नऊ महिन्याआधीच जन्माला आले आहे बाळ? करू नका चिंता ,काही उपाय करून घरच्या घरी वाढवा रोगप्रतिकारकशक्ती!!

नऊ महिन्या आधी जन्माला आलेले बाळ म्हणजेच प्री मॅच्युअर बाळाची खूप देखभाल करावी लागते जे बाळ पूर्ण नऊ महिन्यानंतर जन्माला येते त्याच्या पेक्षा जास्त काळजी नऊ महिने आधी जन्माला आलेल्या बाळाची काळजी करावे लागते.आज आम्ही तुम्हाला प्री मॅच्युअर बेबीची कशाप्रकारे काळजी घ्यायची आणि या बाळाची रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवायची या बद्दल सांगणार आहोत.

नऊ महिन्याआधीच जन्माला आले आहे बाळ? करू नका चिंता ,काही उपाय करून घरच्या घरी वाढवा रोगप्रतिकारकशक्ती!!
फाईल फोटो
Follow us
| Updated on: Jan 17, 2022 | 7:09 PM

नऊ महिन्याआधी जन्माला आलेले बाळ म्हणजेच प्री मॅच्युअर बाळाची खूप देखभाल करावी लागते. जे बाळ पूर्ण नऊ महिन्यानंतर जन्माला येते त्याच्या पेक्षा जास्त काळजी नऊ महिने आधी जन्माला आलेल्या बाळाची काळजी करावे लागते. प्री मॅच्युअर बेबीची कशाप्रकारे काळजी घ्यायची आणि या बाळाची रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवायची या बद्दलची माहिती जाणून घेणे अत्यंत गरजेचे आहे. कोणताही बाळाला जन्मासाठी नऊ महिने आवश्यक असतात, जर नऊ महिन्याआधी एखादा बाळाचा जन्म होतो त्याला प्री मॅच्युअर बेबी असे म्हणतात. हे बाळ वेळेच्या आधीच जन्माला आलेले असते आणि म्हणूनच या बाळाची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.या बाळाची रोगप्रतिकारक शक्ती म्हणजेच इम्यूनी सिस्टम योग्य पद्धतीने विकसित झालेली नसते. या बाळाला कोणत्याही रोगाचा व संक्रमणाचा धोका जास्त असतो तसेच एखाद्या आजारापासून लढण्यासाठी जी रोगप्रतिकारक शक्ती आवश्यक असते ती रोगप्रतिकारक शक्ती या बाळाच्या शरीरामध्ये खूपच कमी असते. जेव्हा एखादी बाळ प्री मॅच्युअर म्हणून जन्माला येते त्यामागे अनेक कारणं सुद्धा असतात त्यातील एक महत्त्वाचं कारण म्हणजे इंट्रायूट्राइन मध्ये सूज असणे यामुळे बाळाच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीचा जो काही प्रतिसाद असतो तो कमी होऊन जातो. तसेच बाळाचा जन्म झाल्यानंतर काही मेडिकल इंटर्वेंशन द्वारे मुलांची रोगप्रतिकारक शक्ती व रोगप्रतिकारक शक्तीचे कार्य अधिक विकसित होऊ शकते.या सगळ्या गोष्टी मुलासाठी इन्फेक्शन आणि धोकादायक ठरू शकतील आणि यामुळेच मुलांच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा कमी होण्याची शक्यता असते.

आजच्या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी काही महत्वाच्या टिप्स घेऊन आलेलो आहोत, त्या टिप्सच्या सहाय्याने प्री मॅच्युअर बेबीची रोगप्रतिकारक शक्ती वाढणार आहे तसेच बाळाचे आरोग्य सुद्धा चांगले राहील चला तर मग जाणून घ्या त्याबद्दल

अंगावरील दुध प्री मॅच्युअर बाळाची रोगप्रतिकारक शक्ती जर वाढवायची असेल तर अशावेळी सर्वात जास्त महत्त्वशील उपाय म्हणजे बाळाला आईच्या अंगावरील दुध पाजणे. ब्रेस्ट मिल्क मध्ये भरपूर प्रमाणामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे सर्व पोषक तत्व उपलब्ध असतात, जे बाळाला संक्रमणापासून वाचवते तसेच बाळाला भविष्यात कोणतेही आजार होत नाही. सर्वसाधारण वातावरणामध्ये बदल झाल्यावर मुलांच्या शरीरामध्ये सुद्धा बदल जाणवतात अशा वेळी बाळाला अंगावरचे दूध पाजल्यास त्यांच्या शरीरामधील रोगप्रतिकारक शक्ती मजबूत बनते आणि बाहेरच्या वातावरणामुळे त्यांना कोणत्या प्रकारचा त्रास सुद्धा होत नाही. हे दूध पाजल्याने बाळाला आई द्वारे काही अँटीबॉडीज मिळतात आणि म्हणूनच अंगावरचे दूध प्यायल्याने बाळाच्या पोटात कोणत्याही प्रकारचा संक्रमण होण्याचा धोका उद्भवत नाही.

