AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Six Minute Walk Test : तुमची ऑक्सिजन पातळी तपासण्यासाठी सोपी टिप्स, केवळ 6 मिनिटे जलद चाला!

Six Minute Walk Test चालण्यापूर्वी केलेली एखाद्या व्यक्तीची ऑक्सिजन (प्राणवायू ) पातळी आणि चालल्यानंतरची प्राणवायू पातळी यात जर 4 पेक्षा जास्त फरक असेल तर ते गंभीर आहे.

Six Minute Walk Test : तुमची ऑक्सिजन पातळी तपासण्यासाठी सोपी टिप्स, केवळ 6 मिनिटे जलद चाला!
Walking
Follow us
| Updated on: Apr 07, 2021 | 3:54 PM

नागपूर : नागपूरमधील कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना संसर्ग वाढत आहे. तेथील नागरिकांना शासकीय आणि खासगी रुग्णालयात बेड,आयसीयू बेड, ऑक्सिजनची उपलब्धता ही माहिती एका कॉलवर उपलब्ध होण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात कॉल सेंटर उभं करण्यात आलं आहे. (How to check oxygen level Six Minute Walk Test Nagpur Collector Ravindra Thackeray advice)

या कॉलसेंटरचा संपर्क क्रमांक 0712-2562668 असून 1077 या टोल फ्री क्रमांकावर नागरिकांनी संपर्क करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी आज केले. कॉल सेंटरमधील या नंबरवर नागरिकांना 24 तास संपर्क करता येऊ शकणार आहे.

महत्त्वाचं म्हणजे यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत:हून कोरोना चाचणी किंवा ऑक्सिजन पातळी तपासण्यासाठी महत्त्वाची टिप्स सूचवली आहे.

6 मिनिटाची स्वतः करा चाचणी

ग्रामीण भागात गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांनी लक्षणे जाणवताच वेळ न दवडता उपचार सुरू करावे. गावात आशा आणि अंगणवाडी सेविकेमार्फत आरोग्य सेवा पुरविण्यात येत आहेत. कोरोनासाठी वैद्यकीय तज्ञांनी दिलेल्या सल्यानुसार 6 मिनिटे चालण्याची जलद चाचणी करता येईल. त्यात चालण्यापूर्वी केलेली एखाद्या व्यक्तीची ऑक्सिजन (प्राणवायू ) पातळी आणि चालल्यानंतरची प्राणवायू पातळी यात जर 4 पेक्षा जास्त फरक असेल तर ते गंभीर आहे.

ताप, सर्दी ,खोकला,असल्यास वेळकाढूपणा न करता लवकर वैद्यकीय उपचार सुरु करणे गरजेचे आहे. आरोग्याची स्थिती ढासळण्यापूर्वी नागरिकांनी नागपूर येथील शासकीय किंवा खासगी रुग्णालयात धाव घ्यावी. त्यासाठीच समन्वय कक्ष अर्थात कॉल सेंटरची स्थापना केली आहे, असं जिल्हाधिकारी म्हणाले.

ऑक्सिजनसाठा मुबलक उपलब्ध

नागपूर जिल्ह्यात ऑक्सिजनसाठा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. तुटवडयाची कोणतीही तक्रार नाही. जिल्ह्यातील ऑक्सिजन उत्पादकांखेरीज भिलाई स्टिल प्लॉन्टवरूनदेखील पुरवठा होत असल्याचे जिल्हाधिकारी ठाकरे यांनी आश्वस्त केले.

रेमडीसीव्हर औषधाच्या साठ्याची माहिती घेण्यात येत असून मेडिकल स्टोअर्समधून रेमडीसीव्हरवर विक्री करण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. आता पुरवठादार थेट हॉस्पिटलला आणि हॉस्पिटलसंबंधित मेडिकल स्टोअर्सलाच पुरवठा करणार आहे. खासगी रूग्णालयातील आरटीपीसीआर लॅबची तपासणी, अन्न आणि औषध प्रशासन विभागातील चमूमार्फत करण्यात येणार आहे. तसेच चाचण्याच्या संख्येचे अपलोडिंग आणि देयक तफावतीतील अपप्रकारांची देखील शहानिशा करत असल्याचे त्यांनी सांगितले.

नागपूरकरांनी ब्रेक द चेन मधील निर्बंधासह मास्क, सॅनिटायजरचा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले.

संबंधित बातम्या 

Nagpur Corona : पालिकेचे हेल्पलाईन नंबर बंद, नागपूरमध्ये बेड कुठे आणि कसा मिळणार, संपूर्ण माहिती

(How to check oxygen level Six Minute Walk Test Nagpur Collector Ravindra Thackeray advice)

मुख्यमंत्री व्हावं वाटतं अन् कधी ना कधी... दादांना म्हणायचंय तरी काय?
मुख्यमंत्री व्हावं वाटतं अन् कधी ना कधी... दादांना म्हणायचंय तरी काय?.
'लाडकी बहीण'च्या निधीवरून शिरसाट भडकले, थेट दादांच्या खात्यावर निशाणा
'लाडकी बहीण'च्या निधीवरून शिरसाट भडकले, थेट दादांच्या खात्यावर निशाणा.
पाकिस्तानच्या मंत्र्यानं डिवचलं, पुढच्याच क्षणी भारतानं दाखवला इंगा
पाकिस्तानच्या मंत्र्यानं डिवचलं, पुढच्याच क्षणी भारतानं दाखवला इंगा.
'सिंधू'वरून पाकचा थयथयाट, संरक्षणमंत्र्यांची पुन्हा भारताला पोकळ धमकी
'सिंधू'वरून पाकचा थयथयाट, संरक्षणमंत्र्यांची पुन्हा भारताला पोकळ धमकी.
सिंधूत रक्त सांडू..भुट्टोचा जळफळाट, भारताविरुद्ध युद्धाचा पुन्हा इशारा
सिंधूत रक्त सांडू..भुट्टोचा जळफळाट, भारताविरुद्ध युद्धाचा पुन्हा इशारा.
लाडक्या बहिणींनो Good News, एप्रिलचा हफ्ता जमा, तुम्हाला मेसेज आला का?
लाडक्या बहिणींनो Good News, एप्रिलचा हफ्ता जमा, तुम्हाला मेसेज आला का?.
दहशतवाद संपवण्यासाठी..., मोदींनी पुन्हा पाकला हादरवलं; काय दिला इशारा?
दहशतवाद संपवण्यासाठी..., मोदींनी पुन्हा पाकला हादरवलं; काय दिला इशारा?.
भारताकडून धोका... पाकचा रडका डाव, UNचा पाक सदस्य असीम अहमदचा दावा
भारताकडून धोका... पाकचा रडका डाव, UNचा पाक सदस्य असीम अहमदचा दावा.
बांगलादेशी मेजर जनरलने ओकली गरळ आता सरकार म्हणतंय, भारतासोबत आमचे....
बांगलादेशी मेजर जनरलने ओकली गरळ आता सरकार म्हणतंय, भारतासोबत आमचे.....
युद्धाची धास्ती अन् भेदरलेल्या पाकिस्तानने आता कोणापुढं पसरले हात?
युद्धाची धास्ती अन् भेदरलेल्या पाकिस्तानने आता कोणापुढं पसरले हात?.