Drinking Water: आपण दररोज किती पाणी प्यायले पाहिजे ?
चांगल्या आरोग्यासाठी पाणी पिणे खूप महत्वाचे आहे. आपण दिवसभरात नक्की किती पाणी पिणे गरजेचे आहे, ते जाणून घेऊया.
नवी दिल्ली – चांगल्या आरोग्यासाठी (good health) खूप महत्वाचे आहे. एखाद्या माणसाने दिवसभरात नक्की किती पाणी (water) प्यावे ? असा प्रश्न आपल्याला बराच वेळा पडला असेल. एखाद्याने किती पाणी प्यावे हे त्या व्यक्तीची दिवसभरात किती हालचाल (physical activity) होते, त्यावर अवलंबून असते. पुरुषांनी दररोज किमान 13 ग्लास पाणी प्यावे तर स्त्रियांनी कमीत कमी 9 ग्लास पाणी प्यावे, अशी माहिती काही अभ्यासातून समोर आली आहे. आपण कुठे काम करतो, तेथील वातावरण कसे आहे, यावरही आपण किती पाणी प्यायले पाहिजे याचे उत्तर अवलंबून असते.
आपल्याला तहान का लागते ?
आपल्याला तहान का लागते हे बऱ्याच लोकांना कळत नाही. तहान लागण्याचे मुख्य कारण म्हणजे आपल्या शरीरात खनिजांची (Minerals) कमतरता निर्माण होते. पाणी आपल्या शरीरात वाहकाचे कार्य करते, जे मिनरल्स व व्हिटॅमिन्स (शरीरात) योग्य ठिकाणी घेऊन जाते. आपल्या शरीरात विविध प्रक्रिया (Reactions) सतत चालू असल्याने मिनरल्सची गरज भासते आणि ही खनिजे आपल्याला पाण्याद्वारे पुरवली जातात. त्यामुळेच आपल्याला एका ठराविक कालावधीनंतर तहान लागते.
दररोज किती पाणी प्यावे ? सामान्यत: असे म्हटले जाते की एखाद्या व्यक्तीने दिवसभरात किमान 8 ग्लास पाणी प्यावे. चांगल्या आरोग्यासाठी हे आवश्यक आहे. मानवाच्या शरीराचा 70% भाग हा पाण्याने बनलेला असतो. आपल्या शरीरातील प्रत्येक यंत्रणेचे कार्य सुरळीतपणे चालू रहावे यासाठी पाण्याची गरज असते. आपण दिवसभरात किती पाणी प्यावे हे आपले वय, दिवसभरात किती हालचाल होते आणि इतर घटकांवर अवलंबून असते. उदा- एखादा खेळ खेळणाऱ्या किंवा व्यायाम करणाऱ्या व्यक्तीला सामान्य व्यक्तीपेक्षा जास्त पाण्याची आवश्यकता असते. तसेच गर्भवती महिला किंवा स्तनपान करणाऱ्या महिलांनीही अधिक पाणी पिणे गरजेचे असते.
– तुम्ही जर गरम अथवा उबदार हवामानात राहत असाल, व्यायाम करत असाल तर अधिक पाणी पिण्याची गरज असते.
– तुम्हाला ताप, अतिसार किंवा उलट्यांचा त्रास होत असेल नेहमीपेक्षा अधिक पाणी प्यावे. या आजारांमध्ये आपल्या शरीरातील द्रवाचे प्रमाण कमी होते असते म्हणून जास्त पाणी पिण्याची गरज असते.
– आपले इलेक्ट्रोलाइट संतुलित राखण्यासाठी डॉक्टर इलेक्ट्रोलाइट्ससह पाणी आणि इतर पेय पिण्याचा सल्ला देऊ शकतात.
– तुम्ही कठोर व्यायाम करत असाल तर अतिरिक्त कॅलरी खर्च होतात. त्यामुळे अशा लोकांनी नेहमीपेक्षा 1.5 ते 2.5 ग्लास अधिक पाणी प्यावे.
– जर तुम्ही एक तासापेक्षा जास्त वेळ काम करत असाल तर तुम्ही रोजच्या गरजेपेक्षा जास्त पाणी प्यायलं पाहिजे.
पुरेशा प्रमाणात पाणी पिण्यासाठीचे उपाय
तहान लागल्यानंतर तसेच जेवताना पाणी प्यायल्याने तुम्ही पाण्याची आवश्यक मात्रा पूर्ण करू शकता. पण तुम्हाला पुरेशा प्रमाणात पाणी पिण्यासाठी मदत हवी असेल तर अधिक पाणी पिण्यासाठी तुम्ही काही उपाय करू शकता.
– ऑफीसला जा किंवा जिममध्ये, अथवा बाहेर फिरायला, कुठेही बाहेर जाताना पाण्याची बाटली सोबत ठेवावी.
– आपली दैनंदिन पाण्याची गरज भागविण्यासाठी तुम्ही साध्या पाण्याऐवजी इतर द्रव पदार्थांचे सेवन करू शकता.
– दूध, फळांचा ताजा रस, चहा, सरबत किंवा नारळपाणी यांचे सेवन तुम्ही करू शकता.
– सोडा अथवा इतर शर्करायुक्त पेयांमध्ये भरपूर कॅलरीज असतात. त्यामुळे शक्य तेवढे साधे पाणी पिण्याचा प्रयत्न करावा.
– लिंबू सरबत अथवा पाण्यामध्ये इतर काही फ्लेवर्स ॲड करून तुम्ही पुरेशा प्रमाणात पाणी पिण्याची सवय अंगिकारू शकता.