दातांची कॅविटी रोखण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय!
कायमचे जे दात असतात त्यांना मात्र काहीही करून वाचवावं लागतं त्यांची काळजी घ्यावी लागते. दातांचे सडणे टाळण्यासाठी आपण कोणते घरगुती उपाय करू शकतो ते जाणून घेऊया.
दात हा आपल्या शरीराच्या हाडांचा महत्त्वाचा भाग आहे, याच्या मदतीने आपण स्वादिष्ट चवीचा आस्वाद घेऊ शकतो, परंतु त्याची योग्य काळजी घेतली नाही तर त्यावर जंतूंचा हल्ला होतो. त्यामुळे दातदुखी आणि पोकळीची समस्या वाढते. दुधाचे दात सडले तरी आपल्याला पुन्हा दुसरे दात येतात. पण कायमचे जे दात असतात त्यांना मात्र काहीही करून वाचवावं लागतं त्यांची काळजी घ्यावी लागते. दातांचे सडणे टाळण्यासाठी आपण कोणते घरगुती उपाय करू शकतो ते जाणून घेऊया.
लसूण किती फायदेशीर आहे याची माहिती तुम्हाला आहेच, त्यात असलेले आयुर्वेदिक गुणधर्म जंतूंचा अंश नष्ट करू शकतात. यासाठी तुम्ही लसूण बारीक करून जे दात खराब झालेत त्या दातांवर लावू शकता. यामुळे लवकर आराम मिळतो.
पेरू हे एक अतिशय चवदार फळ आहे जे सामान्यत: पचन टिकवून ठेवण्यासाठी खाल्ले जाते, परंतु त्याची पाने देखील कमी फायदेशीर नसतात, त्यात भरपूर अँटी- माइक्रोबियल गुणधर्म असतात. ही पाने पाण्यात उकळून कोमट झाल्यावर स्वच्छ धुवा. यामुळे दातांची समस्या दूर होते.
आपण सहसा अंड्याची टरफले डस्टबिनमध्ये टाकतो. परंतु त्याच्या मदतीने कॅविटी टाळता येते. त्यासाठी या साली बारीक करून त्यांची पावडर बनवावी. आता त्यात बेकिंग सोडा मिसळून पेस्ट तयार करून कुजलेल्या दातांमध्ये लावा.
कॅविटी रोखण्यासाठी लवंग खूप प्रभावी मानलं जातं. त्यात बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ असतो. लवंग पावडर आणि खोबरेल तेलाच्या मिश्रणात कापसाचा गोळा भिजवून कॅविटी असणाऱ्या दातांमध्ये ठेवा. असे नियमितपणे केल्याने तुमचे दात एकदम नीट राहतील.
(डिस्क्लेमर: दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा दिलेला नाही.)