इंटरनेटच्या स्पीडसारखा तुमचा लठ्ठपणा वाढेल, ‘या’ संशोधनातून समोर

तुम्ही रोज हाय-स्पीड इंटरनेट वापरत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठीच आहे. लठ्ठपणाबाबत जगभरात अनेक संशोधन करण्यात आले आहेत. त्यापैकी एका संशोधनात धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. तुमचे इंटरनेट कनेक्शन जितके हाय-स्पीड म्हणजेच जलद असेल तेवढ्या वेगाने लठ्ठपणाही वाढू शकतो, असे संशोधनात नमुद करण्यात आले आहेत.

इंटरनेटच्या स्पीडसारखा तुमचा लठ्ठपणा वाढेल, ‘या’ संशोधनातून समोर
Follow us
| Updated on: Nov 15, 2024 | 3:05 PM

तुम्हाला डिजिटल युगात वावरताना प्रत्येक टप्प्यावर इंटरनेटची गरज भासते. तुम्ही देखील अशा लोकांपैकी एक असू शकतात जे तासंतास इंटरनेट वापरतात आणि हाय-स्पीड नेटवर्कचा वापर करून नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉन प्राईमवर रात्री उशीरापर्यंत चित्रपट, वेब सीरिज पाहतात. ऑस्ट्रेलियात करण्यात आलेल्या एका नव्या संशोधनानुसार वेगवान इंटरनेट कनेक्शनमुळे लठ्ठपणाचे प्रमाण वाढत आहे.

ऑस्ट्रेलियातील हाऊसहोल्ड, इनकम अँड लेबर डायनॅमिक्स (HILDA) सर्वेक्षणाच्या अभ्यासानुसार 2006 ते 2019 या कालावधीत हाय-स्पीड इंटरनेटचा मागोवा घेण्यात आला, त्याच्या निष्कर्षांवरून असे दिसून आले की इंटरनेट कनेक्शन जितके वेगवान असेल तितके लोकांचे वजन वाढते.

इंटरनेट-लठ्ठपणाचा संबंध

तज्ज्ञांनी आपल्या वर्तनाद्वारे वेगवान इंटरनेट आणि लठ्ठपणा यांच्यातील दुवा स्पष्ट केला. ते म्हणतात की, हाय-स्पीड इंटरनेट कनेक्शनमुळे लोक त्यात इतके व्यस्त होतात की, ते शारीरिकरित्या निष्क्रिय होतात. शारीरिकदृष्ट्या सक्रिय न राहिल्याने त्यांचे वजन वाढू लागते.

हे सुद्धा वाचा

हाय-एंड स्पीड इंटरनेटमुळे आपण शो किंवा ऑनलाईन गोष्टी पाहण्यात तासंतास वेळ वाया घालवतो आणि शारीरिक हालचाली शून्य होऊ लागतात, असे तज्ज्ञांचे मत आहे. याचा चयापचयावर वाईट परिणाम होतो आणि परिणामी लठ्ठपणा येतो. जर तुम्ही बिंज बघत असाल तर तुम्ही बसण्यासोबतच काही स्नॅक्स खात राहतात, ज्यामुळे लठ्ठपणा वाढतो.

लठ्ठपणावर उपाय काय?

आता तुम्हाला इंटरनेट आणि लठ्ठपणाचा संबंध कसा तोडायचा, हा प्रश्न पडला असेल. त्यासाठी तुम्हाला आधी इंटरनेटमुळे वाढलेली निष्क्रियता ओळखावी लागेल, ते अधिक महत्वाचे आहे. यामुळे तुम्ही स्क्रीन टाईमदरम्यान ब्रेक घेताल आणि निरोगी जीवनशैलीसह शारीरिक अ‍ॅक्टिव्हिटी करत राहताल.

वेळोवेळी ब्रेक घ्या

तुम्ही हाय-स्पीड इंटरनेट कनेक्टिव्हिटीमध्ये बसून ऑफिसची कामे करत असाल, टीव्ही मोबाईलवर वेळ घालवत असाल तर वेळोवेळी ब्रेक घेत राहा. थोडा वेळ चालणे किंवा काही व्यायाम किंवा अ‍ॅक्टिव्हिटी करा. यामुळे आपली शारीरिक तंदुरुस्ती देखील सुधारते. टीव्ही किंवा मोबाईलवर पाहताना हेल्दी स्नॅक पर्याय निवडा आणि तळलेले पदार्थ खाणे टाळा.

भविष्यातील समस्या टाळा

ऑस्ट्रेलियातील हाऊसहोल्ड, इनकम अँड लेबर डायनॅमिक्स (एचआयएलडीए) सर्वेक्षणातील हायस्पीड इंटरनेट आणि लठ्ठपणाचा मागोवा, हा संशोधन अभ्यास तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. कारण, सध्या अनेक लोक असे आहेत, जे तासंतास हाय-स्पीड इंटरनेटचा वापर करतात. यामुळे त्यांना अनेक समस्यांना भविष्यात समोरं जावं लागू शकतं.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.