Vitamin B12 ची कमतरता आहे तर या डाळीच्या पाण्याचे सुरु करा सेवन
व्हिटॅमिन बी 12 हा एक घटक आहे जो डीएनए बनवण्यासाठी आणि आपल्या पेशींमध्ये ऊर्जा निर्माण करण्यासाठी आवश्यक आहे. या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे शरीरात अनेक आरोग्य समस्या निर्माण होतात.
Vitamin B12 Deficiency: व्हिटॅमिन बी 12 हा घटक आपल्या पेशींमध्ये ऊर्जा निर्माण करण्याचं काम करतो. या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे शरीरात अनेक आरोग्याच्या समस्या येऊ शकतात. तसेच व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे अशक्तपणा आणि थकवा देखील जाणवतो, शरीरात यामुळे सूजही येऊ लागते. त्यामुळे जर तुम्हाला ही लक्षणे दिसत असतील तर तुम्ही कोणत्या गोष्टींचे सेवन करणे महत्वाचे आहे ज्यामध्ये व्हिटॅमिन बी 12 मुबलक प्रमाणात आढळते. ते जाणून घेणे महत्त्वाचे आहे. तुम्हाला तुमच्या आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश करण्याचा सल्ला दिला जातो जाणून घ्या.
व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेवर मात कशी करावी
व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेवर मात करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात काही बदल करु शकतात. यासाठी तुमची जीवनशैली सुधारणे देखील महत्त्वाचे असते. मांसाहारी पदार्थांमध्ये व्हिटॅमिन बी12 मोठ्या प्रमाणात आढळते. पण तुम्हाला माहित आहे का की तुमच्या स्वयंपाकघरात मिळणाऱ्या एका डाळीतही हे मुबलक प्रमाणात आढळते.
पोषणतज्ञ नमामी अग्रवाल यांच्या माहितीनुसार, शरीरातील या व्हिटॅमिनची कमतरता पूर्ण करण्यासाठी तुम्ही मूगच्या डाळीचे पाणी पिऊ शकता. या डाळीमध्ये व्हिटॅमिन बी12 मुबलक प्रमाणात आढळते. याचे दररोज सेवन केल्यास या जीवनसत्त्वाची कमतरता दूर होण्यास मदत होते.
View this post on Instagram
कसे करावे सेवन
रात्री झोपण्यापूर्वी एक कप मूग डाळ नीट स्वच्छ धुवून घ्या. त्याला आता पाण्यात भिजवा. सकाळी जर मुग नीट भिजत असेल तर या पाण्याचे सेवन करा. याशिवाय उरलेल्या कडधान्यांचे सेवन तुम्ही त्यात कांदा आणि लिंबू घालून सेवन करू शकतात.