हार्ट फेल्युअर रुग्णांसाठी खूशखबर, हृदयाच्या स्नायूंची पुनर्बांधणी शक्य, ‘हे’ संशोधन वाचा
हार्ट फेल्युअर रुग्णांसाठी खूशखबर आहे. आता हृदयाच्या स्नायूंची पुनर्बांधणी शक्य आहे. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात असे समोर आले आहे की, कृत्रिम हृदय असलेल्या रुग्णांमध्ये हृदयाच्या स्नायूंच्या नवीन पेशी सामान्य हृदयाच्या तुलनेत सहा पट वेगाने तयार होत असतात. जाणून घेऊया.
आज आम्ही तुम्हाला हार्ट फेल्युअर याविषयी माहिती देणार आहोत. तसेच एका नव्या संशोधनाविषयी देखील सांगणार आहोत. हार्ट फेल्युअर हा एक गंभीर आजार आहे. तुम्हाला आम्ही माहिती देऊ इच्छितो की, अमेरिकेत 7 दशलक्ष प्रौढांना प्रभावित करतो आणि दरवर्षी 14 टक्के मृत्यूस कारणीभूत ठरतो. आतापर्यंत हार्ट फेल्युअरवर कायमस्वरूपी इलाज नव्हता आणि त्याच्या उपचारासाठी औषधे, हृदय प्रत्यारोपण किंवा लेफ्ट व्हेंट्रिक्युलर असिस्ट डिव्हाइस (LVAD) हे एकमेव पर्याय उपलब्ध होते. पण, आता त्यावर एक नवे संशोधन समोर आले आहे. याविषयी पुढे विस्ताराने जाणून घेऊया.
अॅरिझोना युनिव्हर्सिटीच्या सर्व्हर हार्ट सेंटरच्या एका नव्या अभ्यासात एक धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. कृत्रिम हृदयाशी संबंधित काही रुग्णांमध्ये हृदयाचे स्नायू पुन्हा तयार होऊ शकतात, असे अभ्यासात आढळून आले आहे. सर्क्युलेशन नावाच्या मेडिकल जर्नलमध्ये हा अभ्यास प्रसिद्ध झाला आहे.
हृदयाच्या स्नायूंची पुनर्बांधणी
या अभ्यासात संशोधकांनी युटा विद्यापीठाच्या आरोग्य विभागातील कृत्रिम हृदयरुग्णांच्या ऊतींचे नमुने घेतले. कार्बन डेटिंग तंत्राचा वापर करून शास्त्रज्ञांनी हृदयात नवीन पेशी तयार होत आहेत की नाही, याचा अभ्यास केला. यावेळी त्यांच्या लक्षात आले की, काही रुग्णांमध्ये हृदयाच्या स्नायूंची पुनर्बांधणी होत आहे, तर काहींमध्ये ही प्रक्रिया होत नाही.
कृत्रिम हृदयाचे परिणाम
या अभ्यासाने असेही सूचित केले आहे की, कृत्रिम हृदय कदाचित हृदयाच्या स्नायूंना “बेड रेस्ट”ची संधी प्रदान करीत आहे, जसे दुखापतीनंतर विश्रांती घेतल्यास कंकालस्नायू बरे होतात. तज्ज्ञांच्या मते, विश्रांतीअभावी जन्मानंतर लगेचच हृदयाच्या स्नायूंची पुनर्बांधणी करण्याची क्षमता नष्ट होते.
हार्ट फेल्युअरच्या उपचारात मदत होईल?
या अभ्यासाने एक महत्त्वाचे पाऊल उचलले असले तरी कृत्रिम हृदय असलेल्या रुग्णांपैकी केवळ 25 टक्के रुग्णांनीच ही पुनर्रचना क्षमता दाखविली असल्याचे संशोधनात नमुद आहे. मोजकेच रुग्ण ही क्षमता का दाखवतात आणि ही प्रक्रिया सर्व रुग्णांपर्यंत कशी पोहोचवता येईल हे समजून घेणे हे त्यांचे पुढील ध्येय आहे. ही माहिती हृदय अपयशाच्या उपचारांसाठी नवीन उपचार पद्धती विकसित करण्यास मदत करू शकते.
आतापर्यंत हार्ट फेल्युअरवर कायमस्वरूपी इलाज नव्हता आणि त्याच्या उपचारासाठी औषधे, हृदय प्रत्यारोपण किंवा लेफ्ट व्हेंट्रिक्युलर असिस्ट डिव्हाइस (LVAD) हे एकमेव पर्याय उपलब्ध होते. पण, कार्बन डेटिंग तंत्राचा वापर करून शास्त्रज्ञांनी हृदयात नवीन पेशी तयार होत आहेत की नाही, याचा अभ्यास केला. यावेळी हृदयाच्या स्नायूंची पुनर्बांधणी होत आहे. त्यामुळे हे संशोधन फायदेशीर ठरू शकतं.
(डिस्क्लेमर: या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)