हार्ट ब्लॉकेजची लक्षणे कोणती? जाणून घ्या
Heart blockages symptoms: हिवाळ्यात तापमान कमी असते. यामुळे हिवाळ्यात हृदयविकाराचा धोका जास्त असतो. हार्ट ब्लॉकेज हे हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमुख कारण आहे. अशावेळी आपल्याला त्याच्या लक्षणांची जाणीव असणे गरजेचे आहे. हार्ट ब्लॉकेजची लक्षणे कोणती? यावर सविस्तर जाणून घेऊया.
Heart blockages symptoms: देशातील अनेक भागात सध्या कडाक्याची थंडी जाणवत आहे. कमी तापमानात हृदयरोगाचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या रिपोर्टनुसार उन्हाळ्याच्या तुलनेत या ऋतूत हृदयविकाराचा धोका 30 टक्क्यांनी वाढतो.
हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमुख कारण म्हणजे हृदयाच्या नसांमध्ये अडथळा म्हणजेच हार्ट ब्लॉकेज हा आहे. ब्लॉकेजमुळे हार्ट फेल्युअर देखील होऊ शकते. हिवाळ्यात हृदयविकाराचा झटका का येतो आणि हार्ट ब्लॉकेजची लक्षणे काय आहेत याबद्दल जाणून घ्या.
हिवाळ्यात कमी तापमानामुळे हृदयाच्या नसा आकुंचन पावतात. यामुळे रक्तप्रवाह योग्य होत नाही. रक्ताभिसरण योग्य नसल्यामुळे हार्ट अटॅक किंवा हार्ट फेल्युअरचा धोका असतो. ब्लॉक झालेल्या मज्जातंतूंमुळे हृदयविकाराचा झटका येतो.
अशा वेळी हार्ट ब्लॉकेजच्या लक्षणांबाबत जागरूक असणं गरजेचं आहे. ते वेळीच ओळखले तर हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका सहज टाळता येतो.
हार्ट ब्लॉकेजची लक्षणे कोणती?
दिल्लीच्या आरएमएल हॉस्पिटलमधील कार्डिओलॉजी विभागाचे प्राध्यापक डॉ. तरुण कुमार सांगतात की, हार्ट ब्लॉकेजचे सर्वात सामान्य लक्षण म्हणजे छातीत दुखणे. ज्यामध्ये तुम्हाला अनेकदा छातीवर दबाव किंवा घट्टपणा जाणवतो. जर तुम्हाला गॅसची समस्या नसेल आणि छातीत सतत दुखत असेल तर ताबडतोब हॉस्पिटलमध्ये जा.
हार्ट ब्लॉकेजच्या इतर लक्षणांबद्दल बोलायचे झाल्यास, हार्ट ब्लॉकेजमुळे श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो, विशेषत: जेव्हा आपण हलका व्यायाम करता किंवा थोडे वेगाने चालत असाल. तसेच आपल्या हृदयाचे ठोके अचानक वेगवान होणार नाहीत याची ही काळजी घ्या. हे हार्ट ब्लॉकेजचे लक्षण देखील असू शकते. हार्ट ब्लॉकेजमुळे थकवा येऊ शकतो, विशेषत: जेव्हा आपण व्यायाम करता किंवा तणावग्रस्त असता, अशा वेळी हार्ट ब्लॉकेजचा धोका अधिक असतो.
हार्ट ब्लॉकेजपासून कसे दूर रहाल?
खाण्यापिण्याची काळजी घ्या नियमित व्यायाम करा धुम्रपानापासून दूर राहा. मानसिक ताण घेऊ नका वर्षातून एकदा हृदयाची तपासणी करून घ्या अल्कोहोलचे सेवन मर्यादित करा कोणतीही लक्षणे दिसताच उपचार घ्या
हिवाळ्यात हृदयविकाराचा झटका का येतो आणि हार्ट ब्लॉकेजची लक्षणे काय आहेत, याविषयीची माहिती आम्ही वर दिली आहे. आता तुम्ही देखील वरील माहिती वाचून काळजी घेऊ शकता. पण, लक्षात घ्या की, कोणतीही गोष्ट करताना आरोग्यतज्ज्ञांचा सल्ला गरजेचा आहे.
(डिस्क्लेमर: या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)