रात्री झोप लागत नाही, ‘या’ टिप्स फॉलो करा, गोंगाटात पण शांत झोप लागेल

रात्री लवकर झोपायला जातो पण झोप लागता लागत नाही' ही आपल्यापैकी अनेकांची तक्रार असते. रात्री शांतपणे झोप लागावी यासाठी कोणते उपाय करावेत ते आजच्या लेखातून जाणून घेऊया.

रात्री झोप लागत नाही, 'या' टिप्स फॉलो करा, गोंगाटात पण शांत झोप लागेल
Top view of beautiful young woman sleeping while lying in bed
Follow us
| Updated on: Nov 30, 2024 | 6:37 PM

आपल्या शरीराच्या उत्तम आरोग्यासाठी शरीराला पुरेशी विश्रांती देणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत कि लवकर निजे लवकर उठे त्याला आरोग्यसंपदा मिळे’, यामुळे आरोग्य तंदुरुस्त राहते. तसेच तुम्ही चांगली झोप घेत असाल तर तुम्ही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी राहू शकतात.काही लोकांना रात्री झोप लागत नाही कारण त्यांचे मन शांत राहू शकत नाही. यामुळे ते वारंवार जागे होतात किंवा रात्री उशिरापर्यंत झोपत नाहीत. असं झाल्यानं अर्थातच झोपेत व्यत्यय येतो. त्यामुळे तुमची झोप नीट न झाल्याने शारीरिक अनेक समस्या उद्भवू शकतात.

जर तुम्हीही झोपेच्या समस्येने त्रस्त असाल आणि झोप लागत नाही या समस्या सारख्या उद्भवत असेल तर तुमच्यासाठी काही उपाय घेऊन आलो आहोत. या लेखात आम्ही तुम्हाला रात्री दूध आणि मधाच्या फायद्यांविषयी सांगणार आहोत, जे पिऊन तुम्ही रात्री गाढ झोपू शकता.

रात्री दुधात मध मिसळून प्यायल्यास काय होते?

तुम्हाला जर रात्री झोप लागत नसेल तर अश्या वेळेस रात्री झोपण्यापूर्वी दुधात मध मिसळून त्याचे सेवन करा. कारण दुधात मध मिसळून प्यायल्याने शरीराला अनेक फायदे होतात. तसेच तुमच्या झोपेवर याचा सकारात्मक परिणाम होतो. याच्या सेवनाने तुमचे शरीर आणि मेंदू हे दोन्ही शांत होते ज्याने रात्री चांगली झोप लागते. दुधात ट्रिप्टोफेन नावाचे अमिनो ॲसिड असते, जे मेंदूत सेरोटोनिन आणि मेलाटोनिनच्या उत्पादनास प्रोत्साहित करते, ज्यामुळे तुम्हाला गाढ झोप लागते आणि झोपेच्या समस्यांपासून आराम मिळतो.

हे सुद्धा वाचा

रात्री दुधात मध मिसळून पिणे हे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर मानले जाते. या करिता तुम्ही एका ग्लासामध्ये कोमट दूध घ्या. आणि त्यात एक चमचा मध घालून नीट मिक्स करा. त्यानंतर तुम्ही झोपण्यापूर्वी 20-30 मिनिटे आधी हे पिऊ शकता. दूध आणि मध यांचे मिश्रण केवळ गाढ आणि शांत झोप आणण्यास उपयुक्त नाही, तर मानसिक आणि शारीरिक आरोग्यदेखील सुधारते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.