Health care : सर्दी-खोकल्यापासून मुक्ती हवी असेल तर प्या ओव्याचा काढा, वाढेल रोगप्रतिकारक शक्ती !

बदलत्या हवामानमुळे बऱ्याच लोकांना सर्दी- खोकल्याचा त्रास जाणवू लागतो. तसेच कोरोनाच्या रुग्णांची संख्याही पुन्हा वाढत आहे. अशा वेळी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी तुम्ही ओव्याचा काढा पिऊ शकता.

Health care : सर्दी-खोकल्यापासून मुक्ती हवी असेल तर प्या ओव्याचा काढा, वाढेल रोगप्रतिकारक शक्ती !
Cough And ColdImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Aug 31, 2022 | 10:41 AM

कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढायला सुरूवात झाली आहे. या आजाराचे मुख्य लक्षण आहे सर्दी-खोकला (cough and cold). हे आजार कोणत्याही ऋतूत आणि महिन्यात सामान्यतत: होतच असतात. विशेषत: पावसाळ्यात (rainy season) सर्दी-खोकल्याच्या रुग्णांचे प्रमाण खूप वाढते. हे अनेक संसर्गांशी जोडलेले असते. जेव्हा शरीराची रोगप्रतिकारकक्षमता कमी होते, तेव्हा सर्दी, खोकला आणि तााप येण्याचा धोका वाढतो. यापासून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्ही घरगुती उपाय करून पाहू शकता. तसेच रोगप्रतिकारक क्षमताही (immunity) वाढवणे महत्वाचे असते. ओवा हे एक आयुर्वेदिक औषध आहे. आपल्या सर्वांच्या घरात ओवा (carrom seeds)असतोच. पोटदुखीचा, गॅसेसचा त्रास झाला तर ओवा आणि मीठ चावून खायला सांगतात. सर्दी-खोकल्यापासून आराम हवा असेल तर ओव्याचा काढा प्या.

ओव्यामुळे वाढते रोगप्रतिकारक क्षमता

गेल्या कित्येक वर्षांपासून भारतीय स्वयंपाकघरात ओव्याचा उपयोग हमखास होतोच. ओव्याच्या बियांमध्ये एक वेगळा तिखट स्वाद, चव असते. त्याचा उपयोग लोणचं, भाजी आणि पराठ्यांची चव वाढवण्यासाठी केला जातो. ओव्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. तसेच ओव्यामुळे शरीरातील रोगप्रतिकारक क्षमताही वाढते.

सर्दी-खोकला दूर करण्यासाठी ओवा उपयुक्त

ओव्यामध्ये ॲंटी-ऑक्सीडेंट गुणधर्म असतात, जे फ्री रेडियल ॲक्टिव्हिटी थांबवण्यास मदत करतात. तसेच ओव्यामध्ये ॲंटी-बॅक्टेरिअल गुणधर्मही असतात, जे ऋतुमानानुसार होणाऱ्या संसर्गापासून शरीराचे रक्षण करतात. थंडी, बंद नाक आणि छातीमध्ये कफ झाल्यामुळे होणारा त्रास, ओव्याच्या काढ्याच्या सेवनामुळे कमी होतो.

कसा तयार करावा ओव्याचा काढा ?

साहित्य

2 चमचे ओवा, तुळशीची पाने, 1 छोटा चमचा काळी मिरी, 1 चमचा मध, पाणी .

कृती

  • ओव्याचा काढा तयार करण्यासाठी एका पॅनमध्ये ओवा, तुळशीची पाने, काळी मिरी आणि एक कप पाणी घालून ते मिश्रण 5 मिनिटांपर्यंत उकळू द्यावे. त्यानंतर गॅस बंद करून ते मिश्रण गार होऊ द्यावे. ते गार झाल्यानंतर गाळून घ्यावे व त्यामध्ये थोडा मध घालून तो काढा प्यावा. मात्र हा काढा तयार करताना त्यात मध घालू नये. जास्त गरमीमुळे मधीचे औषधी गुण नष्ट होऊ शकतात. सर्दी-खोकल्यापासून लगेच आराम हवा असेल तर हा काडा दिवसातून 2 वेळा प्यावा.
  • जर तुम्हाला या काढ्याची तिखट चव आवडत नसेल तर गरम पाण्यात थोडा ओवा घालावा आणि ते पाणी दिवसभर घोट-घोट प्यावे.

( टीप- या आर्टिकलमध्ये सुचवण्यात आलेले उपाय व देण्यात आलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा. )

आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले...
आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले....
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?.
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?.
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट.
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी.
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं.
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली.
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?.
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण.