Health Tips: आयुर्वेदात आरोग्यासाठी गुणकारी मानल्या जाणाऱ्या या गोष्टींचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने वाढू शकते तुमची समस्या

निरोगी शरीरासाठी आयुर्वेदात सांगीतलेले काही गोष्टी अत्यावश्यक मानल्या जातात. परंतु त्यांचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने शरीरावर नकारात्मक परिणाम होऊन अनेक प्रकारचे आजार होऊ शकतात. जाणून घ्या, शास्त्रानुसार कोणत्या गोष्टीचे कीती सेवन करावे.

Health Tips: आयुर्वेदात आरोग्यासाठी गुणकारी मानल्या जाणाऱ्या या गोष्टींचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने वाढू शकते तुमची समस्या
AyurvedaImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Aug 12, 2022 | 10:36 PM

आयुर्वेद ही जगातील सर्वात जुन्या वैद्यकीय प्रणालींपैकी एक आहे. ज्याचा उपयोग आरोग्य सुधारण्यासाठी विविध गंभीर आरोग्य समस्यांवर (serious health issues) उपचार करण्यासाठी केला जातो. आयुर्वेदात अशा अनेक औषधांचा उल्लेख आहे ज्या शरीरासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरू शकतात. इतकेच नाही तर गंभीर आजारांवर उपचार करण्यासाठी अनेक औषधे अतिशय प्रभावी असल्याचे अभ्यासात आढळून आले आहे. परंतु, तुम्हाला माहिती आहे का की, या औषधांच्या सेवनाचे फायदे तेव्हाच मिळू शकतात जोपर्यंत त्यांचे सेवन कमी प्रमाणात केले जाते. आयुर्वेदात काही औषधे आणि खाद्यपदार्थांचा अतिरेक (Excess of food) हे आरोग्यासाठी अत्यंत गंभीर आणि हानिकारक असल्याचे वर्णन केले आहे. कोणतेही औषध नेहमी आरोग्य तज्ज्ञांच्या सल्ल्याने आणि त्यांनी सांगितलेल्या प्रमाणानुसारच सेवन करावे, अन्यथा त्याचे अनेक नुकसान (Many losses) होऊ शकतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. आयुर्वेदिक औषधांव्यतिरिक्त हा नियम कोणत्याही खाद्यपदार्थालाही लागू होतो.

ऍपल सायडर व्हिनेगर

ऍपल सायडर व्हिनेगर अनेक प्रकारे फायदेशीर आरोग्य प्रभाव म्हणून ओळखले जाते. रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी, वजन कमी करण्यासाठी, पचन सुधारण्यासाठी आणि कोलेस्टेरॉल-रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासाठी याचा वापर केला जातो. पण याचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास शरीराला अनेक प्रकारे हानी पोहोचते. आयुर्वेदानुसार, हे एक आंबवलेले आणि आम्लयुक्त पेय आहे ज्याचा अतिरेक वात, पित्त आणि कफ या तीनही दोषांवर परिणाम करू शकतो. नियमितपणे याचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने त्वचेची जळजळ आणि पोटात अल्सर होऊ शकतात.

पिंपळीचे अतिसेवन टाळावे

आयुर्वेदात अनेक प्रकारच्या फायद्यांसाठी पिंपळीचा उल्लेख आहे. पदार्थांची चव वाढवण्यासाठी आणि आयुर्वेदिक औषधे तयार करण्यासाठी याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. त्यात ग्लायकोसाइड्स, युजेनॉल्स, अल्कलॉइड्स, टेरपेनॉइड्स सारखे नैसर्गिक संयुगे असतात जे विविध प्रकारचे आरोग्य फायदे देतात. परंतु, या औषधी वनस्पतीच्या अतिसेवनाने वात, पित्त, कफ असंतुलन होऊ शकते. त्यामुळे अपचन, ओटीपोटात दुखणे, खाज सुटणे, त्वचेला लालसरपणा आणि सूज येते.

