Winter Tips: थंडीत जुने दुखणे डोकं वर काढत आहे? मग ‘हे’ उपाय नक्की करा

हिवाळा वाढटाच गुढगेदुखी आणि सांधेदुखीची समस्या अनेकांन जाणवते. यापासून आराम मिळविण्यासाठी काही उपाय जाणून घेऊया.

Winter Tips: थंडीत जुने दुखणे डोकं वर काढत आहे? मग 'हे' उपाय नक्की करा
गुढगे दुखी Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Nov 29, 2022 | 1:50 PM

मुंबई, तीनही ऋतूमध्ये हिवाळा हा प्रत्येकासाठीच आवडता ऋतू आहे. या दिवसात फळं आणि भाजी चांगली मिळतात तसेच या दिवसात खाल्लेलं अन्न आणि केलेला व्यायाम अंगी लागतो अशी मान्यता आहे. मात्र याची एक दुसरी बाजू देखील आहे. हिवाळा (Winter Tips) सुरू होताच अनेकांच्या आरोग्याच्या समस्या सुरू होतात. यामध्ये स्नायूंमध्ये कडकपणा आणि शरीराच्या सांध्यांमध्ये वेदना होणे ही एक सामान्य समस्या आहे. वृद्धांव्यतिरिक्त, सामान्य लोकांना देखील थंड हंगामात स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे थंडीच्या दिवसात जुने दुखणे डोकं वर काढते (old pain in winter). थंडीचा महिना सुरू झाला की, सांधेदुखी आणि स्नायूंच्या वेदनेच्या घटनांमध्ये वाढ होते, विशेषत: वृद्धांमध्ये ही समस्या मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते.

या ऋतूमध्ये अनेकांना जुन्या जखमांमध्ये तसेच ऑपरेशनच्या ठिकाणीही वेदना जाणवू लागतात. थंडीच्या ऋतूमध्ये अशा तक्रारी असलेल्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. तापमान आणि थंड हवामानातील बदलांमुळे स्नायू आणि सांध्याच्या आवरणामध्ये जडपणा येऊ शकतो.

हिवाळ्यात या टिप्सचा अवलंब केल्याने त्रास कमी होऊ शकतो

हे सुद्धा वाचा

सूर्यप्रकाश घ्या

आजच्या व्यस्त जीवनशैलीत लोकांना सकाळच्या उन्हासाठी वेळ देता येत नाही. याशिवाय बऱ्याच जणांच्या घरी किंवा कामाच्या ठिकाणी सूर्यप्रकाशाचा अभाव असतो. सूर्यकिरणांमध्ये जीवनसत्व ड मोठ्या प्रमाणात असते. याच्या कमतरतेने स्नायू किंवा हाडांमध्ये लवचिकता कमी होते, याशिवाय खूप थकवा येतो. स्नायूंची हालचाल मंदावते.  त्याचमुळे डॉक्टर सल्ला देतात की, जेव्हा शक्य असेल तेव्हा दिवसा उन्हात राहावे. यामुळे स्नायूंचा कडकपणा मोठ्या प्रमाणात कमी होतो.

व्यायामाला पर्याय नाही

स्नायूंना आराम देण्यासाठी तसेच सांधेदुखी, विशेषत: गुडघेदुखी टाळण्यासाठी स्ट्रेचिंगचा व्यायाम उत्तम आहे. याशिवाय नियमित व्यायामामध्ये सायकलिंग, चालणे, एरोबिक्सला जीवनशैलीचा भाग बनवा. तुम्हाला जास्त वेदना होत असल्या तरी तुम्ही गुडघ्याच्या स्नायूंना बळ देणारे सूक्ष्म योग अवलंबू शकता, यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच सुरुवात करा.

चुकीची बैठक पद्धती टाळा

अनेकजण कामाच्या ठिकाणी बराच वेळ किंवा चुकीच्या पाठातीने बसतात, ज्यामुळे स्नायूंमध्ये कडकपणा आणि  वेदना होण्याची शक्यता असते. थंडीच्या दिवसात हा त्रास जास्त होतो. याशिवाय जड वस्तू उचलल्याने मणक्याच्या सांध्यांमध्ये तसेच पाठदुखीचा त्रास होतो. हिवाळ्यात हे जास्त असू शकते, त्यामुळे पाठदुखी टाळण्यासाठी जड वस्तू उचलणे टाळावे. तसेच, आपल्या बसण्याच्या पद्धतीवर विशेष लक्ष दिले पाहिजे. कामाच्या दरम्यान लहान ब्रेक अवश्य घ्या.

शरीर हायड्रेटेड ठेवा

थंडी सुरू होताच लोकं पाणी पिणे कमी करतात, ज्यामुळे शरीरात अनेकदा डिहायड्रेशनची समस्या निर्माण होते. थंडीत स्वत:ला हायड्रेट ठेवणे महत्त्वाचे आहे. जेव्हा शरीर हायड्रेटेड असते तेव्हा सांधेदुखी आणि स्नायू पेटके ज्याला क्रॅम्सदेखील म्हणतात ते  कमी होतात कारण भरपूर द्रवपदार्थ प्यायल्याने सांधे आणि स्नायूंचे योग्य योग्य प्रकारे कार्य करते.

आहाराबाबत निष्काळजीपणा नको

वृद्धांमध्ये सांधेदुखीचा त्रास होत असलेल्या कोणालाही अशा तक्रारी टाळण्यासाठी, नेहमी सी, डी आणि के जीवनसत्त्वे असलेले अन्न खाण्याची शिफारस केली जाते. हिवाळ्यात पालक, कोबी, टोमॅटो आणि संत्री यांसारख्या गोष्टींचा आहारात समावेश करणे खूप गरजेचे आहे. त्यामध्ये कॅल्शियम आणि इतर खनिजे देखील असतात जी हाडे आणि सांधे यांच्या आरोग्यासाठी आवश्यक असतात.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.