Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sugar Free Food | शुगर फ्री पदार्थांमागे धावणे सोडा, एक-दोन नव्हे, तब्बल 92 साईड इफेक्ट्स

आजकाल आपण सर्वच जण आरोग्याबाबत अत्यंत जागृक असतो. अनेक जण वजन कमी करण्यासाठी गोड पदार्थ, भात खिचडी आदी जेवनातून बाद करतात. साखर नको म्हणून शुगर फ्री पदार्थांना प्राधान्य देत असतात. आजच्या काळात, प्रत्येकाला बाजारात उपलब्ध असलेले पॅकेज केलेले पेय, खाद्यपदार्थ, ज्यूस आणि केक इत्यादींचे सेवन करणे आवडते. जर तुम्हीही या कृत्रिम साखरयुक्त पदार्थांचे सेवन करत असाल तर त्यामुळे शरीराला खूप नुकसान होऊ शकते.

Sugar Free Food | शुगर फ्री पदार्थांमागे धावणे सोडा, एक-दोन नव्हे, तब्बल 92 साईड इफेक्ट्स
शुगर फ्री Image Credit source: Wikipedia
Follow us
| Updated on: Mar 11, 2022 | 11:13 AM

मुंबई : पूर्वी मिठाईच्या स्वरूपात गूळ आणि मधाचा वापर केला जात असे. सध्या पदार्थ गोड करण्यासाठी पांढरी साखर, कृत्रिम गोडवा आणि शुगर फ्रीचा वापर केला जातो. जे लोक आरोग्याबाबत जागरूक आहेत, असे लोक पांढऱ्या साखरेपेक्षा शुगर फ्री आणि त्यापासून बनवलेल्या पदार्थांकडे अधिक वळत असतात. त्यांच्या मते, एक चमचा पांढर्‍या साखरेत सुमारे 18 कॅलरीज (calories) असतात आणि शुगर फ्रीमध्ये शुन्य कॅलरीज असतात. शुगर फ्री पदार्थांमध्ये (Sugar Free Food) कॅलरीज नसतात, परंतु ते शरीराला अनेक प्रकारे हानी पोहोचवते. तुम्हीही शुगर फ्री किंवा शुगर फ्री पदार्थ खाण्याला प्राधान्य देत असाल तर यातून शरीराला होणारे नुकसान (Side Effects) तुम्ही जाणून घेतले पाहिजे.

गोडव्यासाठी या गोष्टी मिसळल्या जातात

बाजारात उपलब्ध असलेल्या शुगर फ्री उत्पादनांमध्ये कृत्रिम गोडवा मिसळला जातो. अशा पदार्थांपासून रासायनिक अणू तयार केले जात असतात. अनेक डाएट सोडामध्ये शुगर फ्री पदार्थदेखील आढळते. अमेरिकेतील पर्ड्यू विद्यापीठाच्या संशोधनानुसार, डाएट सोड्यामुळे लठ्ठपणा, मधुमेह आणि हृदयाशी संबंधित आजार होऊ शकतात. जे लोक वजन कमी करण्यासाठी डाएट सोडा आणि पेये घेतात, त्यांच्यासाठी त्या शुगर-फ्री ड्रिंक्समध्ये साखर दुसऱ्या स्वरूपात समाविष्ठ केली जात असते. त्यामुळे संबंधितांचे वजन कमी होण्याऐवजी वजन वाढू शकते आणि त्यांचे अनेक तोटे देखील शरीराला होऊ शकतात. शुगर फ्री किंवा त्यापासून बनवलेले पदार्थ या प्रकारांमध्ये कृत्रिम गोडवा असतो.

1) एस्पार्टेम

यामध्ये कोला, कोल्ड्रिंक्स, गोड तृणधान्य आदी उत्पादने आढळत असतात. एस्पार्टेम साखरेपेक्षा 200 पट गोड आहे. कोला, कोल्ड्रिंक्स, कृत्रिम धान्यापासून बनवलेले गोड पदार्थ यामध्ये त्याचा वापर केला जातो. हे बेकरी आणि साखर-कार्ब जास्त असलेल्या पदार्थांमध्ये आढळत असते. हे एफडीएद्वारे मंजूर असले तरी काही अभ्यासकांच्या मते, एस्पार्टेमचे किमान 92 दुष्परिणाम आहेत. यामध्ये डोकेदुखी, चिंता, जलद हृदयाचे ठोके, वजन वाढणे, नैराश्य, डोकेदुखी, नैराश्य, अटेन्शन डेफिसिट हायपरएक्टिव्हिटी डिसऑर्डर, चक्कर येणे, अल्झायमर, मल्टीपल स्क्लेरोसिस अशा अनेक विकारांचा समावेश होतो.

