तुम्हालाही ‘ही’ लक्षणे जाणवत असतील तर व्हा वेळीच सावध; असू शकतो पोटाचा अल्सर, हे घरगुती उपाय ठरतील फायदेशीर

बऱ्याचवेळा तुमच्या पोटात (Stomach) अचानक दुखते. किंवा जेवल्यानंतर तुम्हाला मळमळीचा त्रास सुरू होतो. उलट्या होणार असल्याचा भास होतो. तुम्ही कधी विचार केला आहे का की तुमच्या सोबत असे का होते? तुम्हालाही ही लक्षणे जाणवत असतील तर याकडे दुर्लक्ष करू नका वेळीच डॉक्टरांचा सल्ला (Doctor's advice) घ्या.

तुम्हालाही 'ही' लक्षणे जाणवत असतील तर व्हा वेळीच सावध; असू शकतो पोटाचा अल्सर, हे घरगुती उपाय ठरतील फायदेशीर
पोटाच्या समस्या
Follow us
| Updated on: Feb 10, 2022 | 10:24 PM

Health tips : बऱ्याचवेळा तुमच्या पोटात (Stomach) अचानक दुखते. किंवा जेवल्यानंतर तुम्हाला मळमळीचा त्रास सुरू होतो. उलट्या होणार असल्याचा भास होतो. तुम्ही कधी विचार केला आहे का की तुमच्या सोबत असे का होते? तुम्हालाही ही लक्षणे जाणवत असतील तर याकडे दुर्लक्ष करू नका वेळीच डॉक्टरांचा सल्ला (Doctor’s advice) घ्या. तुमच्यामध्ये ही लक्षणे दिसत असल्यास तुम्हाला पोटाचा अल्सर (Stomach ulcers) देखील असू शकतो. अल्सर असल्यास त्याकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका. अल्सरकडे दीर्घकाळ दुर्लक्ष केल्यास तुम्हाला भविष्यात पोटाचा कॅन्सर होण्याची देखील दाट शक्यता असते. अल्सर म्हणजे तुमच्या पोटाच्या आणि लहान आतड्याच्या अस्तरावर फोड येतात. पुढे चालून हा अल्सर तुमच्या अन्ननलिकेपर्यंत देखील पोहोचू शकतो. अल्सरचे अनेक प्रकार आहेत. रात्री उशिरा जेवणे, अवेळी खाणे, व्यायामाचा अभाव, झोप पूर्ण न होणे अशा विविध कारणांमुळे तुम्हाला पोटाचा अल्सर होऊ शकतो. तुम्हालाही अशी लक्षणे आढळून आल्यास वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. डॉक्टरांच्या सल्ल्यासोबतच तुम्हाला काही घरगुती उपयांनी देखील पोटाच्या अल्सरपासून आराम मिळू शकतो. आज आपण अशाच काही घरगुती उपयांबाबत जाणून घेणार आहोत.

दही

दह्यामध्ये मोठ्याप्रमाणात प्रोबायोटिक्सचे गुणधर्म असतात. प्रोबायोटिक्स हे पचनसंस्थेतील जीवाणूंचे संतुलन राखण्यास मदत करते. दह्यामुळे आतड्यांचे आरोग्य उत्तम राहाते आणि तुम्ही अल्सरसारख्या आजारांपासून दूर राहाता. यामुळेच तज्ज्ञांकडून आहारात दह्यासारख्या पदार्थांचा समावेश करण्याचा सल्ला दिला जातो.

आले

आल्यामध्ये अनेक प्रकारचे औषधी गुणधर्म असतात. आल्याच्या नियमित सेवनाने बद्धकोष्ठता, पोटात गोळा येणे आणि जठराची सूज अशा विविध आजारांपासून आराम मिळतो. त्यामुळे आल्याचा आहारात नियमित समावेश करावा.

फळे

अनेक फळांमध्ये फ्लेव्होनॉइड्स नावाची संयुगे आढळून येतात. फ्लेव्होनॉइड्स संयुगे ही अल्सरसारख्या आजारात उपयुक्त असतात. फ्लेव्होनॉइड्स हे पोटाच्या अल्सरच्या अस्तरांना विकसित होण्यापासून वाचवते. सफरचंद, ब्लूबेरी, चेरी, लिंबू आणि संत्रीमध्ये मोठ्याप्रमाणात फ्लेव्होनॉइड्स आढळून येते.

केळी

कच्च्या केळ्यामध्ये ल्युकोसायनिडिन नावाच्या फ्लेव्होनॉइडचे गुणधर्म आढळतात, ज्यामुळे पोटातील श्लेष्माचे प्रमाण वाढते. केळ्यामध्ये अॅसिड कमी करण्याची क्षमताही असते. अशा स्थितीत अल्सरच्या रुग्णांना आहारात केळीचा समावेश करण्याचा सल्ला दिला जातो.

टीप : वरील महिती सामान्यज्ञानाच्या हेतूने देण्यात आली आहे. कुठलेही औषधोपचार करण्यापूर्वी एकदा आवश्य डॉक्टरांचा सल्ला घ्या.

संबंधित बातम्या

शेअरचॅटचा ‘टकाटक’ टेकओव्हर; MX TakaTak खिश्यात, 600 मिलियन डॉलरला खरेदी

Oral Cancer : ‘या’ गोष्टींची काळजी घेतल्यास कधीच होणार नाही तोंडाचा कर्करोग

सावध व्हा… लहान मुलांमध्ये कर्करोगाचा धोका वाढतो आहे. लक्षणे आणि उपाय जाणून घ्या

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.