वयाच्या चाळीशीतही चिरतरुण दिसण्यासाठी या डाएटचा समावेश जरूर करा…

वय जसेजसे वाढत जाते तसे त्याचा परिणाम आपल्या चेहऱ्यावर व आपल्या शरीरावरदेखील दिसून येत असतो. वाढत्या वयासोबत शारीरिक मर्यादाही येतात. परंतु आपण योग्य आहार ठेवल्यास वाढत्या वयातही आपण चिरतरुण दिसू शकतो.

वयाच्या चाळीशीतही चिरतरुण दिसण्यासाठी या डाएटचा समावेश जरूर करा...
यो-यो डाएटImage Credit source: social
Follow us
| Updated on: Feb 14, 2022 | 5:01 PM

मुंबईः साधारणत: वयाच्या चाळीशीनंतर शरीराची अधिक काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात येत असतो. चाळीशीनंतर महिलांसोबत पुरुषांच्या शरीरामध्येही अनेक बदल घडत असतात. वाढत्या वयासोबत (Aging) आपल्या आहारात बदल करणेही खूप गरजेचे असते. परंतु तसे होत नाही. परिणामी वयाच्या चाळीशीतच आपणास अकाली वृद्धत्व (Premature aging) येत असते. चाळीशीत पुरुषांना त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते, अन्यथा शरीरात अनेक समस्या येऊ लागतात. काही घरगुती उपायांनी या समस्यांवर मात करता येते. पुरुषांना घरातील तसेच बाहेरील अनेक जबाबदाऱ्या (Responsibilities) असतात. कामाचा ताणतणाव असतो. त्यामुळे अनेकदा कमी वयातदेखील त्याच्या चेहऱ्यावरील चमक निघून जात असते.

डाएट बदला

कामाच्या ताणातून पुरुषांची नेहमी नकारात्मक मानसिकता असते. कामाचा व्याप तसेच इतर तणाव असल्याने त्याचा परिणाम त्याच्या शरीरावर जाणवत असतो. याचमुळे त्यांचे वैवाहिक जीवनदेखील अगदी निरस बनत असते. त्यामुळे अनेकदा त्यांना यावर महागडे उपचारदेखील करावे लागत असतात. परंतु यातून वाचण्यासाठी अनेकदा घरगुती उपचारदेखील प्रभावी ठरत असतात. तसेच आहारातही काही खास पदार्थांचा समावेश केल्याने शरीरावर चांगले परिणाम होतात.

मखाना

मखाना याला कमळाचे बी देखील म्हणतात. ही एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे, त्यात प्रथिने, खनिजे, कार्बोहायड्रेट, फॉस्फरससारखी पोषक तत्त्वे असतात. पुरुषांनी रोज मखाना खाल्ल्यास शरीरात ‘टेस्टोस्टेरॉन हार्मोन’चा स्राव वाढतो, ज्यामुळे शरीरातील कमजोरी दूर होते.

खजूर

सुक्या खजुरामध्ये फायबर, झिंक, मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि लोह मोठ्या प्रमाणात असते. आपल्या शरीराला थकवा जाणवत असल्यास खजूर खाल्ल्याने यातून चांगली ऊर्जा मिळत असते. खजूर खाल्ल्याने पचनक्रियाही चांगली होते, दुधात खजूर टाकून खाल्ल्याने हे शरीरासाठी फायदेशीर ठरत असते.

दूध

वयाच्या 40 व्या वर्षीही पुरुषांनी दररोज दूध पिणे आवश्यक असते, दूध हे पूर्णअन्न असल्याने त्यात अनेक प्रकारचे पोषक घटक असतात. हे स्टॅमिना वाढवण्यास मदत करते यातून शरीराला भरपूर ऊर्जा मिळते.

असा करा आहारात समावेश

मखाना आणि खजूर 2 ते 3 तास पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर एक ग्लास दूध घेऊन त्यात मखाना आणि खजूर बारीक करा. दुधात हे मिश्रण चांगले ढवळून घ्यावे. मखाना, खजूर टाकून तयार केलेले दूध रोज पिल्याणे यातून शरीरावर चमत्कारी परिणाम दिसून येतात. यासोबतच दूध आणि मध एकत्र प्यायल्यानेही शरीरातील कमकुवतपणा निघून जातो.

संबंधित बातम्या

मधुमेहींसाठी ‘हा’ ज्यूस वरदानापेक्षा कमी नाही, अवघ्या तीन तासांत दिसेल परिणाम

Constipation | तुमच्या चिमुरड्यांना बद्धकोष्ठाचा त्रास जाणवतोय? 4 घरगुती उपाय ठरतील परिणामकारक

स्त्रियांनो, लठ्ठपणामुळे त्रस्त आहात? लठ्ठपणामुळे होणाऱ्या आजारावरील उपचारांविषयी जाणून घ्या

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.