नजर कमकुवत कशामुळे होते? त्याची लक्षणं काय? त्यावर उपाय काय?
तसं पाहिलं तर दृष्टी कमकुवत होण्यामागे अनेक कारणं असतात. जसे की मोबाईल आणि लॅपटॉपचा अतिवापर, धूम्रपान आणि खाण्यापिण्यात व्यत्यय येऊ शकतो. काय कारणांमुळे दृष्टी कमकुवत होते हे आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत.
मुंबई: बदलत्या जीवनशैलीमुळे लोकांमध्ये डोळ्यांशी संबंधित आजार झपाट्याने वाढत आहेत. हल्ली लहान मुलांनादेखील चष्मा लागतो. त्याचबरोबर दूरवरची दृष्टी कमकुवत होण्याच्या समस्येने बहुतांश लोक त्रस्त असतात. तसं पाहिलं तर दूरची दृष्टी कमकुवत होण्यामागे अनेक कारणं असतात. जसे की मोबाईल आणि लॅपटॉपचा अतिवापर, धूम्रपान आणि खाण्यापिण्यात व्यत्यय येऊ शकतो. काय कारणांमुळे दूरची दृष्टी कमकुवत होते हे आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत.
दूरची दृष्टी कमकुवत होण्याची लक्षणे:
- जर दूरची दृष्टी कमकुवत असेल तर आपल्याला सुरुवातीला अस्पष्ट दृष्टीची समस्या उद्भवू शकते. पण जसजशी ही समस्या वाढत जाते तसतशी तुमची लक्षणेही गंभीर होऊ लागतात. अशा वेळी चुकूनही या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका.
- वारंवार पापण्या मिटणे, अस्पष्ट दृष्टी, वाहन चालवताना समोरच्या गोष्टी दिसण्यास त्रास होणे, डोळ्यात सारखे पाणी येणे, तीव्र डोकेदुखी, गोष्टी नीट न दिसणे, वाचताना पापण्या आकुंचित होणे.
दृष्टी कमकुवत होऊ नये म्हणून टिप्स
दृष्टी कमी होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे धूम्रपान आणि आहारातील बिघाड. अशा वेळी काही सवयी सुधारून तुम्ही दूरची दृष्टी कमकुवत होण्यापासून वाचवू शकता. त्याचबरोबर दूरची दृष्टी कमकुवत होऊ नये म्हणून काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी.
- वेळोवेळी डोळ्यांची तपासणी करून घ्या.
- उन्हापासून डोळ्याचे संरक्षण करण्यासाठी बाहेर पडताना सनग्लासेसचा वापर करा.
- लॅपटॉप किंवा फोन वापरताना मध्येच ब्रेक घ्या.
- पुस्तक वाचताना चांगला प्रकाश ठेवावा.
- आहारात फळे आणि हिरव्या भाज्यांचा समावेश करा.
- मधुमेह आणि उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी वेळोवेळी डोळ्यांची तपासणी करून घ्यावी.
(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)