दिवसा झोप घेत असाल तर वेळीच सावध व्हा, असू शकतो ‘हा’ गंभीर आजार
दिवसा झोप येणे हे डिमेंशिया सारख्या गंभीर आजाराचे प्रारंभिक लक्षण देखील असू शकते. डिमेंशिया म्हणजेच स्मृतीभ्रंश. याची लक्षणे दिसल्यास त्वरित उपचार करणे आवश्यक आहे.
दिवसा झोप येण्याची तक्रार अनेक लोक करतात. थकवा असो, ताणतणाव किंवा खराब दिनचर्या आपल्याला दिवसा झोप येण्याची अनेक कारणे आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का, की हे डिमेंशियासारख्या गंभीर आजाराचे प्रारंभिक लक्षण देखील असू शकते. डिमेंशिया म्हणजेच स्मृतीभ्रंश. नुकत्याच झालेल्या एका संशोधनामध्ये ही धक्कादायक बाब समोर आली आहे.
स्मृतीभ्रंश : स्मृतिभ्रंश हा एक असा आजार आहे, ज्यामध्ये व्यक्तीची विचार करण्याची लक्षात ठेवण्याची आणि निर्णय घेण्याचे क्षमता हळूहळू कमी होते. हे मेंदूच्या पेशींच्या नुकसानीमुळे होते. अल्झामर रोग हा डिमेंशियाचा सर्वात सामान्य प्रकार आहे.
स्मृतिभ्रंश आणि दिवसा झोप येण्याचा काय संबंध आहे?
नुकत्याच झालेल्या संशोधनात असे आढळून आले आहे की, दिवसात जास्त झोप लागणे हे डिमेंशियाचे संभाव्य प्रारंभिक लक्षण असू शकते. याला मोट्रिक कोग्निटिव रिस्क असे देखील म्हणतात. डिमेंशिया रोखण्यात याची लवकर ओळख महत्त्वाची भूमिका बजावते. हे केवळ स्मृतिभ्रंशाचे निदान नाही तर या समस्येला इतरही अनेक घटक कारणीभूत असू शकतात.
स्मृतिभ्रंशाचे लक्षण आहे हे कसे समजावे?
झोपेची समस्या वाढेल: दिवसा झोपेची समस्या हळूहळू वाढत जाईल आणि इतर दैनंदिन कामावर देखील याचा परिणाम होईल तर ही चिंतेची बाब असू शकते.
इतर लक्षणांशी संबंध: जर दिवसा झोप येत असेल तर तुम्हाला इतर लक्षणे देखील दिसतील. जसे की स्मरणशक्ती कमी होणे, बोलण्यात अडचण होणे, निर्णय घेता न येणे किंवा व्यक्तिमत्वात बदल होणे यासारखी लक्षण हे दिसतील.
इतर कारणे शोधणे: दिवसा झोप येण्याची दुसरे देखील कारणे असू शकतात जसे की रात्री झोप न लागणे, डिप्रेशन, थकवा, औषधांचे दुष्परिणाम, या करणांवरही लक्ष देणे आवश्यक आहे.
मोट्रिक कोग्निटिव रिस्कची लक्षणे जाणवत असतील तर हे करा
डॉक्टरांशी संपर्क साधा: दिवसा जास्त झोप येत असेल आणि डिमेंशियाची लक्षणे जाणवत असतील तर डॉक्टरांशी लगेच संपर्क साधा.
संपूर्ण तपासणी करा: डॉक्टर तुमची लक्षणे आणि वैद्यकीय इतिहासा जाणून त्यावर आधारित काही चाचण्या करून घेतील.
निरोगी जीवनशैली: नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि पुरेशी झोप घेऊन तुम्ही तुमचे मन निरोगी ठेवू शकता.