‘पिकू’तील बिग बींप्रमाणे तुम्हालाही त्रास होतो? बद्धकोष्ठतेची कारणं आणि उपाय जाणून घ्या

बद्धकोष्ठता म्हणजे मल बाहेर पडण्यास होणारा त्रास. ही समस्या कुठल्याही वयात होऊ शकते. सकाळी उठल्यावर पोट साफ झालं नाही तर दिवस खराब जातो. अगदी याचा कामावरही परिणाम होतो. पोट साफ होत नसेल तर तुम्हाला इतर त्रास होऊ शकतात.

'पिकू'तील बिग बींप्रमाणे तुम्हालाही त्रास होतो? बद्धकोष्ठतेची कारणं आणि उपाय जाणून घ्या
आरोग्य
Follow us
| Updated on: Feb 26, 2022 | 9:28 AM

तुम्हाला बीग बी आणि दीपिका पादुकोण यांचा ‘पीकू’हा पिक्चर आठवतो का?. त्यात बीग बीला बद्धकोष्ठताचा (Constipation) त्रास होतो. आणि त्याचा या समस्येचा त्रास दीपिकाला होत असतो. बद्धकोष्ठता म्हणजे मल बाहेर पडण्यास होणारा त्रास. ही समस्या कुठल्याही वयात होऊ शकते. सकाळी उठल्यावर पोट साफ झालं नाही तर दिवस खराब जातो. अगदी याचा कामावरही परिणाम होतो. पोट साफ होत नसेल तर तुम्हाला इतर त्रास होऊ शकतात. तुम्हाला माहिती आहे आपल्या अनेक आजाराचे पहिले लक्षण (Symptoms) पोट खराब असणे, हे असतं. पोट साफ होण्यासाठी सकस आहाराची (Diet) गरज असते. त्याशिवाय शारीरिक हालचालही महत्त्वाची असते. गेल्या काही काळात ही समस्या वाढली आहे. बदलेली जीवनशैली आणि जंक फूडचं वाढलेले प्रमाण, यामुळे ही समस्या अनेकांना दिसून येते. लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येते.

बद्धकोष्ठताची लक्षणे

  1. पोटदुखी
  2. पोटात कळा
  3. पोट फुगणे
  4. मळमळणे
  5. पोट साफ होण्यास त्रास होणे
  6. भूक न लागणे

बद्धकोष्ठताची कारणे

  1. आतड्यांची हालचाल कमी होणे
  2. सकस आहाराचा अभाव
  3. पाणी कमी पिणे
  4. वजन जास्त किंवा कमी असणे
  5. खाण्यापिण्याचा अयोग्य वेळा
  6. व्यायाम न करणे
  7. पोटाचे विकार
  8. जंक फूडचं अती सेवन
  9. डिप्रेशन, उच्च रक्तदाबवरील औषधांमुळे त्रास
  10. शौचास लागल्यास न जाणे

बद्धकोष्ठतावर घरगुती उपाय

  1. पाणी भरपूर प्या
  2. आहारात फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करा
  3. पाचक पदार्थांचे सेवन करा
  4. नियमित व्यायाम करा
  5. शौचास लागल्यास त्वरित जावे

अळशीचा बिया समस्येवर रामबाण उपाय

– अळशीमध्ये कार्बोहायड्रेट कमी असल्यामुळे पचनक्रिया व्यवस्थित राहण्यास मदत होते. त्यामुळे बद्धकोष्ठतेच्या त्रासावर अळशी फायदेशीर आहे. अळशीच्या बियांचे मिक्सरमध्ये पावडर बनवा. एक चमच पावडर पाण्यात मिक्स करा. आणि तीन ते चार तास ते तसेच राहू द्या. मग हे पाणी गाळून प्या.

मध – आयुर्वेदामध्ये मधाला खूप महत्त्व आहे. मध्यामध्ये अँटीऑक्सिडेंट, अँटीमायक्रोबिअल आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म आहेत. याचा फायदा बद्धकोष्ठता कमी करण्यासाठी होतो. रोज सकाळी एक ग्लास कोमट पाण्यात एकच चमचा मध आणि अर्धा लिंबूचा रस मिक्स करुन प्या. हा उपाय वजन कमी करण्यापासून बद्धकोष्ठतासाठी उत्तम घरगुती उपाय आहे. या समस्येकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. याकडे दुर्लक्ष केल्यास ही समस्या गंभीरस्वरुप घेऊ शकते. जर तुम्हचं एका आठवड्यापेक्षा जास्त वेळा पोट साफ होत नसेल तर तुम्हाला डॉक्टरांकडे जाण्याची गरज आहे.

टीप : या बातमीतील आरोग्यविषयक सल्ला प्राथमिक माहितीच्या आधारावर आहे, या माहितीचा वापर करण्यापूर्वी आपल्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला जरुर घ्यावा.

संबंधित बातम्या : 

पोषण सुरक्षा आणि प्रथिनं स्वयंपूर्णता, विज्ञानाच्या मदतीने महत्त्वाचं पाऊल

Relationship tips: या काही महत्त्वाच्या टिप्स ज्या तुम्हाला सांगतील की तुमचा पार्टनर तुमच्यापासून दुरावला आहे की नाही? जाणून घ्या

थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.