Health Care | तुम्हाला वारंवार तहान लागतेय? ‘या’ गंभीर आजाराचेही असू शकते लक्षण

सध्या एप्रिल सुरु आहे. जवळपास सर्वच शहरांमध्ये उन्हाचा पारा चढला आहे. या दिवसांमध्ये वारंवार तहान लागणे अगदी सामान्य आहे. उन्हाळ्यात ‘डिहायड्रेशन’ची समस्या निर्माण होत असते. त्यामुळे पाण्याची तहानही खूप लागते पण काही वेळा पाणी प्यायल्यानंतरही पुन्हा पुन्हा तहान लागल्यास हे एखाद्या गंभीर आजाराचेही लक्षण असू शकते.

Health Care | तुम्हाला वारंवार तहान लागतेय? ‘या’ गंभीर आजाराचेही असू शकते लक्षण
प्रातिनिधीक फोटोImage Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Apr 11, 2022 | 10:30 AM

मुंबई : तीव्र उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे. सूर्य प्रचंड तापत असल्याने सर्वांच्याच जिवाची लाहीलाही होत आहे. दुपारच्या वेळी सूर्य अक्षरश: आग ओकत असल्याने अनेक जण दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे टाळत आहे. सकाळी किंवा सायंकाळीच आपले काम करण्याचा बेत आखत आहेत. उन्हाळ्यात घसा कोरडा होणे आणि सतत तहान लागणे ही अगदी सामान्य बाब आहे. काही वेळा वारंवार तहान (thirsty) लागण्यामागे आपण केलेले जेवणदेखील कारणीभूत असू शकते. उदा. जास्त तुपाचे अन्नघटक खाल्ल्यास किंवा वरणाचे जेवण केल्यावरही वारंवार तहान लागणे शक्य असते. याचा सरळ अर्थ तुमच्या शरीराला पाण्याची गरज आहे, जेणेकरून ‘डिहायड्रेशन’ची (dehydration) समस्या टाळता येईल. परंतु काही वेळा ही एक सामान्य बाब ठरत नाही. घसा वारंवार कोरडा पडणे आणि पाण्याची जास्त तहान लागण, हे एखाद्या मोठ्या आजाराचेही लक्षण (symptom) असू शकते. पाणी प्यायल्यानंतरही तुम्हाला वारंवार तहान लागत असल्यास तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा.

रुग्णांना ज्यावेळी अशी समस्या जाणवेत तेव्हा डॉक्टर पहिल्यांदा मधुमेहाची चाचणी करण्याचा सल्ला देतात. कारण हे लक्षण मधुमेहाच्या सामान्य लक्षणांपैकी एक आहे. परंतु जर तुमची मधुमेहाची चाचणी योग्य असेल आणि तरीही तुम्हाला ही समस्या भेडसावत असेल तर तुम्ही थोडा खोलवर विचार करून या मागील कारण शोधले पाहिजे. पाणी पिऊनही वारंवार तहान लागणे हे आतड्यांसंबंधी काही गंभीर आजाराचे लक्षण असू शकते. वारंवार तहान लागण्याचे एक कारण म्हणजे आतड्याचा कर्करोग असू शकते.

आतड्यांचा कर्करोग शरीरात खूप हळू वाढतो. त्याची लक्षणे बऱ्याच दिवसांनी दिसतात. याचे लवकर निदान झाले तर या गंभीर आजाराचा धोका टळू शकतो. आतड्यांच्या कॅन्सरमध्ये अनेक लक्षणे दिसतात. यात, दुखणे, थकवा जाणवणे, भूक न लागणे, वजन कमी होणे आदींचा समावेश असतो. हा कॅन्सर शरीराच्या इतर भागात पसरल्यास ‘हायपरक्लेसेमिया’ होऊ शकतो. जेव्हा खराब झालेल्या हाडांमधून कॅल्शिअम रक्तात सोडले जाते तेव्हा असे होत असते.

आतड्यांच्या कर्करोगाची लक्षणे

  1. आतड्यांच्या कार्यात बदल होणे.
  2. पोट साफ करताना रक्त येणे.
  3. पोटदुखी, अस्वस्थता आणि सूज येणे.
  4. बद्धकोष्ठता.
  5. गुद्द्वार आणि गुदाशयभोवती ढेकूळ .
  6. वजन कमी होणे.
  7. लघवीतून रक्त येणे, वारंवार लघवीला जाणे.

ही आहेत कारणे

  1. 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना या आजाराची शक्यता वाढते.
  2. रेड मीट किंवा प्रक्रिया केलेले मांस खाणे आणि कमी फायबरयुक्त आहार घेतल्यास आतड्यांचा कर्करोग होउ शकतो.
  3. जास्त वजन असलेल्या आणि लठ्ठ लोकांमध्ये या कर्करोगाचा धोका इतरांपेक्षा जास्त असतो.
  4. जे लोक जास्त मद्यपान करतात त्यांना आतड्यांचा कर्करोग होण्याचा धोका असतो.
  5. ज्यांच्या पालकांना हा आजार झाला आहे, अशा लोकांच्या मुलांना हा आजार होण्याचा धोका जास्त असतो.

संबंधित बातम्या :

भारतातील पहिली एक्स्टेन्डेड रिअॅलिटी लॅब सुरू, कॅन्सरवर होणार आधुनिक उपचार

तुमच्याही शहरात हवेचे प्रदूषण वाढलेय? या आजारांचा धोका वाढण्याची शक्यता…

Tumor : अग्नाशयापासून थेट नसांपर्यंत पसरला ट्यूमर… मग झाले असे काही की…

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.