फायबर असते, त्यामुळे ते पचन प्रक्रिया आणि चयापचय चांगले करण्यास मदत करते. परिणामी आपले वजन झपाट्याने कमी होण्यास मदत होते. याशिवाय अपचन, बद्धकोष्ठता यांसारख्या पोटाच्या समस्या टाळतात. रिकाम्या पोटी मखानाचे सेवन केल्यास आरोग्याच्या अनेक समस्या दूर होण्यासही मदत होते.