इथल्या हवेत काहीतरी खास आहे… ‘यामुळे’ लोक 100 वर्षांपेक्षा जास्त जगतात…
चांगले खा, आनंदी राहा, यातून आयुष्य वाढते, दीर्घकाळ तरूण (Young) राहता येते हे आपण अनेक वेळा ऐकले आहे. याच माध्यमातून पाकिस्तानातील काही लोकांनी आपल्या आयुष्यात हे प्रत्यक्षात उतरवले आहे.
चांगले खा, आनंदी राहा, यातून आयुष्य वाढते, दीर्घकाळ तरूण (Young) राहता येते हे आपण अनेक वेळा ऐकले आहे. याच माध्यमातून पाकिस्तानातील काही लोकांनी आपल्या आयुष्यात हे प्रत्यक्षात उतरवले आहे. याचा परिणाम म्हणून या खास ठिकाणचे लोक त्यांच्या निरोगी जीवनशैलीमुळे (lifestyle) जगभरात ओळखले जातात. असं म्हणतात की इथले लोक वयाच्या 60 व्या वर्षीही 30-40 वर्षांचे दिसतात अनेक जण तर 120 वर्षांपर्यंत जगतात आणि हे केवळ त्यांच्या सवयींमुळे शक्य झाले आहे. आता प्रश्न असा आहे, की हे ठिकाण नेमके आहे कुठे आणि तिथले लोक कसे राहतात आणि काय खातात याची सर्वांनाच खुप उत्सूकता लागली आहे. या लोकांच्या निरोगी (Healthy) जीवनपध्दतीमुळे त्यांचे नाव जगात कोरले गेले आहे. अनेकांना त्याच्या रोजच्या क्रियाकलापाबाबत प्रचंड उत्सूकता निर्माण झालेली आहे. चला तर मग बघू या नेमकी काय आहे त्यांची जीवनपध्दती…
कुठे आहे हे ठिकाण?
हे ठिकाण आपल्या शेजारील पाकिस्तानात आहे. पाकिस्तानात हिमालयाच्या कुशीत एक खोरे आहे, त्याचे नाव हुंजा व्हॅली असून त्याला हुंजा खोरे असे म्हटले जाते. या ठिकाणी सर्वात निरोगी लोक राहतात. हा भाग पाकिस्तानातील बालितिस्तानमध्ये येतो आणि ज्यांच्या आरोग्याची जगभरात चर्चा होते, ते ‘बुरुशो’ लोक आहेत. या संपूर्ण प्रदेशात फक्त पर्वत असून या डोंगराळ भागातील लोकांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. लोकांच्या आरोग्याबरोबरच हे ठिकाण नैसर्गिक सौंदर्य, इतिहास, साक्षरता, फळे इत्यादींसाठीही प्रसिद्ध आहे.
इथले लोक का प्रसिद्ध आहेत?
सोशल मीडियापासून अनेक बातम्यांपर्यंत, असे म्हटले गेले आहे की येथील लोक 120 वर्षांहून अधिक जगतात आणि निरोगी आहेत. येथील वृद्ध स्त्रिया देखील इतर शहरातील 40 वर्षांच्या महिलांसारख्या तरुण आणि सक्रिय दिसतात. इथं अनेक वर्षांनी माणूस म्हातारा होतो असेही म्हटले जाते. या भागातील लोकांपर्यंत कॅन्सर अजून पोहोचलेला नाही आणि स्त्रिया 65 वर्षांपर्यंत मुले जन्माला घालू शकतात, असा दावा केला जातो. याशिवाय इथल्या लोकांच्या आरोग्याशी संबंधित इतरही अनेक दावे आहेत.
इथले लोक तरुण का दिसतात?
हा काही चमत्कार नाही, पण इथली जीवनशैली याला महत्त्वाच कारण आहे. रिपोर्ट्सनुसार, त्याच्या डाएट चार्टमध्ये फक्त पौष्टिक अन्नाचा समावेश आहे. संशोधकांनी त्यांच्या अहवालात म्हटले आहे की, हुंजा लोक त्यांच्या अन्नात उन्हात सुकवलेले अक्रोड आणि एक विशेष प्रकारचा सुका मेवा अधिकाधिक वापरतात. त्याला जर्दाळू (Apricot) म्हणतात. याशिवाय हे लोक कच्च्या भाज्या, फळे, धान्य, नट, दूध, अंडी आणि चीज यांचाही रोजच्या आहारात समावेश करतात. या समाजात बागेत कीटकनाशकांची फवारणी करण्यास बंदी आहे. यासोबतच कमी मानसिक दबावामुळे येथील लोक आनंदी राहतात आणि दीर्घायुष्य जगतात.