झोपताना नाक बंद होते? झटपट मिळेल आराम, फक्त करा ‘हे’ उपाय

Blocked Nose Tips: झोपताना नाक बंद होते का? यामुळे झोप चांगली होत नसेल तर चिंता करू नका. यावर आम्ही तुम्हाला उपाय सांगणार आहोत.

झोपताना नाक बंद होते? झटपट मिळेल आराम, फक्त करा 'हे' उपाय
Follow us
| Updated on: Nov 30, 2024 | 7:15 AM

Blocked Nose Tips : रात्री नेमकं झोपेच्या वेळीच नाक बंद होणे किंवा श्वास घ्यायला त्रास होणे, ही समस्या अनेकांना असते. ही एक अस्वस्थ स्थिती आहे, परंतु या सोप्या उपायांचा वापर केल्यास आपण रात्री चांगली झोप घेऊ शकता आणि नाक ब्लॉक होण्याच्या समस्येपासून आराम मिळवू शकता.

रात्री नेमकं झोपेच्या वेळीच नाक बंद होणे, हा त्रास अनेकांना असतो. या त्रासाचा सामना लाखो लोक करतात. विशेषत: थंड हवामानात, नाकात जाम होते, सूज आल्यासही ही समस्या वाढते. अशा वेळी नाक बंद झाल्यामुळे चांगली झोप मिळणे अवघड होते, कारण श्वास घेण्यास त्रास होतो. पण, चिंता करू नका, यावर आम्ही तुम्हाला उपाय सांगणार आहोत. तुम्हालाही रात्री वारंवार नाक बंद होण्याची समस्या भेडसावत असेल. त्यापासून सुटका मिळवायची असेल तर आम्ही खाली सांगत असलेले उपाय तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतात.

गरम वाफ घेणे

नाक बंद झाल्यास वाफ घेणे हा एक प्रभावी उपाय आहे. गरम वाफेमुळे नाकाच्या शिरा मोकळ्या होतात आणि श्वास घेणे सोपे होते. यासाठी एका वाटी कोमट पाण्यात व्हिनेगर घेऊन नाकाजवळ आणून खोल श्वास घ्यावा. आपण त्यात निलगिरी तेलाचे काही थेंब देखील घालू शकता, कारण निलगिरी तेल अनुनासिक मार्ग उघडण्यास म्हणजेच नाक मोकळे करण्यास मदत करते.

मिठाचे पाणी

नाकाच्या आतील सूज किंवा गर्दी म्हणजेच जाम कमी करण्यासाठी मिठाचे पाणी अत्यंत फायदेशीर आहे. एक ग्लास कोमट पाण्यात अर्धा चमचा मीठ घालून गुळणा करणे देखील फायद्याचे आहे. हे घशातील सूज देखील कमी करते आणि अनुनासिक जळजळ शांत करते, ज्यामुळे नाक उघडण्यास मदत होते.

गरम पेयांचे सेवन

गरम चहा किंवा आल्याचा चहा प्यायल्याने नाकात आराम मिळतो. आल्यामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात जे जळजळ कमी करण्यास आणि घसा खवखवणे दूर करण्यास मदत करतात. या चहामध्ये तुम्ही मधही घालू शकता, ज्यामुळे घसा शांत होतो आणि नाक मोकळे होते.

नाकात तेल घाला

नाक बंद झाल्यावर तिळाचे तेल किंवा निलगिरीच्या तेलाचे काही थेंब नाकात टाकल्यास आराम मिळतो. यामुळे नाकाच्या आतील सूज कमी होते आणि बंद नाक उघडते. लक्षात ठेवा की तेलाचा वापर अतिशय हलक्या आणि सुरक्षितपणे करा.

योग्य स्थितीत झोपा

आपल्या झोपेच्या स्थितीमुळे अनुनासिक गर्दीवर म्हणजेच नाक जाम होण्यावर परिणाम होऊ शकतो. पोटावर झोपल्यास नाक बंद होण्याची समस्या वाढू शकते. म्हणून एका बाजूने किंवा पाठीवर झोपण्याचा प्रयत्न करा, यामुळे अनुनासिक नलिका उघड्या राहतात आणि श्वास घेण्यास मदत होते.

(डिस्क्लेमर: या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.