किडनीच्या आजाराचा धोका कसा ओळखावा? काय लक्षणे आहेत?
आपली झोप आणि जागे होण्याची वेळ निश्चित करा आणि त्यात जास्त बदल करू नका. दररोज सुमारे 7 ते 8 तास झोप घ्या, असे केल्याने किडनीचे आरोग्य टिकून राहते. वाढते वजन किडनीच्या आरोग्यासाठी चांगले नाही कारण यामुळे मधुमेह, हृदयरोग आणि उच्च रक्तदाब होतो. त्यामुळे किडणीचेही खूप नुकसान होते.
मुंबई: आपल्या शरीरात किडनी फिल्टरसारखे काम करते. विषारी पदार्थ शरीरात राहिले तर अनेक प्रकारचे आजार आपल्याला होतील. त्यामुळे किडनीचं काम हे अत्यंत महत्त्वाचं आहे. हेच कारण आहे की प्रत्येक डॉक्टर किडनी निरोगी ठेवण्यासाठी सांगतात. आपल्याला कोणत्याही परिस्थितीत किडनीचे नुकसान टाळायचे आहे, यासाठी आपल्याला आपल्या लाईफस्टाइल मध्ये काही खास बदल करण्याची गरज आहे. मूत्रपिंडात कोणत्याही प्रकारचा बिघाड झाला तर त्यामुळे शरीरात अनेक प्रकारची लक्षणे दिसू लागतात. प्रथम ही चेतावणी चिन्हे कशी ओळखावी हे जाणून घेऊया.
किडनीच्या आजाराचा धोका कसा ओळखावा?
- त्वचेचा रंग अधिक पांढरा होतो
- त्वचा खूप कोरडी होते.
- नखे पांढरी होऊ लागतात
- नखे कमकुवत होऊ लागतात
- खाज सुटण्याच्या खुणा येऊ शकतात.
किडनीचे नुकसान कसे टाळावे?
वाढते वजन किडनीच्या आरोग्यासाठी चांगले नाही कारण यामुळे मधुमेह, हृदयरोग आणि उच्च रक्तदाब होतो. त्यामुळे किडणीचेही खूप नुकसान होते.
स्लिप सायकल बदलू नका
आपली झोप आणि जागे होण्याची वेळ निश्चित करा आणि त्यात जास्त बदल करू नका. दररोज सुमारे 7 ते 8 तास झोप घ्या, असे केल्याने किडनीचे आरोग्य टिकून राहते.
व्यायाम
दिवसातून सुमारे अर्धा तास व्यायाम किंवा इतर कोणतीही शारीरिक क्रिया केल्यास रक्तदाब चांगल्या प्रकारे नियंत्रणात राहील आणि किडनीशी संबंधित आजारांचा धोका कमी होईल.
(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही या वृत्ताला दुजोरा देत नाही.)