Shaving | उल्टी दाढी करण्याचे चेहऱ्याच्या स्कीनला फायदे आहेत की तोटे ?
अनेक पुरुषांना सलूनमध्ये हा प्रश्न विचारला जातो की, शेव्हिंग उलट्या दिशेने करायची की सरळ दिशेने? कारण उलट दिशेने शेव्हिंग केली तर ती अधिक गुळगुळीत दिसते, अशी शेव्हिंग अनेकांना आवडते.
मुंबई | 22 ऑगस्ट 2023 : पुरुषांसाठी ही बातमी महत्त्वाची आहे, उल्टी दाढी म्हणजे चेहऱ्याची Shaving करताना ती केसांच्या उलट दिशेने केलेली चांगली की, केसांची नैसर्गिक वाढ आहे, त्या सुलट दिशेने केलेली चांगली, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. चेहऱ्याच्या स्कीनसाठी ही अतिशय महत्त्वाची माहिती आहे. अनेक पुरुषांना सलूनमध्ये हा प्रश्न विचारला जातो की, शेव्हिंग उलट्या दिशेने करायची की सरळ दिशेने? कारण उलट दिशेने शेव्हिंग केली तर ती अधिक गुळगुळीत दिसते, अशी शेव्हिंग अनेकांना आवडते. पण अशा स्थितीत नेमकी चेहऱ्याच्या त्वचेसाठी कोणती शेव्हिंग अधिक महत्त्वाची आहे, हे जाणून घेणे निश्चित चेहऱ्याच्या त्वचेसाठी महत्वाचे आहे.
उलट्या दिशेने म्हणजेच उलटी शेव्हिंग केली, तर ती अधिक गुळगुळीत दिसते, पण अशी शेव्हिंग निश्चित त्वचेच्या अधिकच जवळून जाऊन होते, यामुळे ही शेव्हिंग करताना सुरुवातीला त्वचेची जळजळ होते. मात्र हे नेहमीच सवयीचं झालं, तर काही दिवसांनी इथली त्वचा काळी पडते. संवेदनशील त्वचा असणाऱ्यांनी अशी शेव्हिंग करणे, चेहऱ्याच्या त्वचेसाठी अतिशय घातक असल्याचं सांगण्यात येतं. यामुळे तुमच्या चेहऱ्याची त्वचा अधिक राट, म्हणजेच जाड होते.
तुमच्या चेहऱ्याच्या त्वचेवर जेवढ्या जवळून आणि जेवढ्या जास्त वेळेस ब्लेड जात असेल, तेवढ्या लवकर तुमची त्वचा ही जाड आणि काळी पडते, गोऱ्या लोकांच्या चेहऱ्यावरही वेगळेच व्रणासारखे डाग दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही. तुमच्या त्वचेवर एक अतिशय नाजूक पातळ त्वचा असते, ती त्वचा नेहमीच घासली गेली तर असे परिणाम दिसतात, यामुळे जास्तच जास्त लोक चेहऱ्याच्या त्वचेवरील केस ज्या नैसर्गिक बाजूकडे झुकलेले असतात, तशी सुलट म्हणजेच सरळ दिशेने शेव्हिंग करतात.
शेव्हिंग नेमकी कशी करावी?
चेहरा शेव करताना नेहमीच सरळ बाजूनेच शेव्ह केली पाहिजे, यासाठी चांगलं ब्लेड असणंही अत्यावश्यक आहे.कारण जेवढ्या जास्त वेळेस तुम्ही त्वचेवर ब्लेड फिरवाल तेवढं त्या त्वचेसाठी नक्कीच घातक असतं. अनेकांची त्वचा यामुळे कडक होत जाते. ज्यावेळी शेव्हिंग करताना तुम्हाला अधिक जळजळ होईल, तेव्हा समजा आपली त्वचा जास्त घासली जात आहे. म्हणून काहीतरी चुकतंय असं समजून शेव्हिंग सरळ करा, म्हणून चेहऱ्याच्या खालून वरच्या दिशेने शेव करु नका, तर गालाच्या वरुन खालच्या दिशेने म्हणजेच सरळ दिशेने शेव्हिंग करा, यामुळे तुम्हाला त्वचेच्या समस्या येणार नाहीत.