Weight Loss | वजन कमी करायचंय? मेथीच्या दाण्यांचा असा करा वापर…
मेथीच्या दाण्यांमध्ये मुबलक प्रमाणात जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. यामुळे जेवणाची चव तर वाढतेच शिवाय आरोग्यासाठीही हे अत्यंत फायदेशीर असतात. वाढते वजन कमी करण्यासाठी मेथीचे दाणे अत्यंत प्रभावी काम करीत असतात. त्यांचा आहारात कसा उपयोग करावा याची माहिती जाणून घेणार आहोत...
लठ्ठपणा ही आजकाल मोठी समस्या निर्माण झाली आहे. लठ्ठपणामुळे मधुमेह, उच्चरक्तदाब सारख्या अनेक व्याधी निर्माण होत असतात. त्यामुळे लठ्ठपणा नियंत्रीत करणे हे सध्या मोठे आव्हान आहे. तंदुरुस्त राहण्यासाठी तसेच वजन कमी करण्यासाठी शारीरिक हालचालींसोबतच सकस आहारही अत्यंत महत्त्वाचा आहे. वजन कमी करण्यासाठी अनेक उपाय योजना केल्या जात असतात. त्याचप्रमाणे मेथीच्या दाण्यांचाही (Fenugreek seeds) आहारात समावेश करून वजन नियंत्रीत (Weight control) केले जाउ शकते. मेथीच्या दाण्यांचा अनेक वर्षांपासून औषधी गुणधर्मांसाठी वापर केला जात आहे. फायबर, लोह, जीवनसत्त्वे ए आणि डी सारख्या पोषक तत्वांनी समृद्ध असल्याने त्याचे योग्य प्रमाणात सेवन केल्यास वजन कमी होण्यासही मदत होते. मेथीच्या दाण्यांमध्ये भरपूर फायबर असते. ते पचनसंस्था (Digestive system) निरोगी ठेवतात. हे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत होते. यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासही मदत होते.
मेथीचे पाणी
एक चमचा मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. किंवा तुम्ही बिया पाण्यात उकळू शकता. ते गाळून रिकाम्या पोटी सेवन करा.
मेथीचा चहा
मेथीचा चहा बनवण्यासाठी तुम्हाला एक चमचा मेथीचे दाणे, दालचिनी आणि आल्याचा तुकडा लागेल. एका पॅनमध्ये पाणी उकळा आणि त्यात तीनही घटक घाला. ते तयार करण्यासाठी 5 मिनिटांपेक्षा कमी वेळ लागेल. हा चहा तुम्हाला वजन कमी करण्यास मदत करेल. आले आणि दालचिनी या दोन्हीमध्ये भरपूर जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. हे दोन्ही आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत.
मोड आलेले मेथीचे दाणे
तुम्ही मोड आलेल्या मेथीचेही सेवन करू शकता. यासाठी दोन चमचे मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. हे अंकुरलेले मेथीचे दाणे सकाळी खा. रिकाम्या पोटी किंवा जेवणादरम्यानही तुम्ही त्यांचे सेवन करू शकता.
मेथी आणि मध
वजन कमी करण्यासाठी मेथीचे दाणे आणि मधाची पेस्टदेखील खाऊ शकतो. यासाठी मेथीचे दाणे बारीक वाटून घ्यावेत. यानंतर त्यात मध मिसळून सेवन करा. याशिवाय तुम्ही ही मेथी पावडर पाण्यात उकळू शकता. यानंतर त्यात मध आणि लिंबाचा रस मिसळून हर्बल टी म्हणून त्याचे सेवन करता येते. मधामध्येही अनेक पोषक घटक असतात. यामध्ये व्हिटॅमिन बी, कॅल्शियम, जस्त, लोह आणि तांबे असते.
संबंधित बातम्या :
काय गं… गरोदरपणात तुला स्पॉटिंगची समस्या..? अशावेळी नेमकी काय काळजी घ्यावी, जाणून घ्या!
मधुमेहाच्या रुग्णांना 45 टक्के किडनीचे आजार होण्याचा धोका, या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका!
महिलांनो… या समस्येविषयी न लाजता बिनधास्त डाॅक्टरांना बोला, नाही तर समस्या अधिक गंभीर होऊ शकते!