कोरोनाची दुसरी लाट अधिक धोकादायक कशी?; 10 मुद्द्यांतून समजून घ्या!
केवळ मुंबईसह महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. (How quick is the second wave of COVID-19 in India?)
मुंबई: केवळ मुंबईसह महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. या दुसऱ्या लाटेत गेल्या काही दिवसांपासून देशात रोज 50 हजार रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही दहशतीचं वातावरण निर्माण झाली आहे. लॉकडाऊन नसल्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या अधिकच वाढताना दिसत आहे. त्यामुळे कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत नेमका काय फरक आहे? याचा दहा मुद्द्यांतून घेतलेला हा आढावा. (How quick is the second wave of COVID-19 in India?)
>> गेल्या वर्षी कोरोना संसर्ग वाढला तेव्हा देशात लॉकडाऊन करण्यात आला होता. त्यानंतर अनलॉक केल्यानंतर देशात कोरोना रुग्णांची संख्याही वाढली होती. सप्टेंबर-ऑक्टोबर 2020पर्यंत भारतात एकूण 18 हजार ते 50 हजार अॅक्टिव्ह रुग्ण आढळून आले होते. अवघ्या 32 दिवसात हे रुग्ण आढळून आले होते. परंतु यंदा 11 मार्च ते 27 मार्च दरम्यानच हा आकडा गाठला गेला आहे.
>> गेल्यावेळेपेक्षा यावेळीही महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. गेल्यावेळी महाराष्ट्रात 11 हजार ते 22 हजार अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या होण्यास 31 दिवस लागले होते. यावेळी हा आकडा अवघ्या 9 दिवसातच पार केला गेला आहे.
>> मुंबईला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. मुंबईत कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. मुंबईत अवघ्या 24 दिवसातच रोज 850 ते 2100 रुग्ण सापडण्यास सुरुवात झाली आहे. गेल्यावेळी हा आकडा गाठण्यासाठी एक महिना लागला होता.
>> महाराष्ट्रानंतर गुजरातमध्येही कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्यावेळी गुजरातमध्ये ठरावीक अंतराने कोरोनाच्या ठरावीक केसेस वाढत होत्या. मात्र, यावेळी कोरोनाचा प्रमाणाबाहेर फैलाव होत आहे. गेल्या आठवड्याभरापासून गुजरातमध्ये रोज दीड हजाराहून अधिक रुग्ण सापडत आहेत.
>> उत्तर भारताचा विचार केल्यास पंजाबमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. पंजाबमध्ये गेल्या आठवड्यापासून रोज 2500हून अधिक रुग्ण सापडत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे यूकेच्या स्ट्रेनपेक्षा पंजाबमधील कोरनाच्या केसेस सर्वाधिक असल्याचं दिसून आलं आहे.
>> पंजाबच्या चंदीगडमध्ये दोन डझनहून अधिक कंटेन्मेंट झोन तयार झाले आहेत. चंदीगडमध्ये 1400 हून अधिक अॅक्टिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे.
>> वेगवेगळ्या राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने त्याचा राष्ट्रव्यापी परिणाम पाहायला मिळत आहे. देशात चार दिवसातच एक लाखाहून अधिक अॅक्टिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्यावेळेपेक्षा हा आकडा अधिक आहे.
>> देशात महाराष्ट्र, केरळ, गुजरात, पंजाब, कर्नाटकात 70 टक्क्याहून अधिक कोरोना केसेस आहेत. या राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या अत्यंत वेगाने वाढत असून ही चिंतेची बाब आहे.
>> केवळ कोरोना रुग्णांची संख्याच वाढत नाहीये तर कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्याही प्रचंड आहे. डिसेंबरनंतर पहिल्यांदाचा कोरोना बळींची संख्या वाढताना दिसत आहे. गेल्या आठवड्यापासून देशात 200 हून अधिक रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून हा आकडा अधिक वाढताना दिसत आहे.
>> देशात लॉकडाऊन लागू करण्यात आलेला नाही. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. काही राज्यात कठोर निर्बंध लादले जात आहेत. त्याचवेळेस कोरोना लसीकरणाच्या मोहिमेचा वेगही मंदावला आहे. त्यामुळेही चिंता वाढली आहे. (How quick is the second wave of COVID-19 in India?)
VIDEO : SuperFast 100 News | सुपरफास्ट 100 न्यूज | 8 AM | 30 March 2021https://t.co/SDhImUuuES
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 30, 2021
संबंधित बातम्या:
राज्यात लॉकडाऊन हवा की नको?; वाचा, कोण कोण काय म्हणालं
चीनवर कोरोना पसरवल्याचा वारंवार आरोप, आता WHO च्या अहवालात मोठा खुलासा, ड्रॅगनची भूमिका काय?
(How quick is the second wave of COVID-19 in India?)