डिहायड्रेशपासून बचाव करायचा असेल तर हे पदार्थ मिसळून प्या पाणी, उन्हाळा होईल सुसह्य
How To Drink Water In Summer : उन्हाळ्यात शरीरा हायड्रेट ठेवणे खूप गरजेचे असते. स्वतःला हायड्रेटेड ठेवण्यासाठी वारंवार अधिकाधिक पाणी प्यावे, असा सल्ला तज्ज्ञ सर्वांना आहेत. काही पदार्थ पाण्यात मिसळून प्यायल्यास शरीराला जास्त फायदा होतो आणि पाण्याचे शोषणही चांगले होते.
नवी दिल्ली : सामान्य पाण्यात (water) खनिजे, पोषण (nutrition) मुबलक प्रमाणात असते आणि ते नैसर्गिकरित्या आपल्या शरीरातील घटकांची कमतरता पूर्ण करतात. पण दूषित पाण्यामुळे आजकाल प्रत्येक घरात आरओ वॉटर फिल्टरचा (water filter) वापर केला जात आहे. ते अनेक रोगांपासून आपले संरक्षण करतात, परंतु त्यांच्यामुळे पाण्यातील नैसर्गिक खनिजे गायब होतात. अशा स्थितीत शरीरातील पाणी शोषून घेण्याची क्षमताही कमी होते आणि ते घाम आणि लघवीच्या रूपात शरीरातून सहज बाहेर पडते. उन्हाळ्याच्या दिवसांत आपले शरीर जलद डिहायड्रेट (dehydration) होते. अशा परिस्थितीत उष्णतेचे परिणाम टाळण्यासाठी काही सोप्या टिप्स तज्ज्ञांकडून जाणून घेऊया.
उत्तम हायड्रेशनसाठी असे प्यावे पाणी
तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, आरओ फिल्टरशिवाय पाणी वापरणे आता आपल्यासाठी सुरक्षित राहिलेले नाही. परंतु हे देखील खरे आहे की, या प्रक्रियेत पाण्यातील अनेक नैसर्गिक खनिजे फिल्टर केली जातात, जी आपल्यासाठी आवश्यक आहेत मात्र या खनिजांची कमतरता आपण अन्नाद्वारे पूर्ण करू शकतो. उन्हाळ्यात शरीरातील पाण्याचे शोषण चांगले राहण्यासाठी आणि उष्माघात आणि डिहायड्रेशन टाळण्यासाठी तुम्ही काय करू शकता ते जाणून घेऊया.
काकडी व पुदीना
तुम्ही एका बाटलीत पाणी भरून त्यात काकडीचे काही तुकडे आणि पुदिन्याची पाने टाका आणि तसेच ठेवा. तुम्ही दिवसभर या पाण्याचे सेवन करू शकता. यामुळे पाण्याला वेगळा स्वादही येईल आणि भरपूर पाणी प्यायल्याने तुम्ही हायड्रेटेडही राहू शकाल.
लिंबू
उन्हाळ्यात लिंबाचाही वापर करावा. नुसत्या लिंबाचा स्वद आवडत नसेल तर तुम्ही सरबताच्या स्वरूपात प्यायल्यास ते तुमच्या आरोग्याला अधिक फायदे देते, मात्र त्यात मीठ कमी घालावे. विशेषतः ज्यांना मीठ कमी खाण्याच्या सूचना दिल्या आहेत, त्यांनी भरपूर लिंबू पाण्याचे सेवन करावे. हे शरीर डिटॉक्स करण्यास आणि रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यास देखील मदत करते.
पार्सली
एका भांड्यात पार्सलीची काही पाने टाका आणि ते पाणी उकळा. ते पाणी थंड झाल्यावर आपल्या बाटलीत ठेवा आणि हे पाणी सेवन करा. हे तुम्हाला दिवसभर ऊर्जा देण्याचे काम करेल. त्यात पुदिन्याची पानेही टाकू शकता.
बडीशेप-ओवा
तुम्ही एका भांड्यात एक चमचा बडीशेप आणि एक चमचा ओवा टाका आणि चांगले उकळा आणि थंड करा. बडीशेप व ओव्याचे पाणी आरोग्यासाठीही चांगले असते. ते उष्माघात आणि पोटात गॅस तयार होण्याच्या समस्येपासूनही तुम्हाला वाचवेल.
चिया सीड्स
जर तुम्ही पाण्यात चिया बिया मिसळून त्याचे सेवन केले तर ते शरीराला चांगल्या प्रकारे हायड्रेट करण्यास मदत करते आणि शरीरातील प्रोटीनची कमतरता देखील दूर करते. अशा प्रकारे तुम्ही रोज सकाळी याचे सेवन करू शकता.