Constipation | तुमच्या चिमुरड्यांना बद्धकोष्ठाचा त्रास जाणवतोय? 4 घरगुती उपाय ठरतील परिणामकारक

बद्धकोष्ठतेच्या समस्येवर मात करणे सोपे आहे, फक्त यासाठी योग्य दिनचर्या ठेवणे आवश्यक आहे. कृत्रिम उपचारांपेक्षा तुम्ही काही घरगुती उपायांचा अवलंब करून लहान मुलांच्या बद्धकोष्ठतेच्या समस्येवरही मात करू शकता.

Constipation | तुमच्या चिमुरड्यांना बद्धकोष्ठाचा त्रास जाणवतोय? 4 घरगुती उपाय ठरतील परिणामकारक
लहान मुलांमधील बद्धकोष्ठतेच्या समस्येवर घरगुती उपाय
Follow us
| Updated on: Feb 14, 2022 | 10:02 AM

चुकीच्या खानपान पध्दती व्यायामाचा अभाव, आहारात पालेभाज्या, फळे, संपूर्ण धान्य, नट्‌स आदींचा अभाव शरीरात विविध समस्यांची तसेच व्याधींची निर्मिती करीत असतो. त्याचाच एक भाग म्हणजे बद्धकोष्ठ. (constipation) ही समस्या केवळ मोठ्या लोकांनाच नाही तर लहान मुलांनादेखील (child) मोठ प्रमाणात सतावत आहे. लहान मुलांना चुकीच्या आहाराचा सर्वाधिक त्रास होत असतो. त्याच्या आहारात (diet) अशा अनेक गोष्टींचा समावेश होतो, ज्या त्याच्या आरोग्यावर दुष्परिणाम करत असतात. तरीही त्याचा ते आहारात समावेश करीत असतात. लहान मुलांसोबतच मोठ्यांनाही यामुळे पोटदुखी, लठ्ठपणा आणि इतर समस्या होतात. मुलांमध्ये बद्धकोष्ठतेमुळे पोट बिघडते आणि मग त्यांना आवश्‍यकता नसताना औषधी घ्यावी लागत असतात. परंतु अनेकदा घरगुती उपायांनीदेखील तुम्ही बद्धकोष्ठतेच्या समस्येवर मात करू शकतात.

पपई

पपई हे पोटांच्या विकारांसाठी रामबाण औषध मानले जाते. पपईमध्ये असलेले फायबर योग्य प्रमाणात पोटात गेले तर ते निरोगी राहते. जर तुमचे बाळ सहा महिन्यांपेक्षा जास्त असेल तर तुम्ही त्याला पपई देउ शकता. सकाळी बाळाला पपई कूस करुन किंवा नरम भाग कापून तसाच खायला दिल्यास बाळाच्या पोटाच्या सर्व समस्या दूर होतील.

कोमट पाणी ठरते परिणामकारक

लहान मुलांना दररोज प्यायला कोमट पाणी दिले तर ते केवळ त्याच्या पोटासाठीच नाही तर त्वचेसाठीही चांगले असते. बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यासाठी हा एक अतिशय प्रभावी उपाय मानला जातो. पाणी नेहमी कोमट असावे, जास्त गरम पाणी मुलांसाठी अपायकारक ठरु शकते.

दररोज सफरचंद द्यावे

आपल्या आहारात दररोज एका सफरचंदाचा समावेश असावा असे तज्ज्ञ सांगतात. सफरचंद आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. रोज एक सफरचंद खा आणि डॉक्टरांपासून लांब रहा असे म्हटले जात असते. आयुर्वेदात रोज सकाळी उठल्याबरोबर एक सफरचंद खाण्याचा सल्ला दिला जातो. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की सफरचंदात फायबर असते जे शरीरासाठी खूप फायदेशीर असते. त्यामुळे रोज एक सफरचंद खाल्ल्याने अनेक आजारांपासून बचाव होतो. बद्धकोष्ठतेसारख्या समस्यांवरही याचा खूप उपयोग होतो.

शरीर ‘हायड्रेटेड’ ठेवा

अनेक वेळा असे दिसून येते की, लहान मुले एका दिवसात खूप कमी पाणी पित असतात. त्यांना वारंवार पाणी पिण्यासाठी अक्षरश: मागे लागावे लागत असते. मुले कमी पाणी पितात यामुळे त्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास होतो. बाळ सहा महिन्यांपेक्षा जास्त असेल तर त्याला भरपूर पाणी द्या. योग्य प्रमाणात पाणी प्यायल्याने केवळ पोटच नाही तर इतरही अनेक समस्या दूर होतात.

संबंधित बातम्या :

बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय नक्की करून पाहा!

आपल्याला ‘हा’ आजार असेल तर बटाटे खाणे त्वरित थांबवावे, वाचा अधिक!

बद्धकोष्ठतेच्या समस्येला तुमच्यापासून दूर ठेवतील ‘हे’ रस, नियमित करा सेवन!

Non Stop LIVE Update
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.