Piles: मूळव्याधाने आहात त्रस्त ? ‘हे’ पदार्थ चुकूनही खाऊ नका

मूळव्याध झाल्यास अतिशय त्रासदायक ठरू शकतो. यामध्ये खाण्यापिण्याची व्यवस्थित काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे.

Piles: मूळव्याधाने आहात त्रस्त ? 'हे' पदार्थ चुकूनही खाऊ नका
Follow us
| Updated on: Nov 17, 2022 | 9:55 AM

नवी दिल्ली – बिघडलेली जीवनशैली, पोषक आहाराचा अभाव, जंक फूडचे अतिसेवन (junk food) आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी यामुळे आजकाल बहुतांश लोकांना मूळव्याधाचा (piles) त्रास होतो. ही खूप सामान्य समस्या बनली आहे. मूळव्याध झाल्यास त्या व्यक्तीला खूप त्रास सहन करावा लागतो, अनेक वेळेस असह्य वेदनाही (severe pain) होतात. खाण्यापिण्याची व्यवस्थित काळजी घेतली, पुरेसे पाणी प्यायले तर हा त्रास कमी होऊ शकतो. मूळव्याधाचा त्रास असेल तर काही पदार्थ खाणे टाळणे हे अत्यंत गरजेचे आहे. नीट काळजी घेतल्यास या त्रासापासून आराम मिळू शकतो.

मूळव्याधाचा त्रास असेल तर हे पदार्थ टाळा

1) तेलकट व मसालेदार पदार्थ

हे सुद्धा वाचा

तेलकट व अति मसालेदार पदार्थांमध्ये फॅट हे अतिरिक्त प्रमाणात असतात ज्यामुळे मूळव्याधाचा त्रास अधिक वाढू शकतो. तुम्हालाही ही समस्या असेल तर फ्रेंच फ्राईज, तळलेले मोमो, समोसा, कचोरी आणि इतर जंक फूडचे सेवन करणे टाळावे. तेलकट व मसालेदार पदार्थांमुळे आपली पचनसंस्था कमकुवत होते, ज्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवू शकते. त्याचसोबत जळजळ होण्याचा धोकाही वाढतो. म्हणून तेलकट आणि मसालेदार पदार्थ कमीत कमी खावेत.

2) ब्रेड

पांढरा ब्रेड हा पचण्यासाठी खूप जड असतो, त्यामुळे त्रास होऊ शकतो. ब्रेडचे सतत सेवन केल्याने बद्धकोष्ठता होण्याची शक्यता वाढते, ज्यामुळे मूळव्याधाचा त्रास आणखी वाढू शकतो. नाश्त्यासाठी (पांढऱ्या) ब्रेडचे सेवन करत असाल तर ताबडतोब थांबवावे.

3) चहा व कॉफीचे सेवन टाळा

चहा व कॉफीमध्ये कॅफेन हा घटक असतो ज्यामुळे मूळव्याधाचा त्रास आणखीनच वाढू शकतो. चहा-कॉफीच्या अति सेवनामुळे शरीरातील पाणी कमी होते, ज्यामुळे मल कडक होऊ शकतो. परिणामी मलत्याग करताना वेदना होणे व रक्तस्त्राव होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे तुम्हाला जर मूळव्याध असेल तर चहा अथवा कॉफीचे सेवन करणे टाळावे. तसेच दिवसभरात पुरेशा प्रमाणात पाणी पिणेही गरजेचे आहे. त्यामुळे मलत्याग करताना होणारा त्रास कमी होईल.

4) सिगारेट व गुटखा

धूम्रपान करणे तसेच गुटखा खाणे हेही शरीरासाठी त्रासदायक ठरू शकते. यामुळे मूळव्याधाचा त्रास अधिक वाढू शकतो. त्यामुळे मूळव्याधापासून सुटका हवी असेल तर धूम्रपामन करणे तसचे गुटखा खाणे या सवयी ताबडतोब बंद कराव्यात.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.