सिगारेटचे व्यसन सोडायचे? रोज ‘हे’ काम करा, व्यसनमुक्त व्हा!
तुम्ही सिरगेट सोडण्याचा निर्णय घेतला असल्यास सर्वात आधी तुमचं अभिनंदन. तुम्ही मद्यपान करत असाल तर सिगारेट ओढण्याची लालसा निर्माण होऊ शकते. अशा गोष्टी टाळण्याचा प्रयत्न करा. सिगारेट लगेच दूर होत नसेल तर ते हळूहळू सोडण्याचा प्रयत्न करा. एका दिवसात तुम्ही सिगारेट ओढण्याचे प्रमाण कमी करा आणि दोन सिगारेटमधील अंतरही वाढवा. यासाठी आम्ही खाली काही टिप्स दिल्या आहेत. वाचा.
तुम्हाला सिगारेटचे व्यसन सोडायचे असेल तर आम्ही तुम्हाला आज काही खास टिप्स सांगणार आहोत. या टिप्सच्या माध्यमातून तुम्ही अगदी सहज सिगारेटचं व्यसन सोडू शकतात. तुम्ही सिगारेट सोडण्याचा निर्णय घेतला असल्यास सर्वात आधी तुमचं अभिनंदन. आपल्या आरोग्यासाठी आपण करू शकणाऱ्या सर्वोत्तम निवडींपैकी हा एक निर्णय आहे.
रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्रांमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार धूम्रपान सोडण्यास सक्षम न होण्याचे सर्वात मोठे कारण निकोटीन आहे. सिगारेटचे डिझायनिंग अशा प्रकारे केले जाते की ते आपल्या मेंदूपर्यंत निकोटीन वेगाने पोहोचवण्याचे काम करते. यामुळे मेंदूमध्ये डोपामाईन बाहेर पडते आणि त्वरित आनंद मिळतो. अशावेळी जीवनशैलीत काही बदल केले तर निकोटीनचे व्यसन सुटते आणि धूम्रपानातून सहज मुक्ती मिळू शकते. उपायांबद्दल जाणून घेऊया या.
सिगारेटपासून सुटका कशी मिळवाल?
1. धूम्रपान सोडण्याचे कारण समजून घ्या –
तुम्ही धूम्रपान सोडू इच्छित असल्यास आधी आपण असे का करू इच्छिता, याचे कारण शोधा. जर तुम्ही ठरवलं असेल की तुम्हाला सिगारेट सोडायची आहे. तर त्यासाठी आधी डॉक्टरांचा आधार घ्या. त्यानंतर क्लासेस, समुपदेशन आणि टिप्स फॉलो करा.
2. निकोटीन रिप्लेसमेंट थेरपीची मदत घ्या –
जेव्हा जेव्हा आपल्याला निकोटीनची लालसा जाणवते तेव्हा आपण निकोटीन रिप्लेसमेंट गम, लोझेन, पॅच वापरू शकता. याशिवाय आपल्या कुटुंबीय-मित्रांची मदत घ्या. त्यांचा सपोर्ट मिळवा. यामुळे प्रेरणा मिळेल आणि व्यसन लवकर दूर होईल.
3. सिगारेट ओढण्याचे प्रमाण हळूहळू कमी करा-
तुम्ही मद्यपान करत असाल तर धूम्रपान करण्याची लालसा निर्माण होऊ शकते. अशा गोष्टी टाळण्याचा प्रयत्न करा. जर धूम्रपान लगेच दूर होत नसेल तर ते हळूहळू सोडण्याचा प्रयत्न करा. एका दिवसात तुम्ही सिगारेट ओढण्याचे प्रमाण कमी करा आणि दोन सिगारेटमधील अंतरही वाढवा.
4. काहीतरी चघळत राहा –
सिगारेट ओढण्याची इच्छा झाली की तोंडात काहीतरी चघळत राहा. यासोबत शुगरलेस गम किंवा हार्ड कँडी चा वापर केल्यास सिगारेटची लालसा कमी होते. सिगारेट ओढण्याच्या अंतरात बदाम, अक्रोड सारखे शेंगदाणे खा. सिगारेटच्या व्यसनातून मुक्त होण्यासाठी कोरडे गाजर उपयुक्त ठरते.
5. धूम्रपान सोडण्यासाठी तणाव टाळा-
धूम्रपान सोडण्यासाठी तणाव टाळा. त्यासाठी विश्रांती तंत्राचा अवलंब करावा. स्वत:ला रिलॅक्स ठेवा, जुन्या तंत्रज्ञानाची मदत घ्या. दीर्घकाळ असे केल्याने सिगारेटच्या व्यसनापासून मुक्ती मिळू शकते.
6. व्यायाम आणि योगा करा –
शारीरिक व्यायाम आणि योगा संपूर्ण शरीरासाठी फायदेशीर आहेत. शारीरिक आरोग्यावर लक्ष केंद्रित केल्यामुळे धूम्रपानाकडे लक्ष कमी होते. यामुळे जास्त सिगारेट ओढावीशी वाटत नाही आणि त्यातून सुटका मिळू शकते.