Mask | कोरोना विषाणू किती मिनिटांत गाठणार? मास्क ठरवणार! या 16 पैकी तुमचा मास्क कोणता?

गेल्या दोन वर्षांपासून कोरोना सारखा महारोगाने जगाला वेढीस आणलं आहे. या रोगापासून बचाव करण्यासाछी कोरोनाची लस देण्यात आली. मात्र आता कोरोनाचा नवीन व्हायरसने सगळ्यांच्या चिंतेत भर घातली. दोन लस घेतलेल्यांनाही या व्हायरसने आपल्या मगरमिठ्ठीत घेतलं आहे. गेल्या काही दिवसात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे या अदृश्य शत्रूचा सामना करण्यासाठी मास्क हा एकमेव पर्याय आहे.

Mask | कोरोना विषाणू किती मिनिटांत गाठणार? मास्क ठरवणार! या 16 पैकी तुमचा मास्क कोणता?
मास्क
Follow us
| Updated on: Jan 05, 2022 | 11:30 AM

कोरोनाग्रस्तांची संख्या अचानक वाढत आहे. अगदी कोरोना होऊन गेल्यावरही आणि दोन लस घेतल्यावरही अनेकांना परत कोरोनाने गाठलं आहे. त्यामुळे सगळीकडे चिंतेच वातावरण आहे. त्यामुळे सध्या तरी कोरोनापासून वाचण्यासाठी मास्क हाच एक पर्याय आहे. आज मार्केटमध्ये अनेक मास्क आले आहेत. अगदी कापडी मास्कही वापरले जात आहे. मग आपण जर एका कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात आल्यास आपण कुठल्या मास्क वापरला होता यावरुन आपल्याला किती मिनिटांनी कोरोनाचे लक्षण दिसतील याची माहिती आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

कोणाला, किती मिनिटांत गाठतो कोरोना?

1. मास्क हा दोन्ही म्हणजे ज्याला कोरोना झाला ती व्यक्ती आणि जो त्या व्यक्तीच्या संपर्कात आला त्या व्यक्तीने घातला नसेल तर, अशा व्यक्तीला कोरोना होण्याची दाट शक्यता असते. अशा व्यक्तीला 15 मिनिटात कोरोनाची लागण होऊ शकते.

2. जर कोरोनाग्रस्त व्यक्तीने कापडी मास्क वापरला असेल आणि त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीने मास्क वापरला नसेल तर या व्यक्तीला साधारण 20 मिनिटात कोरोनाला होण्याची शक्यता असते.

3. कोरोनाग्रस्त व्यक्तीने सर्जिकल मास्क वापरला असेल आणि त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीने मास्क वापरला नसेल तर या व्यक्तीला 30 मिनिटात कोरोना होण्याची शक्यता असते.

4. जर एन 95 मास्क लावलेल्या कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात न मास्क लावता व्यक्तीला तर त्याला साधारण अडीच तासांनी कोरोनाचे लक्षण दिसून येतील.

5. आता जर कोरोनाग्रस्तानेच मास्क वापरा नसेल आणि त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीने कापडी मास्क वापरला असेल तर त्याला साधारण 20 मिनिटाने कोरोना होण्याची भीती असते.

6. जर कोरोनाग्रस्त आणि त्याचा संपर्कात आलेल्या, या दोघांनीही कापडी मास्क वापरला असेल तर साधारण 27 मिनिटांनी संपर्कात आलेल्या व्यक्तीला कोरोनाची लक्षण दिसून येतील.

7. कोरोनाग्रस्ताने सर्जिकल मास्क आणि त्याचा संपर्कात आलेल्या व्यक्तीने कापडी मास्क घातला असेल तर त्याला साधारण 40 मिनिटांनी कोरोनाची लक्षण दिसू शकतात.

8. कोरोनाग्रस्ताने एन 95 मास्क लावला असेल तर त्याचा संपर्कात आलेल्या व्यक्तीने कापडी मास्क वापरला असेल तर साधारण साडेतीन तासांनी त्या व्यक्तीमध्ये कोरोनाचे लक्षण दिसून येतील.

9. जर कोरोनाग्रस्तानेच मास्क वापरला नाही आणि संपर्कातील व्यक्तीने सर्जिकल मास्क वापरला असेल तर या व्यक्तीला अर्धा तासात कोरोनाची लागण होऊ शकते.

10. कोरोनाग्रस्ताने कापडी आणि संपर्कातील व्यक्तीने सर्जिकल मास्क तर या व्यक्तीला साधारण 40 मिनिटांनी कोरोनाची लक्षण दिसतील.

11. जर दोघांनीही म्हणजे कोरोनाग्रस्त आणि संपर्कातील व्यक्तीने सर्जिकल मास्क वापरला असेल तर तासभरानंतर त्या व्यक्तीमध्ये कोरोनाची लक्षण दिसण्याची शक्यता आहे.

12. एन 95 मास्क कोरोना झालेल्या व्यक्तीने घातला असेल आणि संपर्कातील व्यक्तीने सर्जिकल मास्क तर या व्यक्तीला साधारण 5 तासानंतर कोरोनाची लागण होण्याची भीती असते.

13. कोरोनाग्रस्त व्यक्तीने मास्क वापरला नसेल आणि संपर्कातील व्यक्तीने एन 95 मास्क वापरला असेल तर साधारण अडीच तासानंतर त्या व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो.

14. कापडी मास्क घालेल्या कोरोनाग्रस्ताचा संपर्कात एन 95 मास्क घालून जर तुम्ही आला असाल तर साधारण साडेतीन तासाने त्या व्यक्तीला कोरोनाची लक्षण दिसून येतात.

15. कोरोनोग्रस्ताने जर सर्जिकल मास्क वापरला असेल आणि त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीने एन 95 मास्क वापरला असेल तर त्याला कोरोनाची लक्षण साधारण 5 तासांनी दिसणार

16. दोन्ही व्यक्तीने म्हणजे कोरोनाग्रस्त व्यक्तीने आणि संपर्कातील व्यक्तीने एन 95 मास्क वापरला असेल तर अशावेळी या संपर्कात आलेल्या व्यक्तीला फक्त 1 टक्के कोरोनाची लागण होण्याची भीती असते. जवळपास 25 तासांपर्यंत या व्यक्तीचा कोरोनापासून बचाव होतो.

इतर बातम्या –

Raigad Corona Update : महाडच्या शाळेत एका विद्यार्थ्याच्या अहवालानंतर मोठा संसर्ग, 17 जण पॉझिटिव्ह

Omicron | घाबरवणाऱ्या ओमिक्रॉनवर दिलासादायक संशोधन, नव्या विषाणूशी लढणार शरीरातील खास घटक

Online Work: या टिप्स फाॅलो करा आणि डोळ्यांची काळजी घ्या…

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.