व्हिटॅमिन ‘सी’ची कमी? आहारात करा ‘या’ गोष्टींचा समावेश
आपल्या शरीराला व्हिटॅमिन सी ची मोठ्या प्रमाणात गरज असते. व्हिटॅमिन सी ची कमी असल्यास त्वचेची चमक कमी होते आणि कोरडेपणा दिसू लागतो. शरीरातील व्हिटॅमिन सी चे प्रमाण वाढवण्यासाठी आंबट फळांचे आणि फळांचे सेवन करणे आवश्यक आहे.
व्हिटॅमिन सी हे पोषक तत्व आहे. जे तुम्हाला निरोगी ठेवण्यास महत्त्वाची भूमिका बजावते. हे केवळ निरोगी राहण्यासाठी नाही तर त्वचेसाठी देखील व्हिटॅमिन सी आवश्यक आहे. शरीरातील दात हिरड्या, रक्तवाहिन्या, निरोगी ठेवण्यासाठी आणि प्रतिकारशक्ती मजबूत ठेवण्यासाठी व्हिटॅमिन सी आवश्यक आहे. तसेच रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास देखील मदत होते. व्हिटॅमिन सी च्या कमतरतेमुळे त्वचेची चमक कमी होते आणि कोरडेपणा दिसू लागतो. व्हिटॅमिन सी च्या कमतरतेमुळे सुरकुत्यांसारखी अकाली वृद्धत्वाची लक्षणे दिसतात.
शरीरात व्हिटॅमिन सीची कमतरता जाणवू लागल्यास आहारात सुधारणा करणे आवश्यक असते. तुम्ही खात्री करण्यासाठी पोषण चाचणी देखील घेऊ शकतात. कारण जर परिस्थिती गंभीर झाली तर स्कर्वी होऊ शकते. ज्यामध्ये चेहरा फिकट होतो, अंगावर पुरळ उठते, दात मोकळे होतात, रक्तस्त्राव यासारखी लक्षणे दिसतात. चला तर जाणून घेऊया व्हिटॅमिन सी साठी कोणत्या गोष्टींचे सेवन कारणे आवश्यक आहे.
हिरव्या पालेभाज्या
व्हिटॅमिन सीच्या कमीवर मात करण्यासाठी शिमला मिरची, ब्रोकली, पालक ,मेथी, फुल कोबी, पत्ता कोबी, कडधान्य यांचा आहारात समावेश करावा. यांची भाजी बनवण्याऐवजी ज्यूस किंवा सूप बनवून पिल्यास त्याचा जास्त फायदा होतो.
आंबट फळांचे सेवन करा
शरीरात विटामिन सी वाढवण्यासाठी आंबट फळांचे सेवन करणे फायदेशीर आहे. तुमच्या आहारात संत्रा किंवा लिंबू,द्राक्ष,आवळा यासारख्या फळांचा समावेश करा. ही फळे सकाळी किंवा संध्याकाळी खाण्याऐवजी दिवसा खाणे जास्त फायदेशीर आहे. कारण त्याच्या थंड आणि आम्लयुक्त स्वभावामुळे जर तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी त्याचे सेवन केले तर तुम्हाला ऍसिडिटी होण्याची शक्यता असते.
डॉक्टरांशी संपर्क साधा
जर व्हिटॅमिनसी ची कमतरता असेल आणि तुम्हाला त्याची गंभीर लक्षणे जाणवत असतील तर अशा परिस्थितीत तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. जेणेकरून तुम्हाला योग्य आहाराविषयी माहिती मिळू शकेल आणि जर सप्लिमेंट ची गरज असेल तर तेही घ्या फक्त यासाठी तज्ञांचा सल्ला आवर्जून घ्या.