तुम्हालाही खूप तहान लागते का, तर होऊ शकतो हा गंभीर आजार
तहान लागणे तसे सामान्य असते. पण जर वांरवार पाणी पिण्याची इच्छा होत असेल किंवा तहान लागत असेल तर तुम्हाला खालील पैकी कोणती एक समस्या असू शकते. कोणत्या कोणत्या समस्यांमध्ये तहान लागते हे जाणून घ्या आणि वेळीच सावध व्हा.
मुंबई : शरीर निरोगी ठेवायचे असेत तर दररोज पुरेसे पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. पाण्यामुळेच शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात, ज्यामुळे मनुष्य अनेक आजारांपासून दूर राहू शकतो. पाणी पिल्यानंतरच अन्न पचण्यासही मदत होते. याशिवाय वजन कमी करण्यासाठी पाणी देखील उपयुक्त ठरू शकते. परंतु तुम्हाला माहिती आहे का, जास्त तहान लागणे देखील आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकते. जर तुम्हाला ही वारंवार तहान लागत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.
तुम्हाला जर जास्त तहान लागत असेल तर काळजी घेणे आवश्यक आहे. कारण हे कोणत्यातरी आजारांचे लक्षणं देखील असू शकते.
मधुमेह
वारंवार तहान लागत असेल तर मग रक्तातील साखर वाढल्याचे हे लक्षण असू शकते. शरीरातील साखरेचे प्रमाण वाढले की, आपले शरीर लघवीद्वारे ती काढून टाकण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता भासते आणि जास्त तहान लागते.
अशक्तपणा
शरीरात हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे अॅनिमिया होतो. ही समस्या महिलांमध्ये जास्त दिसते. हे अनेक कारणांमुळे होऊ शकते, जसे की खराब आहार किंवा जास्त रक्तस्त्राव. या स्थितीत तुम्हाला जास्त तहानही लागते. यामध्ये चक्कर येणे, थकवा येणे, घाम येणे आणि इतर लक्षणे देखील असू शकतात.
वारंवार तोंड कोरडे पडणे
तोंड कोरडे पडल्याने तहान लागण्याची समस्या निर्माण होते. अति धुम्रपान, जास्त प्रमाणात औषधे घेणे इत्यादींमुळे देखील ही समस्या उद्भवते ज्यामुळे तोंड कोरडे पडण्याची समस्या वारंवार उद्भवते, ज्यामुळे तुम्हाला जास्त तहान लागते.
तोंड कोरडे पडत असल्यास दुर्गंधी, चव बदलणे, हिरड्या जळणे आणि अन्न चघळण्यास त्रास होऊ शकतो.
गर्भधारणेमुळे देखील तहान लागण्याची समस्या उद्भवते. पहिल्या तीन महिन्यात रक्ताचे प्रमाण वाढते ज्यामुळे मूत्रपिंडात जास्त द्रव तयार होतो, ज्यामुळे वारंवार लघवी होते. याशिवाय शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे जास्त तहान लागते.