मुंबई : सध्या बरेच लोक अॅसिडिटी (Acidity) आणि पोटातील गॅसच्या समस्येमुळे त्रस्त आहेत. आपल्याला जरी ही तितकीशी गंभीर समस्या वाटत नसली तरी त्याकडे दुर्लक्ष करणं धोक्याचं ठरू शकतं. कठीण समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. आजकाजच्या जीवनशैलीमुळे आणि खानपानाच्या चुकीच्या सवयींमुळे अधिक त्रास होण्याची शक्यता असते. आपली रोजच्या दैनंदिनीतली एक समस्या आपल्या अॅसि़डिटीचं कारण ठरू शकते शिवाय यामुळे गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे काळजी घेणं (Health Tips) गरजेचं आहे.
जर तुम्ही चहा प्रेमी असाल आणि तुम्हाला सकाळी रिकाम्या पोटी चहा प्यायला आवडत असाल तर ही बातमी केवळ तुमच्याचसाठी आहे. त्वरित तुमची ही सवय बदला. रिकाम्या पोटी चहा पिल्यास अॅसिडिटीचा त्रास निर्माण होऊ शकतो. त्यामुळे मळमळणे, छातीत कळ येणे असे प्रकार उद्भवू शकतात. त्यामुळे ही सवय लवकरात लवकर बदला…
फक्त चहाच नाही तर मसालेदार पदार्थ, गरम कॉफी, तेलकट पदार्थ, चॉकलेट इ. या गोष्टी टाळणंही गरजेचं आहे. जर तुम्हाला सकाळी चहाशिवाय राहावत नसेल तर तुम्ही आल्याचा चहा पिऊ शकता. त्यामुळे अॅसिडिटी होण्याची शक्यता कमी असते.
सकाळच्या नाश्त्यामध्ये ओट्सचा समावेश करा. त्यामुळे पोटात गॅस होत नाही आणि पचनक्रियाही चांगली राहाते. शिवाय उकडलेली अंडी खाल्ल्यास पोटाचा त्रास होत नाही आणि हे आरोग्यासाठीही चांगलं असतं. हिरव्या पालेभाज्यांचाही आहारात समावेश करा. त्या आरोग्यासाठी चांगल्या असतात. पालेभाज्या खाल्ल्याने आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतात. शिवाय जेवल्यानंतर फिरायला जा, त्यामुळे अॅसिडिटीचा धोका कमी होतो.