Health Tips: ‘लठ्ठपणा’ ठरू शकतो अनेक धोकादायक आजारांचे माहेर; जाणून घ्या, लठ्ठपणामुळे येणाऱया समस्या !
कोरोनाच्या काळापासून लोकांमध्ये त्यांच्या आरोग्याबाबत दक्षता वाढली आहे. मात्र, आरोग्याकडे दुर्लक्ष केल्याने वजन वाढणे, लठ्ठपणा अशा समस्याही वाढल्या. लठ्ठपणा हे अनेक आजारांचे कारण आहे. जाणून घ्या, लठ्ठपणापाठोपाठ कोणत्या शारीरीक व्याधी येतात.
कोरोनाच्या काळापासून लोकांमध्ये त्यांच्या आरोग्याबाबत दक्षता वाढली आहे. मात्र, आरोग्याकडे दुर्लक्ष केल्याने वजन वाढणे, लठ्ठपणा (obesity) अशा समस्याही वाढल्या. लठ्ठपणा हे अनेक आजारांचे कारण आहे. शरीराचे वजन वाढणे एकूणच आरोग्यासाठी घातक आहे. लठ्ठपणाचे शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या नकारात्मक परिणाम होतात. वाढत्या वजनामुळे अनेक शारीरिक आजारांसोबतच मानसिक दुर्बलताही (mental weakness) येऊ शकते. लठ्ठपणावर मात करण्यासाठी लोक डाएटिंग करायला लागतात. वजन कमी करण्यासाठी तासंतास व्यायामासह अनेक घरगुती उपाय अवलंबले जातात. पण लठ्ठपणा आटोक्यात आणण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी डाएटिंग आणि वर्कआऊट (Dieting and working out) देखील शरीराला हानी पोहोचवू शकतात. लठ्ठपणामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब, ब्रेन स्ट्रोक सह इतरही अनेक समस्या येऊ शकतात. जाणून घेऊया, लठ्ठपणामुळे कोणत्या समस्या येतात.
मधुमेहाचा धोका
लठ्ठपणामुळे मधुमेह होऊ शकतो. शरीरातील रक्तातील ग्लुकोजची सामान्य पातळी 70 ते 120 mg/dL पेक्षा जास्त नसावी. कधीकधी लठ्ठपणामुळे रक्तातील ग्लुकोजच्या पातळीत वाढ झाल्यामुळे टाइप 2 मधुमेह होण्याचा धोका वाढतो. लठ्ठपणा फॅटी ऍसिड वाढण्याचे हे देखील एक कारण आहे. त्यामुळे लठ्ठपणा आटोक्यात न आल्याने मधुमेह होऊ शकतो.
उच्च रक्तदाब समस्या
सतत वजन वाढल्याने उच्च रक्तदाब होऊ शकतो. उच्च रक्तदाबाला हायपरटेन्शन असेही म्हणतात. जर तुमचा रक्तदाब 140/90 mmHg किंवा त्याहून अधिक असेल, तर तुम्हाला सतर्क राहण्याची गरज आहे. लठ्ठपणामुळे रक्तदाब वाढू शकतो.
झोप समस्या
जास्त वजन असल्याने रात्री झोप चांगली येत नाही. याचे एक कारण म्हणजे आतड्यात चरबी जमा झाल्यामुळे रक्तवाहिन्या सामान्यपणे रक्तपुरवठा करू शकत नाहीत आणि झोपेच्या वेळी श्वास घेण्यास त्रास होतो. पुरेशी आणि गाढ झोप न मिळाल्याने स्लीप एपनिया होऊ शकतो.
ब्रेन स्ट्रोकचा धोका
लठ्ठपणामुळे आयसोनिक स्ट्रोकचा धोका वाढू शकतो. जास्त वजन असल्यामुळे मेंदूला पुरेसा रक्तपुरवठा होत नाही. रक्तवाहिन्यांमधील अडथळे रक्तपुरवठा विस्कळित करतात आणि ब्रेन स्ट्रोकचा धोका वाढवतात.
हृदयरोगाचा धोका
वजन वाढल्याने हृदयविकाराची शक्यताही वाढते. लठ्ठपणामुळे हृदयाशी संबंधित समस्या निर्माण होण्याचा धोकाही वाढतो.अँजाइना, हार्ट फेल्युअर, हृदयविकाराचा झटका, हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यताही वाढते.