पोटाची चरबी कमी करण्यासाठी 4 हेल्दी ड्रिंक्स!
आता प्रत्येकाला सकाळी किंवा संध्याकाळी धावणे किंवा जिममध्ये तासंतास घाम गाळणे शक्य होत नाही. याशिवाय सेलिब्रिटींप्रमाणे प्रत्येकजण 24 तास आहारतज्ञांच्या देखरेखीखाली राहू शकत नाही. अशात जर तुम्हाला वजन सहज कमी करायचं असेल तर सकाळी उठून काही खास ड्रिंक्स पिण्यास सुरुवात करा.
मुंबई: आपल्यापैकी बहुतेकांना आपलं शरीर फिट आणि टोन्ड दिसावं असं वाटतं, पण अनेकदा अस्वास्थ्यकर खाण्याच्या सवयीमुळे आपल्या पोटाभोवती आणि कंबरेभोवतीची चरबी वाढते आणि मग शरीराचा एकंदर आकार बिघडतो. त्याचा परिणाम आपल्या सौंदर्यावरही होतो. आता प्रत्येकाला सकाळी किंवा संध्याकाळी धावणे किंवा जिममध्ये तासंतास घाम गाळणे शक्य होत नाही. याशिवाय सेलिब्रिटींप्रमाणे प्रत्येकजण 24 तास आहारतज्ञांच्या देखरेखीखाली राहू शकत नाही. अशात जर तुम्हाला वजन सहज कमी करायचं असेल तर सकाळी उठून काही खास ड्रिंक्स पिण्यास सुरुवात करा.
1. ग्रीन टी ग्रीन टी
ग्रीन टी हा नेहमीच दूध आणि साखरेच्या चहा ऐवजी एक उत्तम पर्याय मानला जातो, म्हणून दररोज सकाळी रिकाम्या पोटी ग्रीन टी प्यावी जेणेकरून आपण फिट राहू शकाल. याची चव कडू असली तरी वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी खूप प्रभावी आहे.
2. लिंबूपाणी
वजन कमी करण्याचा अत्यंत स्वस्त पर्याय आहे. यासाठी सकाळी उठून एक ग्लास कोमट पाण्यात एक लिंबू पिळून त्यात काळे मीठ मिसळून प्यावे. असे नियमित केल्याने वजन बऱ्याच अंशी कमी होईल.
3. ओव्याचं पाणी
ओवा हा जवळजवळ प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात आढळणारा मसाला आहे. हे खाल्ल्याने मेटाबॉलिक रेट वाढतो, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. एक ग्लास पाण्यात ओवा टाकून रात्रभर भिजत ठेवा आणि सकाळी फिल्टर करून प्या.
4. बडीशेपचे पाणी
बडीशेप बऱ्याचदा जेवणानंतर खाल्ली जाते, कारण ती नैसर्गिक माउथ फ्रेशनर म्हणून वापरली जाते. एक ग्लास पाण्यात एक चमचा बडीशेप मिसळून रात्रभर भिजत ठेवा. सकाळी गाळून ते पाणी प्या.
(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)