Healthy Lifestyle | वाढत्या वायुप्रदूषणात तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढवतील ‘ही’ पदार्थ; आहारात नक्की करा समावेश..
दिवाळीमध्ये फटाके जास्त प्रमाणात वापरल्यामुळे अनेक भागांमध्ये वायुप्रदूषण झाले आहे. वायुप्रदूषणमुळे अनेकांना श्वासाचे आजार झाल्याचे पाहायला मिळत आहेत. अशा परिस्थितीमध्ये आहारात योग्य प्रमाणात पोषण घेणे आवश्यक आहे.
आपल्या देशातील काही भागांमध्ये फटाक्यांच्या धुरामुळे हवेत वायुप्रदूषण झालेलं पाहायला मिळत आहे. दिल्ली – मुंबईसह भारतातील उत्तर भागामध्ये प्रदूषणाची पातळी वाढल्याची पाहायला मिळत आह. तज्ञांच्या मतानुसार, दिवाळीनंतर या भागांमधील हवा जास्त प्रमाणात विषारी झाल्याचे सांगितले जाते. अशा परिस्थितीमध्ये घरातील जेष्ठांची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. वातावरणातील प्रदूषणामुळे जेष्ठांच्या आणि लहान मुलांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात.
वायुप्रदूषणामुळे झालेल्या आजारांपासून वाचण्यासाठी योग्य आणि पोषक आहार घेणे अत्यंत आवश्यक असते. पोष्टिक आहारामुळे तुमच्या शरीराची उर्जा वाढते. तुमच्या घरातील जेष्ठांच्या आणि लहान मुलांच्या आहारामध्ये कोणत्या पोष्टिक घटकांचा समावेश कराव. चला जाणून घेऊया.
‘या’ पदार्थांचा आहारात करा समावेश
सर्वप्रथम घरातील जेष्ठांच्या आहारामध्ये प्रोटिनची कमतरता नसली पाहिजे. आहारात नेहमी प्राथिने आणि फायबरचा समावेश असावा. यामुळे शरीरातील स्नायु बळकट होण्यास मदत होते त्यासोबतच फायबरमुळे शरीरात कॅलरीज नियमित रहाण्यास मदत होते. तुमच्या आहारात पालक, मेथी, मोहरी या भाज्यांचा समावेश करा. हिरव्या भाज्यांचा आहारात समावेश केल्यामुळे शरीराला योग्य प्रमाणात कॅल्शियम मिळण्यास मदत होते. हिरव्या भाज्या खाल्ल्यामुळे तुमचं शरीर, केस आणि त्वचा निरोगी रहाण्यास मदत होते.
तुमच्या शरीराला योग्य पोषण मिळण्यासाठी आहारात संत्री, किवी लिंबू अशा फळांचा समावेश करावा. या फळांच्या सेवनामुळे शरीरात योग्य प्रमाणात अँटिऑक्सिडेंट्स आणि फायबर मिळतात. फळांचा आहारात समावेश केल्यामुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत होते.
आहारात दही आणि प्रोबायोटिक्स पदार्थांचे समावेश केल्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत होते आणि शरीरातील संसर्गाचा धोका कमी होतो. दररोज झोपण्यापूर्वी गरम दुधामध्ये हळद मिसळून त्या दुधाचे सेवन करावे. हळदीमध्ये अँटि बॅक्टिरियल घटक आढळतात ज्यामुळे संसर्गाचे आजार कमी होण्यास मदत होतात. रात्रीच्या वेळी शक्यतो घराबाहेर पडू नका. घरच्या घरी हलका व्यायाम केल्यामुळे तुमच्या शरीराला उर्जा मिळण्यास मदत होईल. दररोज सकाळी नियमित व्यायाम केल्यामुळे तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढते त्यासोबतच शरीर निरोगी रहाण्यास मदत होते.