Heart attack : हृदयविकाराचा झटका टाळायचा असेल; तर, डॉक्टरांनी सांगीतलेल्या ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात!

गेल्या काही वर्षांत हृदयविकाराच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. चुकीची जीवनशैली, चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे असे होत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. जाणून घ्या, हदयविकाराचा झटका टाळण्यासाठी, कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात.

Heart attack : हृदयविकाराचा झटका टाळायचा असेल; तर, डॉक्टरांनी सांगीतलेल्या ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात!
Heart AttackImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Aug 11, 2022 | 11:20 PM

मुंबई : प्रसिद्ध कॉमेडियन आणि अभिनेते राजू श्रीवास्तव (Actor Raju Srivastava) यांना बुधवारी हृदयविकाराचा झटका आला. 58 वर्षीय राजू श्रीवास्तव जिममध्ये व्यायाम करत होते आणि याच दरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना एम्समध्ये व्हेंटिलेटरवर दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. गेल्या काही वर्षांपासून लहान वयातच लोकांना हृदयविकार होत असल्याचे दिसून येत आहे. कोविडनंतर ही समस्या खूप वाढली आहे. मात्र, काही खबरदारी घेतल्यास हृदयविकाराचा धोका (Risk of heart disease) टाळता येऊ शकतो, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. दिल्लीच्या जीबी पंत हॉस्पिटलच्या कार्डिओलॉजी विभागाचे डॉ. मोहित गुप्ता यांनी लोकांना काही नियमांचे पालन (Follow the rules) करण्याचा सल्ला दिला आहे. खाण्यापिण्याच्या सवयींमुळे असे होत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. जाणून घ्या, हदयविकाराचा झटका टाळण्यासाठी, कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात.

डॉक्टरांच्या सल्ल्याने हृदयविकार टाळता येतील

  1. जर डॉक्टरांनी डी-डायमर चाचणीचा सल्ला दिला असेल, तर तुम्ही ती त्वरीत करा. दुर्लक्ष करू नका.
  2. वयाच्या तीसाव्या वर्षी, आपल्या आरोग्यावर विशेष लक्ष देण्याची आणि निरीक्षण करण्याची आवश्यकता आहे.
  3. व्यायाम करा पण हळूहळू वाढवा, अचानक क्षमतेपेक्षा जास्त व्यायाम केल्याने हृदयाचे नुकसान होऊ शकते.
  4. रक्त तपासणी, साखर तपासणी, ईसीजी आणि कौटुंबिक इतिहास लक्षात ठेवा.
  5. ट्रेडमिलवर धावताना जास्त व्यायाम करू नका आणि आपल्या क्षमतेची काळजी घ्या
  6. सुडौल शरीर मिळवण्यासाठी चुकीच्या सप्लिमेंट्स वापरू नका

तज्ज्ञ काय म्हणतात?

राजीव गांधी रुग्णालयाच्या कार्डिओलॉजी विभागाचे डॉ. अजित जैन सांगतात की, जिम करताना काळजी घ्यायला हवी. अचानक खूप वेगवान व्यायाम करू नका. यामुळे शरीरात ऑक्सिजनची गरज वाढते, ज्यामुळे फुफ्फुसांवर परिणाम होतो आणि हृदयाची गती वाढते. खूप जास्त व्यायाम केल्याने हृदयाच्या ऊतींमध्ये ऑक्सिजनची कमतरता होऊ शकते, ज्यामुळे ह्रदयाचा अतालता होऊ शकतो, ज्यामुळे मृत्यू होऊ शकतो. म्हणूनच व्यायामशाळेत कधीही अचानक वेगवान व्यायाम करू नका हे महत्त्वाचे आहे.

लक्षणांबद्दल जागरूक असणे महत्वाचे आहे

डॉ. जैन यांच्या मते हृदयविकाराच्या लक्षणांबाबत लोकांना जागरुक असणे गरजेचे आहे. अनेकवेळा असे दिसून येते की, लोक छातीत दुखण्याकडे दुर्लक्ष करतात. जे हार्ट अटॅकचे प्रमुख लक्षण आहे. त्यामुळे निष्काळजी न राहणे महत्त्वाचे आहे. यापैकी कोणतीही लक्षणे दिसल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या

ही आहेत हृदयविकाराची लक्षणे

>> छाती दुखणे

>> श्वास लागणे

>> मळमळ

>> थकवा

>> डाव्या हाताला वेदना

>> घाम येणे

>> अस्वस्थता

आहाराची विशेष काळजी घ्या

डॉ. जैन यांच्या मते हृदयविकार टाळण्यासाठी आहाराची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. जेवणात तेल, तूप आणि मैद्याचा वापर कमीत कमी करा. तुमच्या आहारात पुरेशा प्रमाणात प्रथिने आणि जीवनसत्त्वांचा समावेश करा. दररोज किमान अर्धा तास व्यायाम करा. धूम्रपान आणि अल्कोहोलचे सेवन करू नका. मानसिक ताण घेऊ नका आणि जीवनशैली योग्य ठेवा.

श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.