ICMR | हे खास डास डेंग्यू आणि चिकनगुनिया नष्ट करतील, ICMR च्या शास्त्रज्ञांना मिळाले मोठे यश!
ICMR-VCRC च्या संशोधकांनी एडिस ऍप्टिसच्या दोन प्रजाती विकसित केल्या आहेत. या दोन्ही प्रजाती डेंग्यूचा नायनाट करतील. या वर्षी भारत सरकारने डेंग्यूचा सामना करण्यासाठी DNDI सोबत करार केला आहे. सध्या डेंग्यूशी लढण्यासाठी कोणतेही औषध नाही. हा आजार वेगाने पसरतो. पावसाळ्यात डेंग्यूचे रूग्ण जास्त सापडतात.
मुंबई : ICMR ला एक मोठे यश मिळाले आहे. डासांमुळे (Mosquitoes) होणा-या डेंग्यू आणि चिकनगुनियासारख्या आजारांपासून दूर राहण्यासाठी हे मोठे यश मिळाले जात आहे. डेंग्यू आणि चिकनगुनिया हे आजार पसरवणाऱ्या डासांना नष्ट करण्यासाठी ICMR ने अशा मादी डासांची रचना केली आहे, ज्यातून निर्माण होणाऱ्या अळ्यांमध्ये त्यांचे विषाणू नसतील. यामुळे सर्वांनाच मोठा दिला मिळणार आहे. कारण पावसाळ्याच्या (Rainy season) तोंडावर डेंग्यू आणि चिकनगुनियाच्या रूग्णांमध्ये झपाट्याने वाढ होते. डेंग्यूमध्ये ताप येऊन शरीरातील पेशी कमी होतात. डेंग्यूमुळे (Dengue) दरवर्षी अनेकांचा जीव देखील जातो.
यासंदर्भात डाॅ.अश्वनी कुमार यांनी ANI ला माहिती दिली
#WATCH | Puducherry| Prepared mosquitoes to replace Dengue & Chikungunya mosquitoes. Will release female ones which will mate with males&produce larvae who don’t have these viruses. We’ve prepared mosquitoes&eggs & can release them anytime: Dr Ashwani Kumar Director ICMR-VCRC pic.twitter.com/zKx7Yb3s1Y
हे सुद्धा वाचा— ANI (@ANI) July 6, 2022
ICMR चे संचालक डॉ. अश्वनी कुमार म्हणाले की…
ICMR-VCRC चे संचालक डॉ. अश्वनी कुमार म्हणाले की, आम्ही अशा मादी डासांना सोडू जे नर डासांच्या संपर्कात येतील आणि अशा अळ्या निर्माण करतील, ज्यात हे विषाणू नसतील. त्यांनी सांगितले की आम्ही डास आणि अंडी तयार केली आहेत आणि ती कधीही सोडू शकतो. पुढे बोलताना अश्वनी म्हणाले की, वैज्ञानिकांनी एक विशेष प्रकारचा डास विकसित केला आहे. जो हळूहळू डेंग्यू आणि चिकनगुनियाला हद्दपार करेल. आम्ही अशा मादी डासांना सोडू, जे नर डासांच्या संपर्कात येऊन अशा अळ्या तयार करतील, ज्यात हे विषाणू नसतील. आम्ही डास आणि अंडी तयार केली आहेत.
डेंग्यू आणि चिकनगुनियाचे डास होणार हद्दपार
संशोधकांनी एडिस ऍप्टिसच्या दोन प्रजाती विकसित केल्या आहेत. या दोन्ही प्रजाती डेंग्यूचा नायनाट करतील. या वर्षी भारत सरकारने डेंग्यूचा सामना करण्यासाठी DNDI सोबत करार केला आहे. सध्या डेंग्यूशी लढण्यासाठी कोणतेही औषध नाही. हा आजार वेगाने पसरतो. पावसाळ्यात डेंग्यूचे रूग्ण जास्त सापडतात. रुग्णांमध्ये रक्तातील प्लेटलेट्स झपाट्याने वाढतात किंवा कमी होऊ लागतात. काही वेळा रुग्णाला अंतर्गत रक्तस्त्राव सुरू होतो. अशा स्थितीत अनेक अवयव काम करणे बंद करतात. रुग्णाचाही मृत्यूही होतो.