वजन कमी करण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी लोक अनेक प्रकारच्या डाएटचे पालन करतात. त्यामध्ये प्लांट-बेस्ड पदार्थांचाही समावेश आहे.
नवी दिल्ली – बरेच लोक निरोगी राहण्यासाठी अनेक प्रकारचे डाएट (diet) फॉलो करतात. त्यापैकी एक प्लांट-बेस्ड डाएट (plant-based diet) आहे. या डाएटमध्ये वनस्पतींपासून तयार केलेल्या पदार्थांचा समावेश असतो. फळे, सुका मेवा, कडधान्ये, डाळी आणि भाज्या यांचा या डाएटमध्ये समावेश होतो. मात्र त्यामध्ये मासे, चिकन, अंडी आणि प्रक्रिया केलेले पदार्थ यांचा समावेश नसतो. प्लांट-बेस्ड डाएटमध्ये मिनरल्स, प्रोटीन्स, फायबर आणि व्हिटॅमिन्स (vitamins) मुबलक प्रमाणात असतात. आरोग्यासाठी हे पोषक घटक खूप महत्त्वाचे आहेत. प्लांट-बेस्ड डाएट का घ्यावे हे जाणून घेऊया.
वजन कमी करण्यास मदत करते प्लांट-बेस्ड डाएट वेगाने वजन कमी करण्यास मदत करते. खरं तर, या काळात आपण संपूर्ण धान्य आणि भाज्यांचे सेवन करतो. त्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. हे अन्न हळूहळू पचते. ते खाल्यानंतर आपले पोट बऱ्याच काळासाठी भरल्यासारखे वाटते. प्लांट-बेस्ड पदार्थ आपल्या शरीराला पोषण प्रदान करतात.
कॅन्सर बीन्स, ड्रायफ्रूट्स, बिया, फळे आणि भाज्या यामध्ये फायबर, खनिजे, जीवनसत्त्वे आणि फायटोकेमिकल्स असतात. एका अभ्यासानुसार, ही पोषक तत्वं कॅन्सरच्या जोखमीपासून बचाव करण्यासाठी कार्य करतात. त्यामुळे कॅन्सरचा धोका टाळण्यासाठी तुम्ही आहारात प्लांट-बेस्ड पदार्थांचाही समावेश करू शकता.
मधुमेह मधुमेहाच्या रुग्णांनी आपल्या आहाराची अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत प्लांट-बेस्ड पदार्थांचे सेवन हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते. एका अभ्यासानुसार, या पदार्थांमुळे मधुमेहाचा धोका 32 टक्क्यांनी कमी होऊ शकतो. हे पदार्थ कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित करण्यास मदत करतात.
हृदय प्लांट-बेस्ड पदार्थ हे आपल्या हृद्याच्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतात. ते हृदयरोगाचा धोका कमी करण्यास मदत करतात. संशोधनानुसार, प्लांट-बेस्ड पदार्थ हृदयाशी संबंधित समस्या सुमारे 16 टक्क्यांनी कमी करू शकतात.
ब्लड प्रेशर (रक्तदाब) उच्च रक्तदाबाचा त्रास असेल तर अनेक समस्या उद्भवू शकतात. यामुळे तुम्हाला हृदयाशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागू शकतो. पण तुम्ही जर प्लांट-बेस्ड पदार्थांचे सेवन केले तर ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हे आपला रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते.