Sensitive Teeth : तुमच्याही दातात येतात का झिणझिण्या ? जाणून घ्या त्यामागचे कारण..
जास्त प्रमाणात गोड पदार्थ खाणे, किंवा अती थंड अथवा अती गरम पदार्थ खाल्ल्यास दातांना झिणझिण्या येऊ शकतात. खरे तर काही पदार्थ दातांना हानी पोहोचवतात.

नवी दिल्ली – आजकाल दातांना झिणझिण्या (sensitive teeth) येण्याची समस्या सामान्य झाली आहे. अनेकदा काही थंड किंवा गरम पदार्थ खाल्ल्यानंतर तसेच जास्त गोड (sweet food) पदार्थांचे सेवन केले तरी लोकांना दातांच्या या समस्येचा (teeth problem) सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या दातांची विशेष काळजी घेतली पाहिजे. आपले दात संवेदनशील का होतात, त्यामागचे कारण काय व हे कसे टाळता येईल ते जाणून घेऊया.
दातांना झिणझिण्या येण्याचे कारण –
– दात किडण्याची समस्या आधीच असेल, तर थंड-गरम खाण्याकडे लक्ष द्या. यामुळे दातांमध्ये संवेदनशीलतेची समस्या निर्माण होऊ शकते.




– जर तुम्ही जास्त गोड खाण्याचे शौकीन असाल तर त्यामुळेही दातांना मुंग्या येण्याची समस्या उद्भवू शकते. मिठाईचे जास्त सेवन केल्याने दातांमध्ये संवेदनशीलता निर्माण होते असे मानले जाते.
– हिवाळ्यात दातांना झिणझिण्या येण्याची समस्या वाढते, त्यामुळे या ऋतूत जास्त थंड पदार्थ खाणे टाळावे.
दातांना झिणझिण्या येणे थांबवण्यासाठी उपाय –
1) लवंग तेल
लवंग तेलामध्ये अँटी-ऑक्सिडेंट, अँटी-व्हायरल आणि अनेक गुणधर्म असतात, जे दातदुखीपासून मुक्त होण्यास मदत करतात. लवंगाचे तेल तुम्ही हिरड्या किंवा दातांवर लावू शकता.
2) खोबरेल तेल फायदेशीर ठरते
नारळाच्या तेलामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात, जे दातांची संवेदनशीलता कमी करण्यास मदत करतात. यासाठी तुम्ही खोबरेल तेलाने चूळ भरू शकता.
3) लसूण वापरा
दातदुखीच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी लसणाचा वापर केला जाऊ शकतो. यामध्ये अँटी बॅक्टेरियल, अँटी ऑक्सिडंट, अँटी फंगल गुणधर्म आहेत. जे दातदुखी कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. दातदुखीपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही लसणाची पाकळी चघळू शकता
4)कांदा ठरतो गुणकारी
कांद्यामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म आढळतात, जे दातदुखी कमी करण्यासाठी उपयुक्त मानले जातात. यासाठी तुम्ही कांद्याचा रस वापरू शकता.
5) मीठ व पाणी
मीठ घातलेले पाणी हा दातदुखी कमी करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणून ओळखला जातो. यासाठी एका ग्लास कोमट पाण्यात अर्धा चमचा मीठ मिसळा, त्यानंतर तुम्ही त्या पाण्याने चूळ भरू शकता.
( डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञांचा अथवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)