या वयोगटातील असाल तर त्वरीत या ५ सवयी सोडा, अन्यथा पश्चाताप होईल…

ताणतणाव, उच्च कोलेस्ट्रॉलची पातळी, लठ्ठपणा, फॅमिलीचा आजाराचा इतिहास आणि वाढते वय आदीमुळे मधुमेह ( डायबिटीज ) होऊ शकतो. याआजारामध्ये रक्तातील साखरेची पातळी वाढते त्याने अनेक आजारांना निमंत्रण मिळू शकते. त्यामुळे या पाच सवयी या लोकांनी सोडणेच उत्तम असते.

या वयोगटातील असाल तर त्वरीत या ५ सवयी सोडा, अन्यथा पश्चाताप होईल...
Follow us
| Updated on: Jan 06, 2025 | 9:57 PM

डायबिटीज एक क्रॉनिक आजार आहे. ज्याच्यावर कोणताही उपाय नाही. या आजाराला केवळ आपले रहाणीमान चांगले ठेवून नियंत्रित करता येते. या आजाराची लागण झाली की अन्य आजार देखील होतात. आजकालची बैठी जीवनशैली, व्यायामाचा अभाव, चुकीचा आहार यामुळे प्रत्येक वयाच्या लोकांना डायबिटीज ( Diabetes ) हा आजार होऊ शकतो.यात रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. त्यामुळे अनेक धोके निर्माण होतात. ५० पेक्षा जास्त वय असेल तर हा आजार वाढू शकतो.त्यामुळे वय वाढल्यानंतर आपल्या काही सवयी सोडायला हव्यात,त्यामुळे ब्लड शुगर मेन्टेन राहील आणि अडचणींपासून वाचता येईल…

५० व्या वयात किती ब्लड शुगर लेव्हल हवी

NIH च्यानुसार ब्लड शुगर लेव्हल नियमित तपासायला हवी. टाईप – २ डायबिटीजवाल्याना दिवसातून अनेकदा त्यांची ब्लड शुगर तपासावी लागते. सामान्य ब्लड शुगरची पातळी ९० ते १०० mg/dl असायला हवी. ५० ते ६० वयोगटात रिकाम्या पोटी ब्लड शुगर लेव्हल ९० ते १३० mg/dl, जेवल्यानंतर १४० mg/dl आणि रात्री झोपण्यापूर्वी १५० mg/dl पेक्षा कमी असायला हवी..

हे सुद्धा वाचा

कोणत्या सवयी सोडाव्यात ?

१. डाएड संदर्भात बेफीकीरपणा

५० वर्षांच्या वयानंतर आपल्या डाएटला सांभाळले पाहीजे. आपल्या आहारात जराही गडबड झाली तर ब्लड शुगरच्या पातळीत चढउतार होऊ शकतात. त्यामुळे आहार सकस हवा. ताजी फळे, हिरव्या भाज्या, अखंड धान्य, नट्स आणि सीड्सचा आहारात समावेश करावा.

२. वजन वाढू देऊ नये

डायबिटीजमध्ये वजन वाढल्याने समस्या निर्माण होतात.  पन्नाशीत वजन वाढू शकते. त्यामुळे वेट मॅनेजमेंट करायला हवे, अशी कोणतीही गोष्ट करु नये ज्याने वजनात वाढ होईल, हेल्दी लाईफस्टाईल फॉलो करावे..

३. साखर किंवा गोड पदार्थ टाळावेत

साखर आणि गोड पदार्थांत उच्च प्रमाणात शर्करा असते, त्याने रक्तातील साखर वाढते. या शिवाय प्रोसेस्ड फूड खाऊ नये, त्यानेही ब्लड शुगर वाढू शकते. त्यामुळे या पदार्थांपासून चार हात दूर रहावे.

४. इनएक्टीव्ह लाईफस्टाईल

जर तुमचे वय पन्नाशीच्या पुढे आहे तर तु्म्ही एक्टीव्ह राहायला हवे, तर त्यामुळे हालचाल वाढवाव्यात, व्यायाम करावा आणि रोज चालायला जावे, अन्यथा साखरेत वाढ होऊ शकते. नियमित व्यायाम केल्याने ब्लड शुगर नियंत्रणात राहाते. यासाठी रोज व्यायाम करावा.

५. तणाव टाळावा, झोप पूर्ण करावी

ताण-तणावाने ब्लड शुगर वाढू शकते. पन्नाशीच्या पुढील व्यक्तीने तणाव कमी करण्यासाठी योग, ध्यान करावे. तसेच झोप पूर्ण करावी. या वयातील लोकांनी रोज सात ते आठ तास झोपणे गरजेचे असते.

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.