Health tips : पावसाळ्यात ‘हे’ विशेष चहा बनवा नित्यक्रमाचा भाग; कधीच होणार नाही सर्दी-खोकला आणि फ्लूचा त्रास!

पावसाळ्यात लोकांना खूप लवकर सर्दी होते. यामागील कारण तापमानात सतत होणारा बदल आणि पावसात भिजणे असू शकतो. अशी समस्या टाळायची असेल तर यापैकी एक चहा रोज प्या. जाणून घ्या, या वेगवेगळ्या आरोग्यदायी चहा बद्दल.

Health tips : पावसाळ्यात ‘हे’ विशेष चहा बनवा नित्यक्रमाचा भाग; कधीच होणार नाही सर्दी-खोकला आणि फ्लूचा त्रास!
चहा (फाईल फोटो)Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Jul 11, 2022 | 7:55 PM

मुंबई : पावसाळा आला की, सेाबत सर्दी, खोकला आणि फ्लूचा (Cough and flu) आजार घेवूनच येतो. त्यात कधी कामानिमीत्त बाहेर पडल्यावर तर, कधी उगाच पावसात सापडल्याने पावसात भिजणे आले. विकेंड भटकंतीवर असले अन्‌ पाऊस आलाच तर तो यथेच्छ भिजण्याचा आनंद घेवूनच आलेला असतो. भिजून झाल्यानंतर मात्र, दुसरा दिवस सर्दी-खोकला आणि ताप ठरलेला. अशा वेळी आपण काही आरेाग्यदायी चहांचे सेवन (Consumption of healthy tea) केले तर, आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक ठरतात. चहा ही अशीच एक गोष्ट आहे ज्याशिवाय आपला दिवस सुरू होत नाही. गरमागरम चहा आणि पिणे सर्वांनाच आवडते, विशेषतः पावसाळ्यात. चहाचे फायदे आपल्या सर्वांना माहित आहेत. चहा तुम्हाला रिफ्रेश करण्यासोबतच दिवसभर एनर्जी (Energy throughout the day) देण्याचं काम करतो. आजही बहुतेक लोक दुधासोबत नियमित चहा पितात, परंतु कदाचित तुम्हाला माहित नसेल की, चहाचे अनेक आरोग्यदायी पर्याय आहेत. जर तुम्हाला चहा पिण्याची आवड असेल तर तुम्ही हे आरोग्यदायी पर्याय वापरून पाहू शकता.

सुंठाचा चहा

औषधी गुणधर्मांनी समृद्ध अशा सुंठाची पावडर तुम्हाला बाजारात सहज मिळेल. हे बनवताना पाण्यात धणे, काळीमिरी, जिरेपूड आणि साखर वापरा. हा आरोग्यदायी चहा सकाळी लवकर प्या.

तुळशीचा चहा

सर्दी आणि कफ याच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी तुळशीचा वापर फार पूर्वीपासून केला जातो. तुम्हाला हवे असल्यास पावसात तुळस घालून दुधाचा चहा किंवा काळा चहा पिऊ शकता. हा चहा तुमची प्रतिकारशक्ती वाढवेल आणि तुम्हाला सर्दी होण्यापासून वाचवेल.

जेष्ठमध चहा (मुलेठी)

घसादुखीच्या उपचारासाठी स्वदेशी पद्धतींपैकी एक म्हणजे जेष्ठमध चहाची कृती. तुम्ही दुधाशिवाय जेष्ठमध (लिकोरिस) चहा बनवू शकता आणि पावसाळ्यात दररोज सेवन करू शकता.

कॅमोमाइल चहा

हा एक प्रकारचा हर्बल चहा आहे, जो जगभरातील लोक निरोगी राहण्यासाठी दररोज पितात. विशेष म्हणजे ते आता बाजारात सहज उपलब्ध आहे. कॅमोमाइल चहा प्यायल्याने तुमची रोगप्रतिकारक शक्ती सुधारेल आणि आरोग्याशी संबंधित समस्या तुमच्यापासून दूर राहतील.

काळा चहा

काळा चहा जगातील लोकप्रिय चहापैकी एक आहे. या चहासोबत तुम्ही आले आणि वेलची वापरू शकता. काळ्या चहाला जपानमध्ये रेड टी म्हणून ओळखले जाते. हा चहा प्यायल्याने मधुमेह, उच्च कोलेस्ट्रॉल, किडनी स्टोन आणि इतर आजारांचा धोका कमी होतो.

गवती चहा

हर्बल चहामध्ये कोरडी औषधी वनस्पती, फळे, फुले, आले, पेपरमिंट, हिबिस्कस फुले, लिंबाचा रस मिसळून तयार केला जातो. या चहामध्ये चहाची पाने वापरली जात नाहीत. त्यात कॅफिन नसते. या चहाला औषधी वनस्पती आणि फुलांचा वास येतो. नियमित चहापेक्षा हर्बल चहा पिणे अधिक फायदेशीर आहे. यासोबतच ते आजारांपासूनही दूर राहण्यास फायदेशीर आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.