मीठ संतुलित प्रमाणात आवश्यक

जेवणाची चव वाढवण्यासाठी मीठ आवश्यक आहे. मिठात आयोडीन असते, जे थॉयरॉईड आजारापासून बचाव करण्यासाठी आवश्यक आहे. परंतु हे लक्षात ठेवा की, मीठामध्ये सोडियम देखील असते, जे जास्त प्रमाणात सेवन केल्यास तुमच्या आरोग्यावर हानिकारक परिणाम होऊ शकतात. आयुर्वेदानुसार मिठाच्या अतिसेवनाने रक्तदाब वाढण्याचा धोका वाढतो, जो हृदयविकार वाढवणारा घटक मानला जातो.

गुळवेलच्या प्रमाणाची काळजी घ्या

गुळवेलाचे सेवन शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. गुळवेलमध्ये असलेल्या औषधी गुणधर्माचा शरीराला फायदा होऊ शकतो. पण अधिक फायदे मिळवण्याच्या नादात तुम्ही हे औषध जास्त प्रमाणात घेत आहात का? आयुर्वेद तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, गुळवेलचे जास्त सेवन केल्याने बद्धकोष्ठतेसह रक्तातील साखर कमी होऊ शकते. त्याचा अतिरेक गर्भवती महिलांसाठीही हानिकारक ठरू शकतो.

Non Stop LIVE Update
युगेंद्र पवार यांच्या सभेत शरद पवार यांची रॉयल एन्ट्री... बघा व्हिडीओ
युगेंद्र पवार यांच्या सभेत शरद पवार यांची रॉयल एन्ट्री... बघा व्हिडीओ.
अजित पवारांच्या सभेत मुलगी हरवली? दादा काय म्हणाले? एकदा बघाच...
अजित पवारांच्या सभेत मुलगी हरवली? दादा काय म्हणाले? एकदा बघाच....
दादागिरी वाढली तर उघडावा लागतो तिसरा डोळा अन्...कोल्हेंचा रोख दादांवर?
दादागिरी वाढली तर उघडावा लागतो तिसरा डोळा अन्...कोल्हेंचा रोख दादांवर?.
अजित पवारांच्या बारामतीच्या सांगता सभेला; दादांच्या आईंनी लावली हजेरी
अजित पवारांच्या बारामतीच्या सांगता सभेला; दादांच्या आईंनी लावली हजेरी.
थडग्यावर चादर चढवणारा.., मराठा मोर्चाची कालीचरण महाराजांकडून खिल्ली
थडग्यावर चादर चढवणारा.., मराठा मोर्चाची कालीचरण महाराजांकडून खिल्ली.
'जर ती गोष्ट राज ठाकरे करत असेल तर उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा?'
'जर ती गोष्ट राज ठाकरे करत असेल तर उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा?'.
एक है तो सेफ है घोषणेवरून राहुल गांधींचा निशाणा, थेट तिजोरी ओपन अन्...
एक है तो सेफ है घोषणेवरून राहुल गांधींचा निशाणा, थेट तिजोरी ओपन अन्....
एका मताला 500 रूपये...मतदारसंघात पैशांचं वाटप करणाऱ्याची चांगलीच धुलाई
एका मताला 500 रूपये...मतदारसंघात पैशांचं वाटप करणाऱ्याची चांगलीच धुलाई.
'...तर चुकीचे काय? पवारांमधला जातीवाद उफाळून येतो', फडणवीसांचा घणाघात
'...तर चुकीचे काय? पवारांमधला जातीवाद उफाळून येतो', फडणवीसांचा घणाघात.
पवारांमुळे राष्ट्रपती राजवट लागली? फडणवीस म्हणाले, 100 टक्के खरंय...
पवारांमुळे राष्ट्रपती राजवट लागली? फडणवीस म्हणाले, 100 टक्के खरंय....