2) सुक्रालोज

यामध्ये साखरेच्या ऐवजी बेकरी उत्पादने, डाएट सप्लिमेंट आढळते. सुक्रालोज साखरेपेक्षा 600 पट गोड आहे. हे गोठवलेले दही, च्युइंगम, तसेच बेक केलेले पदार्थ आणि पेस्ट्रीमध्ये वापरले जाते. यापासून बनवलेले पदार्थ जास्त काळ खाल्ल्याने आरोग्याशी संबंधित अनेक समस्या निर्माण होउ शकतात. सुक्रालोजचे जास्त सेवन केल्याने यकृत आणि किडनी संबंधित समस्या तसेच ओटीपोटाचा त्रास आणि अतिसार होऊ शकतो. सुक्रॅलोज असलेल्या गोष्टींचे सेवन केल्याने गोड खाण्याची लालसा वाढते आणि मग गोड खावेसे वाटते. असे केल्यास, त्यामुळे वजन वाढण्याची शक्यता असते. अहवालानुसार, शुगर फ्री टॅब्लेटमध्ये सुक्रालोज अँटीकेकिंग एजंटचा वापर केला जातो.

3) ऐसल्फेम के

यामध्ये डाइट्री सप्लीमेंट, डेजर्ट मिक्स आढळते. ऐसल्फेम साखर पेक्षा 200 पट गोड आहे. यामुळे डोकेदुखी आणि नैराश्य यासारख्या दुष्परिणामांचा सामना करावा लागत असतो. यूएसस्थित सेंटर फॉर सायन्स इन द पब्लिक इंटरेस्टच्या मते, याच्या गोडव्यामुळे कर्करोगाच्या जोखमीवर फारसे संशोधन झालेले नाही. पण ते इन्सुलिन सोडते, त्यामुळे पोट भरलेले वाटत नाही आणि व्यक्तीला भूक लागते. भूक लागल्यास जास्त खाल्ल्यास वजन वाढण्याची शक्यता वाढते.

काय केले पाहिजे?

तज्ज्ञांच्या मते, कृत्रिम साखर असलेले पेय किंवा पदार्थ कधीही खाऊ नयेत. साखर आरोग्यासाठी चांगली मानली जात नाही. त्यामुळे तुम्ही गूळ किंवा मध थोड्या प्रमाणात सेवन करू शकता किंवा फळे खाऊन नैसर्गिक गोडव्याचा आनंद घेऊ शकता. अधिक माहितीसाठी, पोषण तज्ज्ञ किंवा आहारतज्ज्ञांशी संपर्क साधा. सकस आहार घ्या, पालेभाज्या खा, व्यायाम करावा.

(टीप : सदर मजकूर उपलब्ध माहितीच्या आधारे तयार करण्यात आला आहे. कृपया याला कुठल्याही प्रकारचा सल्ला समजू नये, अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

संबंधित बातम्या :

शरीर तंदुरुस्त कसे ठेवायचे? वाचा आयुर्वेदाचा सल्ला आणि निरोगी राहा!

सूज येण्याच्या समस्येने हैराण आहात? मग ‘या’ पदार्थांचा आहारात समावेश करा!

धूम्रपान सोडताना वेळकाळ पाहू नका… अशी मोडा सवय..

आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्...
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्....
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप.
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज.
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार.
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी.
साडीवाली दीदी..शिंदेंनंतर भाजपच्या बड्या महिला नेत्यावर कामराचा निशाणा
साडीवाली दीदी..शिंदेंनंतर भाजपच्या बड्या महिला नेत्यावर कामराचा निशाणा.
पत्रकार परिषदेत उज्वल निकम यांचा मोठा दावा
पत्रकार परिषदेत उज्वल निकम यांचा मोठा दावा.
संभाजीराजे 'वाघ्या'बाबत म्हणाले, 'महाराजांना अग्नि दिला त्यावेळी...'
संभाजीराजे 'वाघ्या'बाबत म्हणाले, 'महाराजांना अग्नि दिला त्यावेळी...'.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 10 एप्रिलला
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 10 एप्रिलला.
'तुम्ही मुसलमांनाना का डॉमिनेट करता?,'शिरसाट आणि आव्हाडांमध्ये खडाजंगी
'तुम्ही मुसलमांनाना का डॉमिनेट करता?,'शिरसाट आणि आव्हाडांमध्ये खडाजंगी.