Health Tips | मुलांची स्मरणशक्ती वाढवायचीय, जाणून घ्या आहारात कोणत्या पदार्थांचा करावा समावेश!

मुलांची स्मरणशक्ती वाढविण्यासाठी, त्यांचा मेंदूला तल्लख करण्यासाठी आहारात काही पदार्थांचा समावेश करा.

Health Tips | मुलांची स्मरणशक्ती वाढवायचीय, जाणून घ्या आहारात कोणत्या पदार्थांचा करावा समावेश!
फोटोःगुगल.
Follow us
| Updated on: Jan 23, 2022 | 11:01 AM

प्रत्येक आई-वडिलांना त्यांचा मुलगा प्रत्येक गोष्टीत हुशार हवा असतो. मात्र, त्या मुलाची जेवढी क्षमता आहे तो त्यानुसार आपलं भविष्य घडवत असतो. आजच्या जगात नुसतं अभ्यासात हुशार असून नाही चालत तर इतर गोष्टीतही तो तल्लख असणं गरजेचं आहे. त्यासाठी खास करुन आई कायम चिंतेत असते. अशावेळी मुलांची स्मरणशक्ती वाढविण्यासाठी, त्यांचा मेंदूला तल्लख करण्यासाठी आहारात काही पदार्थांचा समावेश करा.

1. हिरव्या पालेभाज्या – तज्ज्ञ मुलांना हिरव्या पालेभाज्या खाण्याचा सल्ला देतात. या भाज्यांमध्ये असलेल्या व्हिटामिनमुळे मेंदूला पोषण मिळतं. खासकरुन पालक खाणे चांगले आहेत. पालक खाल्ल्यामुळे मेंदूला मिळणारा रक्तपुरवठा चांगला होता.

2. अंडे – मुलांना रोज अंडी खायला द्या. अंड्यातील कोलिन हे मुलांची स्मरणशक्ती वाढविण्यास मदत करते.

3. ओट्स – हो, ओट्स हे मुलांसाठी खूप पौष्टिक पदार्थ आहे. ओट्समधील व्हिटमिन बी, ई, कॅल्शियम, लोह, फायबर, पोटॅशियम हे स्मरणशक्ती वाढविण्यास फार फायद्याचे आहे.

4. दूध, दही आणि पनीर – या तिघांमध्ये प्रोटीन आणि व्हिटमिन मोठं प्रमाण आहे. जे मुलांच्या मेंदूच्या विकासासाठी खूप महत्त्वाचं आहे.

5. अक्रोड – लहान मुलांना अक्रोड आवडत नाही मात्र हा पदार्थ मुलांची स्मरणशक्ती वाढविण्यात मदत करते. म्हणून अक्रोडचा समावेश आहारात करावा. मुलांना नकळत एखाद्या पदार्थात अक्रोडचा समावेश करा.

6. एव्होकॅडो – हे फळ सध्या सगळीकडे सहज मिळतं. हे फळ मुलांच्या मेंदूसाठी खूप चांगलं आहे. या फळामुळे मुलांनं हायपरटेन्शनपासून दूर राहतात.

7. ऑयली फिश – ऑयली फिशमध्ये ओमेगा-3 फॅटी ऍसिडचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असतं. ते बुद्धी तल्लख करण्यासाठी फायदेशीर आहे. सेल्मन, मॅकेरल, ट्यूना सार्डिन आणि हेरिंग या माशांच्या आहारात समावेश करा. जर तुम्ही मासे खात नाही. तर आजकाल बाजारात ऑयली फिशच्या गोळ्याही मिळतात.

8. ब्लॅकबेरी – यातील अँटीऑक्सिडंट्समुळे मुलांची स्मरणशक्ती वाढविण्यास पोषक आहे. तसंच यातील व्हिटमिन ईमुळे मुलांच्या मेंदूला चांगलं असतं. त्यामुळे मुलांना ब्लॅकबेरी खायला द्या. साधारण 8 ते 10 ब्लॅकबेरी दिवसात खायला पाहिजे.

9. हळद – हळदीमधील करक्युमिन हे मेंदूसाठी खूप चांगलं असतं. म्हणून मुलांना हळदीचं दूध द्यावं.

10. ऑलिव्ह ऑइल – या तेलामधील व्हिटमिन इ, के आणि अँटी ऑक्सिडंट्स मुळे मेंदूचा विकास होता आणि स्मरणशक्ती वाढते.

11. डार्क चॉकलेट – यातही अँटी ऑक्सिडेंट असल्याने तुमची एकाग्रतेची क्षमता वाढते. डार्क चॉकलेटने तणाव कमी होतो.

(टीप : या बातमीतील आरोग्यविषयक सल्ला प्राथमिक माहितीच्या आधारावर आहे, या माहितीचा वापर करण्यापूर्वी आपल्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला जरुर घ्यावा.)

इतर बातम्याः

Balasaheb Thackeray | उभ्या महाराष्ट्रावर गारूड करणारा बाळासाहेब नावाचा झंझावात…!

Nashik Trees | पर्यावरण मंत्र्यांच्या एका सूचनेमुळे 200 वर्षे पुरातन वटवृक्षासह 450 झाडे वाचणार, प्रकरण काय?

Jitendra Awhad | नाशिक महापालिकेने म्हाडाचे 700 कोटींचे नुकसान केले; आव्हाडांचा हल्लाबोल, चौकशी सुरू!

Non Stop LIVE Update
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.