हिवाळ्यात पोटातील अपचनाच्या समस्या सतावत आहेत, करा हे घरगुती उपाय

हिवाळ्यात तुमचे अन्न निरोगी ठेवणे गरजेचे आहे. त्याचबरोबर पचनक्रिया सुधारण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवल्या जाऊ शकतात. अपचन, गॅस आणि सूज येण्याची समस्या असेल तर काही घरगुती उपाय लवकर आराम देण्यासाठी खूप प्रभावी आहेत.

हिवाळ्यात पोटातील अपचनाच्या समस्या सतावत आहेत, करा हे घरगुती उपाय
Follow us
| Updated on: Nov 18, 2024 | 6:41 PM

आपल्यातील प्रत्येकाना मसालेदार पदार्थ खायला खूप आवडतात आणि त्याचबरोबर फ्राय फूडपासून डेझर्टपर्यंतही अनेक पदार्थ भरपूर खाल्ले जातात. हिवाळा आला की आहारात बदल करून लोकं पुरी-भजीपासून ते बटाट्याचे पराठे, पकोडे अशा गोष्टी खायला लागतात. त्यामुळे पचनक्रियेवर अधिक ताण पडतो आणि अपचन, सूज येणे, गॅस यासारख्या समस्या उद्भवू लागतात. यासाठी हिवाळ्यात तुमचे अन्न निरोगी ठेवणे गरजेचे आहे. त्याचबरोबर पचनक्रिया सुधारण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवल्या जाऊ शकतात. अपचन, गॅस आणि सूज येण्याची समस्या असेल तर काही घरगुती उपाय लवकर आराम देण्यासाठी खूप प्रभावी आहेत.

आपण जेव्हा घराबाहेर पडतो तेव्हा तुमची आवडती गोष्ट पाहिल्यानंतर स्वत:ला थांबवणं अवघड होऊन बसतं आणि त्यामुळे लोकं कधी कधी थोडं जास्त खातात. त्यामुळे पोटात जडपणा, वेदना, ॲसिडिटी अशा समस्या उद्भवतात. हिवाळ्यात लोकं गोड पदार्थ देखील खाण्यास सुरुवात करतात, अशा वेळी जर तुम्हाला पचनाची समस्या असेल तर काही घरगुती उपाय आराम देऊ शकतात, तर चला जाणून घेऊया.

बेकिंग सोडा

कधी कधी जेवण झाल्यानंतर पोटात अपचन किंवा गॅसची समस्या होत असेल तर बेकिंग सोडा उपाय तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतो. यासाठी एक छोटा अर्धा चमचा बेकिंग सोडा घेऊन सुमारे ११८ मिली कोमट पाणी घ्यावे. त्याचे एकत्र सेवन करा. यामुळे अल्पावधीतच आराम मिळतो. मात्र हा उपाय जास्त प्रमाणात करू नये आणि मुलांवर ही रेसिपी ट्राय करू नका.

मेथीदाणा उपाय

अपचनासाठी मेथीदाणे तुम्हाला खूप उपयोगी पडू शकतात. पोटात पेटके, सूज येण्यासह मळमळ यापासून आराम मिळवण्यासाठी एक चमचा मेथीदाणे पूड करून पाण्यात टाकून किमान १० मिनिटे उकळून घ्यावेत. पाणी उकल्यानंतर थोडे थंड होऊ द्यावे आणि पाणी कोमट झाल्यावर या पाण्याचे सेवन करा.

आले देखील फायदेशीर आहे

पचनाच्या समस्या दूर करण्यासाठीही आलं फायदेशीर असून हिवाळ्यात हे शरीर उबदार ठेवण्याचंही काम करते. जेवण झाल्यानंतर पोटात जडपणा आणि वेदना जाणवत असतील तर आल्याचा एक छोटा तुकडा दीड कप पाण्यात उकळून घ्या म्हणजे एक-सव्वा कमी पाणी शिल्लक राहील. ते पाणी गाळून घेऊन त्यात थोडे मध आणि लिंबाचा रस घालून पिऊन घ्या.

पचनक्रिया व्यवस्थित ठेवण्यासाठी करा ‘या’ गोष्टी

कमी पाणी प्यायल्याने पचनाच्या समस्याही उद्भवू शकतात, म्हणून शरीराच्या गरजेनुसार पाणी पित रहा. याशिवाय जेवण केल्यानंतर 20 मिनिटे चालणे, जर तुम्हाला हे करता येत नसेल तर जेवल्यानंतर काही वेळ वज्रासनात बसा, यामुळे अन्न पचण्यास ही मदत होते. जेवण्याआधी आणि नंतर लगेच पाणी पिणे टाळा. पचनाशी संबंधित समस्या असतील तर जास्त जड अन्न खाऊ नये.

(डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Non Stop LIVE Update
युगेंद्र पवार यांच्या सभेत शरद पवार यांची रॉयल एन्ट्री... बघा व्हिडीओ
युगेंद्र पवार यांच्या सभेत शरद पवार यांची रॉयल एन्ट्री... बघा व्हिडीओ.
अजित पवारांच्या सभेत मुलगी हरवली? दादा काय म्हणाले? एकदा बघाच...
अजित पवारांच्या सभेत मुलगी हरवली? दादा काय म्हणाले? एकदा बघाच....
दादागिरी वाढली तर उघडावा लागतो तिसरा डोळा अन्...कोल्हेंचा रोख दादांवर?
दादागिरी वाढली तर उघडावा लागतो तिसरा डोळा अन्...कोल्हेंचा रोख दादांवर?.
अजित पवारांच्या बारामतीच्या सांगता सभेला; दादांच्या आईंनी लावली हजेरी
अजित पवारांच्या बारामतीच्या सांगता सभेला; दादांच्या आईंनी लावली हजेरी.
थडग्यावर चादर चढवणारा.., मराठा मोर्चाची कालीचरण महाराजांकडून खिल्ली
थडग्यावर चादर चढवणारा.., मराठा मोर्चाची कालीचरण महाराजांकडून खिल्ली.
'जर ती गोष्ट राज ठाकरे करत असेल तर उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा?'
'जर ती गोष्ट राज ठाकरे करत असेल तर उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा?'.
एक है तो सेफ है घोषणेवरून राहुल गांधींचा निशाणा, थेट तिजोरी ओपन अन्...
एक है तो सेफ है घोषणेवरून राहुल गांधींचा निशाणा, थेट तिजोरी ओपन अन्....
एका मताला 500 रूपये...मतदारसंघात पैशांचं वाटप करणाऱ्याची चांगलीच धुलाई
एका मताला 500 रूपये...मतदारसंघात पैशांचं वाटप करणाऱ्याची चांगलीच धुलाई.
'...तर चुकीचे काय? पवारांमधला जातीवाद उफाळून येतो', फडणवीसांचा घणाघात
'...तर चुकीचे काय? पवारांमधला जातीवाद उफाळून येतो', फडणवीसांचा घणाघात.
पवारांमुळे राष्ट्रपती राजवट लागली? फडणवीस म्हणाले, 100 टक्के खरंय...
पवारांमुळे राष्ट्रपती राजवट लागली? फडणवीस म्हणाले, 100 टक्के खरंय....