Health Tips : रात्री उशिरा जेवण करणं टाळा… ‘या’ त्रासापासून स्वत:चा बचाव करा…

सध्या बिझी लाईफस्टाईलमुळे अनेकदा वेळी अवेळी खाल्लं जातं. त्याचा शरिरावर परिणाम होण्याची भिती असते. कधीतरी उशीरा जेवणं ठीक आहे. पण वारंवार असं व्हायला लागलं तर त्याचा तुमच्या शरीरावर परिणाम होतो. त्यामुळे दररोज रात्री उशिरा जेवण करणं टाळलं पाहिजे.

Health Tips : रात्री उशिरा जेवण करणं टाळा... 'या' त्रासापासून स्वत:चा बचाव करा...
Follow us
| Updated on: Apr 04, 2022 | 8:20 AM

मुंबई : सध्या बिझी लाईफस्टाईलमुळे (Busy Lifestyle) अनेकदा वेळी अवेळी खाल्लं जातं. त्याचा शरिरावर परिणाम होण्याची भिती असते. कधीतरी उशीरा जेवणं ठीक आहे. पण वारंवार असं व्हायला लागलं तर त्याचा तुमच्या शरीरावर परिणाम होतो. त्यामुळे दररोज रात्री उशिरा जेवण करणं (Late Meal) टाळलं पाहिजे. रात्री 8 नंतर काहीही खाऊ नये, कारण रात्री उशिरा जेवल्याने अन्न नीट पचत नाही आणि त्यामुळेच पोट वाढणं वजन वाढणं, अश्या समस्या निर्माण होतात, असं तज्ज्ञ सांगतात. फास्ट फूड खाणं टाळायला हवं. हे वारंवार सांगितलं जातं. पण अनेकदा पार्टी किंवा इतर गोष्टींमुळे जेवण उशिरा होतं. त्यासोबत कोल्ड ड्रिंकही घेतलं जातं. हे शरिरासाठी चांगलं नाही. बाहेरचं अन्न खाणं टाळायला हवं. रात्रीचं जेवणं झालं की थोडं चालायला हवं. ते आरोग्यासाठी उत्तम मानलं जातं.

तुम्हीही रोज रात्री उशिरा जेवण करत असाल तर तुम्हाला अॅसिडिटी होऊ शकते. जर तुम्ही दररोज रात्री उशिरा जेवण केलं तर त्यामुळे छातीत जळजळ होते. कधीकधी पोटाशी संबंधित इतर समस्यादेखील उद्भवू लागतात. तुम्हाला कदाचित याची सवय नसेल, पण असे बरेच लोक आहेत जे रात्री खूप जड अन्नपदार्थ खातात. जेवल्यानंतर झोपायलाच पाहिजे असा विचार करून ते जड अन्न सेवन करतात पण आयुर्वेदानुसार रात्री उशिरा जड अन्न खाणे टाळावे. त्यामुळे पोट खराब होऊ शकतं शिवाय गॅसचाही त्रास होऊ शकतो.

आयुर्वेदानुसार रात्री जेवणाची योग्य वेळ म्हणजे सात वाजताची. सात वाजता न जेवता रात्री उशिरा अकरा-बारा वाजता जेवणारे बरेच लोक आहेत. रात्री उशिरा जेवण केल्याने एक नाही तर अनेक समस्या निर्माण होतात.

भारतीय आयुर्वेदात प्रत्येक खाण्यापिण्याची एक वेळ ठरलेली आहे. सूर्यास्ताच्या आधी कोणत्या गोष्टी खाव्यात आणि सूर्यास्तानंतर कोणत्या गोष्टी खाव्यात हे देखील एक संपूर्ण शास्त्र आहे. दिवसाच्या कोणत्या वेळी काय सेवन करणे चांगले? सूर्यास्तानंतर काय खाऊ नये आणि सूर्योदयानंतर काय खावे. आधुनिक जीवनशैलीत, लोकांना या गोष्टी माहित नाहीत किंवा ते त्यांचे पालन करत नाहीत. आयुर्वेदाचे हे सर्व नियम पूर्णपणे समजून घेणे आणि त्यांचे पालन करणे आपल्यासाठी शक्य नाही. पण यापैकी एक गोष्टही आपण आयुष्यात पाळू शकलो तर आरोग्यावर बऱ्याच अंशी सकारात्मक परिणाम होतो.

संबंधित बातम्या

AC : उन्हाळ्यात एसीचा जास्त वापर करताय? सावधान! तुम्हाला ‘या’ गंभीर समस्यांचा सामना करायला लागू शकतो…

Health Tips : टोमॅटो आणि काकडीचा रस चेहऱ्यासाठी आहे खूपच उपयुक्त, जाणून घ्या फायदे…

Red Grapes : लाल द्राक्ष चेहऱ्यासाठी प्रचंड लाभदायी, जाणून घ्या फायदे…

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.