वॅक्सिन / लस ​बाळाचा जन्म झाल्यानंतर बाळाला वॉर्ड मध्ये ठेवण्यात येते आणि अशा वेळी बाळाला अनन्यसाधारण आजारांपासून संरक्षण मिळण्यासाठी लस दिली जाते. जेव्हा एखादे बाळ जन्माला येते तेव्हा बाळाला दिली गेलेली लस अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते.तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने बाळाला लस सुद्धा देऊ शकता.

स्वच्छतेबाबत काळजी

एनआईसीयू मध्ये साफसफाईची विशेष काळजी घेणे गरजेचे असतात आणि घरी सुद्धा बाळाच्या आजूबाजूचे वातावरण स्वच्छतामय असणे गरजेचे आहे.लहान मुलांचे कपडे वेगळे धुवायला हवेत तसेच कपडे धुताना गरम पाण्याने कपडे धुतले गेले पाहिजे.बाथरूमला जाऊन आल्यानंतर हात स्वच्छ साबणाने धुवायला पाहिजे तसेच बाळाला हात लावण्यापूर्वी आपले हात स्वच्छ आहेत की नाही हे तपासून घेणे गरजेचे आहे. बाळाला हात लावण्याआधी, बाळाचे ओले कपडे बदलताना, तसेच बाळाला अंगावरचे दुध पाजताना सुद्धा आपल्याला आपले हात स्वच्छ धुणे आवश्यक आहे. प्री मॅच्युअर जन्माला आलेले बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी या गोष्टीसुद्धा उपयुक्त ठरतात.

​हाइपोथर्मिया

हाइपोथर्मिया मध्ये इंफेक्‍शन झाल्यावर मृत्यूचा धोका वाढतो. अश्यावेळी साधारणपणे घेतलेली काळजी यासाठी पुरेशी ठरत नाही. कंगारू मदर केयर, ब्लँकेट आणि इंक्‍यूबेटर द्वारे बाळाची देखभाल करून बाळाच्या शरीराचे तापमान नियंत्रित केले जाऊ शकते.

​बाहेर जाऊ नका

प्री मॅच्युअर बाळाला प्रत्येक वेळी एका ठिकाणी ठेवणे योग्य नाही परंतु बाळाला वारंवार बाहेर घेऊन जाणे सुद्धा चांगले नाही म्हणून बाळाला घराच्या बाहेर जास्त प्रमाणामध्ये घेऊन जाऊ नका. आपल्या घरामध्ये कमीत कमी लोकांना येऊ द्या. जर एखाद्याला खोकला ,सर्दी किंवा पोटाचा त्रास असेल तर अशावेळी त्या लोकांना बाळाच्या आजूबाजूला फिरकू देऊ नका जेवढे शक्य होईल तेवढे बाळाला घराच्या बाहेर घेऊन जाण्याचा प्रयत्न करू नका.

याशिवाय बाळाच्या शरीराचे तापमान नियंत्रणासाठी व बाळाचे आरोग्य सुदृढ बनवण्यासाठी तुम्ही बाळाची मालिश करू शकता यामुळे बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते तसेच त्यांना अन्य आजार सुद्धा कमी होतात. जर आपण बाळाची मोहरीच्या तेलाने किंवा तिळाच्या तेलाने मालिश केली तर यामुळे बाळाचे वजन सुद्धा वाढते तसेच बाळाच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती जास्त प्रमाणामध्ये विकसित होऊन बाळ सदृढ राहण्याचा प्रयत्न करते. जर या लेखांमध्ये सांगितलेल्या गोष्टी आपण काही पाळल्या तर बाळाचे आरोग्य चांगले राहण्यासाठी मदत होणार आहे.

टिप्स : या लेखांमध्ये सांगितलेल्या माहिती सर्वसाधारणपणे सांगण्यात आलेली आहे जर तुम्हाला कोणत्याही माहितीचा उपयोग करायचा असेल तर अशा वेळी तज्ञ मंडळी व फॅमिली डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या टीव्ही 9 तुम्हाला कोणतेच उपाय स्वतःहून करण्याचा सल्ला देत नाही.

औरंगाबादमधील 15 खासगी प्रयोगशाळांना मनपाच्या नोटिसा, अँटिजन, RTPCR टेस्ट करण्यास टाळाटाळ!

वाढत्या वयाबरोबर शरीर देते हे संकेत… वेळीच योग्य आहाराकडे लक्ष द्या…

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.