झोप लागत नाही? निवांत झोप घेण्याचे सोपे उपाय
तज्ञांचा असा विश्वास आहे की निरोगी प्रौढ व्यक्तीने 24 तासात कमीतकमी 8 तासांची झोप घेतली पाहिजे. अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की, जे लोक रात्री नीट झोपत नाहीत त्यांना दिवसभर थकवा जाणवतो आणि चेहऱ्यावरही तेज नसतं.
झोप आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाची आहे, अन्यथा दिवसभरातील सामान्य कामेही अवघड होतात. बऱ्याच आरोग्य तज्ञांचा असा विश्वास आहे की निरोगी प्रौढ व्यक्तीने 24 तासात कमीतकमी 8 तासांची झोप घेतली पाहिजे. अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की, जे लोक रात्री नीट झोपत नाहीत त्यांना दिवसभर थकवा जाणवतो आणि चेहऱ्यावरही तेज नसतं, अशा वेळी काय करावं हे जाणून घेणं गरजेचं आहे. काही लोकांकडे झोपायला पुरेसा वेळ असतो, पण त्यांना रात्रभर या अस्वस्थतेतून जावे लागते आणि निवांत झोपही मिळत नाही. पण कदाचित आपला थोडासा निष्काळजीपणा याला कारणीभूत असेल. आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहोत ज्यांच्या मदतीने तुम्ही रात्रभर शांत झोपू शकाल.
निवांत झोप घेण्याचे सोपे उपाय
- काही लोकांना उशी खूप आवडते, झोपण्यासाठी ते एक नाही तर अनेक उशी एकावर एक ठेवून वापरतात. तुम्हालाही ही सवय असेल तर ती आजच बदलून टाका. जास्त उशी घेतल्यामुळे तुमची मान उंच होते आणि मग घोरायला सुरुवात होते, या सवयीमुळे झोपही खराब होऊ शकते.
- बऱ्याच वेळा असे होते की गादीचा भाग पायाच्या बाजूला खाली पडलेला असतो, जर असे असेल तर या ठिकाणी गादी थोडी उचलावी कारण ती झोपण्यासाठी सर्वोत्तम स्थिती आहे. यामुळे पायातून हृदयाकडे रक्त प्रवाह होतो.
- अस्वस्थतेमुळे झोप येत नसेल तर आधी तुमच्या मनात सकारात्मक विचार आणून सॉफ्ट म्युझिक ऐका, यामुळे तुम्हाला रिलॅक्स वाटेल आणि झोपही चांगली यायला लागेल.
- रोज झोपण्याची वेळ ठरवावी आणि त्यात फारसा बदल करू नये. असे केल्याने तुमच्या मेंदूत झोपेचे चक्र स्थिर होईल आणि मग झोप येण्यास कोणतीही अडचण येणार नाही.
(डिस्क्लेमर: दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा दिलेला नाही.)