वजन कमी करण्यासाठी अंडी उत्तम! पण कशासोबत खाणार? वाचा
चला तर मग जाणून घेऊया असा कोणता आहार आहे जो आपल्याला वजन कमी करण्यास मदत करतो. एका आहारतज्ञाने सांगताना सांगितलं की, जर आपण काही खास पद्धतीने अंडी खाल्ली तर वजन कमी होण्यास मदत होईल.
लठ्ठपणा कोणत्याही माणसासाठी शाप ठरू शकतो कारण वजन वाढल्यानंतर मधुमेह, उच्च कोलेस्ट्रॉल, उच्च रक्तदाब, हृदयविकाराचा झटका, ट्रिपल व्हेसल डिसीज आणि कोरोनरी आर्टरी डिसीज सारख्या आजारांचा धोका लक्षणीय वाढतो. त्यामुळे वेळीच त्याला लगाम घालणे गरजेचे आहे, अन्यथा तोटा जवळपास निश्चित आहे. चला तर मग जाणून घेऊया असा कोणता आहार आहे जो आपल्याला वजन कमी करण्यास मदत करतो. एका आहारतज्ञाने सांगताना सांगितलं की, जर आपण काही खास पद्धतीने अंडी खाल्ली तर वजन कमी होण्यास मदत होईल.
अंडी सुपरफूड मानली जातात आणि बऱ्याच लोकांसाठी हे नियमित ब्रेकफास्ट फूड आहे, ते प्रथिने समृद्ध आहे. उकडलेले अंडे, ऑमलेट, भुर्जी आणि अंडा करी अशा अनेक प्रकारे अंडी खाल्ली जाऊ शकतात. मात्र 3 गोष्टींच्या कॉम्बिनेशनमध्ये अंडी शिजवल्यास वजन कमी होण्यास मोठ्या प्रमाणात मदत होईल.
- नारळ तेल : आपल्यापैकी बऱ्याच जणांना नारळ तेलाचे फायदे माहित आहेत, त्यात सॅच्युरेटेड फॅट नगण्य असते. त्यामुळे खोबरेल तेलात ऑमलेट शिजवल्यास वजन कमी करणे सोपे जाईल.
- काळी मिरी: उकडलेल्या अंड्यावर किंवा ऑमलेटवर तुम्ही अनेकदा मिरची पूड शिंपडली असेल. यामुळे अंड्याची टेस्ट तर वाढतेच, शिवाय ते अधिक निरोगी ही बनते. मिरचीमध्ये पिपेरिन नावाचे कंपाऊंड असते, ज्यामुळे त्याची चव कडू असते. हा मसाला पोट आणि कमरेभोवतीची चरबी कमी करण्यास मदत करतो.
- शिमला मिरची: आपण अनेकदा पाहिलं असेल की अनेक रेस्टॉरंट्समध्ये शिमला मिरची टाकली जाते, ती सुंदर दिसते आणि आरोग्यासाठीही फायदेशीर असते. अशा प्रकारे तुम्ही घरीही स्वयंपाक करू शकता. शिमला मिरचीमध्ये व्हिटॅमिन सी असते जे चरबी कमी करण्यास मदत करते. रोज अंडी आणि शिमला मिरची एकत्र करून खाल्ल्यास वजन कमी करणे सोपे जाईल.
(डिस्क्लेमर: दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.आम्ही याला दुजोरा दिलेला नाही.)